मायबोली वर्षाविहार २०२५

Submitted by ववि_संयोजक on 8 June, 2025 - 21:57

मायबोली वर्षाविहार २०२५

Screenshot_20250609_071838_WhatsApp.jpgऐका होss ऐकाss...
पैशाला दोन खारका...
पाटलाचा बैल मारका...
ऐका होss ऐकाss...

मायबोली नगरीतील समस्त मायबोलीकरांनो, सगळ्यांनी नीट कान देऊन ऐकाss..
तुम्ही सगळे ज्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहात त्या वर्षाविहाराची दवंडी पिटत आहोत होss...
सालाबादप्रमाणे, जुलै महिन्यात हा वर्षाविहार संपन्न होणार आहे होss...
मागच्या दोन वर्षात आपण सगळ्यांनी जितक्या उत्साहात वर्षाविहार साजरा केला त्यापेक्षा जास्त दणक्यात यंदा हा वर्षाविहार साजरा करूया आणि तो ही - नवीन रंगात नवीन ढंगात.

ववि दणक्यात साजरा करायला नवे आणि जुजा संयोजक अगदी सिद्ध झाले आहेत.
ववि संयोजनाच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत.

ववि २०२५ बद्दलची माहिती लवकरच इथे टाकू.
मग विचार कसला करताय...
यंदा वविला यायचय हं!

...आणि हो तुमच्या काही भन्नाट कल्पना, सूचना असतील तर त्या पण येऊद्यात.

वाट बघतोय....

#ववि२०२५-नवीनरंगातनवीनढंगात

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ववि हा नेहमी रवि वारी असतो

२७ जुलै श्रावणात जातोय म्हणजे तो नसणार.

२० तारखेला गटारी लोक साजरी करू शकतात म्हणून आमची स्कूल पिकनिक सुद्धा नेहमी गटारीच्या आधीच्या विकेंडला ठेवतात. जसे की यंदा १२-१३ तारखेला आहे.

ववि बाबत हा नियम पाळतील याची खात्री नाही कारण २३ ला बुधवारी सुद्धा गटारी साजरी करू शकतात लोकं असा विचार करतील.

म्हणून १३ किंवा २० जुलै या दोन्ही तारखा शक्य आहेत.

पण अजून तारीख आणि जागा पक्की झाली नसेल तर २० जुलै असण्याची शक्यता जास्त आहे.

क्रिकेट बाबत माझे अंदाज ९० टक्के बरोबर येतात कारण तो अनिश्चततेचा खेळ आहे. ववि त्या मानाने भरवशाची आहे. ९९ टक्के अंदाज बरोबर यायला हरकत नाही.

अहो वामनराव तुम्ही ववि कधी विचारले म्हणून एवढी पोस्ट लिहिली आणि तुम्ही ती उडवून माझा पोपट केलात Happy

ववि ला अनेक शुभेच्छा. सालाबाद प्रमाणे यावर्षीचा ववि खाणं पिणं मौज मज्जा यात चिंब भिजू दे.

रच्याकने : यावर्षी मुंबैकर आधी पोहोचतील की पुणेकर? 😉