कसं आवरू मनाला

Submitted by दत्तात्रय साळुंके on 16 June, 2025 - 06:04

कसं आवरु मनाला
चिंब चिंब भिजायला
चिंब उभार तिचा
असा रानात रुजला

तिचं कातीव रुप
पानोपानी निथळलं
जाईजुईच्या गंधात
रान सारं धुंधावलं

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूपालीताई
द्वैत
कुमार सर

खूप धन्यवाद..