मायबोली वर्षाविहार २०२५
लोकहो, मस्त पावसाळा सुरू झालेला आहे.
भिजलात की नाही पावसात?
काय म्हणता? नाही अजून.
बरं ठीक आहे, चिंब भिजायला आणि मस्त मजा करायला आपला लाडका ववि येतोय. तुम्ही ववि २०२५ ची दवंडी ऐकली ना?
मग आता आम्ही आलो आहोत त्याबद्दल आणखी सांगायला.
यंदा आपण ववि करणार आहोत नवीन रंगात नवीन ढंगात...
आहात ना तयार?
सगळ्यात आधी कॅलेंडरवर २० जुलै २०२५ चा रविवार हा "वविवार" म्हणून नोंदवून ठेवा बरं पटकन.
तारीख राखून ठेवलीत?OK
आता ठिकाण.
यंदा आपण ववि साठी भेटणार आहोत युकेज् रिसॉर्ट, खोपोली येथे.
हे आहे रिसॉर्ट चं मॅप लोकेशन -
https://maps.app.goo.gl/dekvFMqKvyuKcWvh9
आहे की नाही मस्त, आवडलं ना ठिकाण? आवडलंच असणार.
बरं आता तिथले काही फोटो बघा ...
.
.
.
.
आता तर नक्कीच आवडलं असणार.
विचार कसला करताय नाव नोंदणी करा लगेच.
नाव नोंदणी करण्यापूर्वी या खालील गोष्टी एकदा नीट वाचून घ्या:
- वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/ पत्नी/ मुले/ आई - वडील) येऊ शकतात. आपले इतर नातेवाईक/ मित्र-मैत्रिणी यांनाही वविला यायची इच्छा असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे मायबोलीचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे.
- नावनोंदणीची अंतिम तारीख आहे रविवार, १३ जुलै २०२५.
- योग्य ते शुल्क bhagyadeshmukh@okhdfcbank (भाग्यश्री देशमुख) या upi वर भरावे व त्यानंतर सगळ्यात खाली दिलेला गुगल फॉर्म भरुन त्यात नोंदणीसाठी आवश्यक ती माहिती नोंदवावी. तुमची वर्गणी आणि गुगल फॉर्म जमा झाल्यावर संयोजक तसे संपर्कातून किंवा ईमेलने पोचपावती देतील.
- काही शंका/प्रश्न असल्यास याच धाग्यावर विचारा किंवा vavi2025@maayboli.com या पत्त्यावर ईमेल करा.
मायबोली वर्षाविहार २०२५ ची वर्गणी खाली दिल्याप्रमाणे आहे:
मुंबईसाठी:
प्रौढ : रु. १८५०/- प्रत्येकी. (रिसॉर्ट: रु. १२००/-, सांस्कृतिक समिती: रु. ५०/-, बस: रु. ६००/-)
पुण्यासाठी:
प्रौढ : रु. १८५०/- प्रत्येकी. (रिसॉर्ट: रु १२००/-, सांस्कृतिक समिती: रु. ५०/-, बस: रु. ६००/-)
मुले (वय ५ ते १० वर्षे) : रु. ८००/- प्रत्येकी (रिसॉर्ट फी) आणि बसमध्ये बसायला स्वतंत्र जागा हवी असल्यास बसचे वर दिल्याप्रमाणे मुंबईसाठी रु. ६००/- आणि पुण्यासाठी रु. ६००/-
- ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
- १० वर्षापासून पुढे रिसॉर्टचा पूर्ण आकार लागेल.
- रिसॉर्टच्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा यांचा समावेश आहे.
- वरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी २० माणसांप्रमाणे धरला आहे. संख्या कमी झाली तर प्रवास खर्च कदाचित जास्त येऊ शकेल.
- समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केले तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
- स्वतंत्र येणार्यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
- मुंबई आणि पुणे सोडून इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.
ववि नोंदणीसाठी गुगल फॉर्म लिंक:
https://forms.gle/oPSbtSrSQq61yxsb8
शुल्क bhagyadeshmukh@okhdfcbank (भाग्यश्री देशमुख) या यूपीआय आयडी वर भरावे
मायबोली वर्षाविहार २०२५ संयोजन समिती:
मुंबई
मुग्धा साठे (मुग्धा)
भाग्यश्री देशमुख (चंपा)
विशाल शिंदे (ऋतुराज.)
पुणे
योगेश कुलकर्णी (योकु)
मल्लीनाथ करकंटी (MallinathK)
पल्लवी कुलकर्णी (किल्ली)
वामन देशमुख (वामन राव)
चला चला चला.
त्वरा करा.
आजच नोंदणी करा आणि माबो ववि २०२५ अनुभवायला तयार व्हा.
याबरोबरच सगळ्यांबरोबर हा धागा शेअर करायलाही विसरु नका.
आपल्या लाडक्या वविला यंदा नक्की यायचं हं.
ववि संयोजक टीम
#ववि२०२५-नवीनरंगातनवीनढंगात
ववि रद्द झाल्याचा खेद आहे.
ववि रद्द झाल्याचा खेद आहे. आमचा कालचा मुंबईचा साय़्ंकाळचा कार्यक्रम होता. तो अटेण्ड करता आला नाही.
नाही तर येता येता डोकावता आलं असतं.
संयोजकांची खटपट गेली वाया.
संयोजकांची खटपट गेली वाया.
रविवार म्हटला की पावसाळी सहलीसाठी खूप वाहनं निघतात आणि ट्राफिकलाच सगळे कंटाळतात. आणि पुढे टूरिस्ट्री जागांवर तर प्रचंड गर्दी होते. अगदी खोपोलीच्या मठात मधल्या वारीही दोनशे लोक प्रसादाला हजेरी लावतात तर एरवी काय होत असेल कल्पना करा.
Pages