प्रवासी

Submitted by निखिल मोडक on 13 June, 2025 - 09:44

इथे एकटा मी प्रवासी पथाने
चालतो पदांच्या लयीच्या प्रमाणे
एकेक जातो क्षण मागुती अन्
पुढे जातसे मी अजुनी नव्याने

असे घेतले अल्प पाठुंगळीला
पुढे घेत जातो रुचे जे मनाला
नवे घेत जाता जुने देत जाता
नवा होत जातो मी ही क्रमाने

नवे भेटती किती हर घडीला
कुणी राहती पुढे सोबतीला
स्मृती मागल्यांच्या तया सांगताना
स्मृती होत जातो तयांची कलाने

-- निखिल मोडक

Group content visibility: 
Use group defaults

मस्तच...