शिकारीची प्रॅक्टिस

Submitted by अविनाश जोशी on 30 May, 2025 - 04:13

शिकारीची प्रॅक्टिस
ग दि माडगूळकरांचे बंधू श्री व्यंकटेश माडगूळकर हे सिद्ध हस्तलेखक तर आहेतच आणि त्यातच त्यांच्या 'बनगरवाडी' सारख्या कित्येक साहित्य कलाकृती अजरामर आहेत. व्यंकटेश माडगूळकरांचा बहुतेक माहित नसलेला पैलू म्हणजे त्यांना शिकाराची विलक्षण आवड आहे. त्यांच्या शिकार कथा अत्यंत रोचक आहेत. एकदा म्हणे श्री माडगूळकर शिकारीला जंगलात गेले होते. त्याकाळी शिकारीला बंदी नव्हती आणि ठराविक क्षेत्रात परवानगीने कोणीही शिकार करत असे.
हे परवानगी नाटक पार पेशव्यांपासून चालत आले आहे. पेशव्यांनी एल्फिस्टन साहेबाला सिंहगडाच्या परिसरात आणि बोर घाटाच्या परिसरात शिकारीला परवानगी दिली होती.
तसेच माडगूळकरांना कोल्हापूर जवळच्या दोन तीन गावात परवानगी होती. माडगूळकर वनात गेले त्यावेळी त्यांना शिकारीचा फारसा अनुभव नव्हता सश्याची शिकार आणि फारतर एखाद्या डुकराची शिकार त्यांच्या नावे होत्या. परंतु मोठ्या जनावराची शिकार त्यांनी कधीच केली नव्हती. आत्ताही ते एका पार्टी बरोबर मोठया जनावराची शिकार करण्याकरिता ते जंगलात गेले होते. जंगलातून जात जात माडगूळकरांची आणि इतर लोकांची चुकामुक झाली. थोड्या वेळानंतर त्यांनी विकट जंगलात प्रवेश केला. अचानक एक वाघाचा बच्चा त्यांच्यासमोर उभा राहिला. शिकाऱ्याची शिकार व्हायची वेळ आली होती. दोघेही एकमेकांकडे बघून नुसतेच उभे होते. वाघाने उडी घेण्याचा पवित्रा घेतल्यावर माडगूळकरांनी नेम धरून बार काढला. सवय नसल्यामुळे गोळी भलतीकडेच गेली. गोळीच्या आवाजाने वाघ दचकल्यामुळे त्याची उडीही चुकली. त्याच आवाजाने दचकून वाघही पळून गेला. माडगूळकरही कसे बसे कॅम्पमध्ये पोहचले. पुढील कथा माडगूळकरांच्या शब्दात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून माडगूळकर कॅम्प जवळच्या एका अरण्यात गेले. तेथे माडगूळकरांनी नेम बाजीचा सराव सुरु केला. कुठल्याही परिस्थितीत गोळी चुकू नये असा निश्चय त्याने केला. त्याच वेळेला पलीकडल्या झाडीतून झाडांची सळसळ त्याच्या कानावर पडली. हळूच जाऊन त्यांनी बघितले तर तिथल्या मोकळ्या जागेत तो वाघ उड्या मारण्याची प्रॅक्टिस करत होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असाच एक जोक ऐकला होता. एक माणूस जंगलात गेल्यावर अचानक समोर वाघ येतो. तो माणूस घाबरून डोळे मिटून रामरक्षा म्हणायला लागतो. मध्येच डोळे उघडून बघतो तर वाघ पण डोळे मिटून श्लोक म्हणत असतो - वदनी कवळ घेता