Submitted by अनन्त्_यात्री on 18 June, 2025 - 01:51
कवीने वेचावे
वेचले वाचावे
वाचले साचावे
वेचले, वाचले
वाचले, साचले
साचले, सुचले
आतल्या आचेच्या
प्रखर धगीत
शब्दांच्या साच्यात
प्रज्ञेच्या मुशीत
अल्लाद ओतून
पाचही प्राणांची
पाखर घालून
उत्फुल्ल, उत्कट
प्रतिभा शिंपून
वाटून टाकावे
पुन्हा एकदा
कागद कोरा ~
सृजन चक्राचा
नवीन फेरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर..
सुंदर..
शांताबाईंची एक कविता कवितेविषयी
अभावित
कधीतरी अभावीतपणे
मनात चमकून जाते
ती कवितेची एकच ओळ
पुढचा प्रवास संदिग्ध, अनिश्चित
शेवट असतो नसतो
पावलाखाली उमटलेल्या रस्त्याला अवचित!
कधीतरी काळोखात
अचानक-लखलखते
एक प्रतिमेची ठिणगी
पुन्हा जाते विझून
चाचपडत शोधत असते मी
तिचा जिव्हाळा स्पर्श अजून!
शब्दांचे वादळ घोंघावत उठते
नादरूपांच्या जाणिवा सजग करून
सैरावैरा धावते, आणि मग-
तीव्र एकाग्र टवकारते मन
पुन्हा सारे शांत, स्तब्ध, नि:स्वन!
शांताबाईंची अजून एक सुंदर
शांताबाईंची अजून एक सुंदर कविता
कवी
शेवटची ओळ लिहिली
आणि तो दूर झाला
आपल्या कवितेपासून
बराचसा थकलेला
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतिणीसारखा
जरा प्रसन्न, जरा शांत
नाही खंत, नाही भ्रांत
आणि मी कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी
आधाराचे बोट सुटलेल्या
अजाण पोरासारखी
भांबावलेली, भयभीत
अनुभवणारी एका विपरीत नात्याची
परिमिती विपरीत
ती आहे आता पडलेली
कागदाच्या उजाड माळावर
आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधत
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण संतुष्ट, आत्मरत !
छान कविता..!
छान कविता..!
द. सा. , रूपाली धन्यवाद.
द. सा. , रूपाली धन्यवाद.
द. सा. शांताबाईंच्या दोन्ही कवितांबद्दल आभार!
सुंदर कविता ...
सुंदर कविता ...
द सा शांताबाईंच्या कविता ही छानच आहेत.
मस्त लय आहे. वाह!
मस्त लय आहे. वाह!
मनीमोहोर, सामो धन्यवाद
मनीमोहोर, सामो धन्यवाद