बात एक आहे

Submitted by निखिल मोडक on 20 June, 2025 - 17:59

एकजात साऱ्यांची, जात एक आहे
उघडून बघ झाकलेला, बात एक आहे

येऊनी भेटशील किंवा न भेटशील आता
तसाही वेळ फार नाही, रात एक आहे

असतील साप वेगळे हे, दंश वेगळाले
शेवटी टाकलेली तयांनीं, कात एक आहे

किती धावशील आता, थोडा आराम कर
पुन्हा पकडायची उद्याला, सात एक आहे

मिळतो तेव्हाच धर तू, ही एकलीच संधी
निस्वार्थ प्रेम देणारा, हात एक आहे

धुंडाळतो कुणाला, जगतांतरी कशाला
बाहेर का? तुझ्याही आत एक आहे

©निखिल मोडक

Group content visibility: 
Use group defaults

सप्तसूर दुनियेतील ऐकून शिणलो मी
अंतरंगात एकटा मारवा मी गात आहे

बोल लावून थकले सारे माननीय सभोवताली
नाते तुझे नी माझे कुणाला ज्ञात आहे?

Happy