उगीचच काहीतरी

Submitted by अविनाश जोशी on 30 May, 2025 - 02:25

उगीचच काहीतरी
श्री विष्णू हे क्षीरसागरात राहतात तर श्री शंकर हिमालयात राहतात. थोडक्यात म्हणजे दोघेही सासऱ्याकडेच राहतात.
श्री विष्णू हे क्षीरसागरात राहतात तर श्री शंकर हिमालयात राहतात असे का असावे. एका सुभाषितात उत्तर आहे मत्कुण संशयो थोडक्यात ढेकणांच्या भीतीमुळे.
श्री शंकर अंगाला राख फासून स्मशानांत राहतात . एक सुभाषितकार म्हणतो घरच्या भांडणाला कंटाळून असे स्मशानात राहतात. बिचाराच्या मागे किती भांडणे आहेत. पार्वती देवीचे आणि गंगेचे भांडण , देवीचा वाघ आणि शंकराचा नंदी यांच्यात भांडण. शंकराचा सर्प आणि श्री गणपतीचा उंदीर यांच्यात भांडण. कार्तिकेयचा मोर आणि शंकराचा सर्प यांच्यात भांडण. अशा चहुविध भांडणाला कंटाळून श्री शंकर अंगाला राख फासून हिमालयात जातात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजेशी र आहे पैकी ढेकणाचे सुभाषित लहानपणी वाचलेले होते. हा धागा सुभाषितांचा करायला हरकत नाही.
@जोशी, नाव बदलून सुभाषिते असे द्या.

सासर बद्दल

असारे खलु संसारे सारं श्वशुरमंदिरम्
क्षीराब्धौ च हरि: शेते हर: शेते हिमालये