थाटले कसे

Submitted by मनोजकुमार देशमुख on 16 June, 2025 - 09:46

बंगले मोजकेच थाटले कसे
नाव झोपडीचेच काटले कसे

ठेवली जपून रोजनिशी आहे
पान नेमके तेच फाटले कसे

ते भलते सज्जन वागले होते
पाहिले तुला आणि बाटले कसे

सारे म्हणतात कठोर मी आहे
पाणी डोळ्यात मग दाटले कसे

मी जीव ओतून मांडली बाजू
त्यांचेच तुला खरे वाटले कसे

ग्रीष्मातही विहीर तुडुंब होती
श्रावणात झरे ते आटले कसे

Group content visibility: 
Use group defaults