हातावर तुरी

Submitted by अविनाश जोशी on 24 May, 2025 - 05:53

हातावर तुरी
युध्दस्य कथाः रम्यहं असे म्हंटले जाते. पण युद्ध नसतानासुद्धा अनेक सुरस कथा, चमत्कारिक गोष्टी आर्म फोर्सेस मध्ये घडत असतात.
बंगलोरमध्ये अनेक एरफोर्स स्टेशन्स आहेत. एअर फोर्सच्या कुठल्याही एस्टॅब्लिशमेंटला स्टेशन म्हणतात आणि नेव्ही च्या कुठल्याही एस्टॅब्लिशमेंटला INS म्हणतात (इंडियन नेव्ही स्टेशन). लोणावळ्याला INS शिवाजी किंवा मुंबईतील INS हमला तर बंगलोरच्या या स्टेशन मध्ये असणारा एक फ्लाइट लेफ्टननं बंगलोरच्या एका गचाळ वस्तीत गेला होता आणि तिथे त्याचे भांडण झाले. भांडणांमध्ये त्याच्या हातून एक खून झाला आणि तो लगेच आपल्या मोटरबाइकने संद्याकाळी 6-6:30 ला स्टेशन वर आला. आल्या आल्या तो OC (Officer in Cammand) कडे गेला. त्याने OC ला सांगितले 'सर माझ्या हातून एक चूक घडली आहे'
'काय झाले ?'
'सर माझ्या हातून एक माणूस मारला गेला आहे'
'काय हे लेफ्टनंट ? माणसं मारायला हे काय युद्ध चालू आहे आणि तू निर्लज्जपणे सांगतोस'
'सर चूक झाली पण तिथे मारामारी झाली आणि मारामारीत माझ्या हातून तो माणूस मेला'
'बरं . कोण होता तो माणूस ?'
'कोणी मोठा नव्हता. मी XXXXX येथे गेलो होतो त्यातल्या एका गल्लीत मारामारी झाली आणि माझ्या हातून हा खून पडला.'
'छान . असेच खून पाडा आणि मग माझ्याकडे या '
कमांडर ने त्या लेफ्टनंला बऱ्याच शिव्या घातल्या . कमांडर बहुतेक एअर कोमोडोरच्या लेवलचा होता. हा आर्मीतील कर्नल / ब्रिगेडिअर च्या बरोबरच असतो. पण डिफेन्स फोर्सेस मध्ये आपल्या माणसाला नेहमीच पोलिसांपासून वाचवले जाते. आर्मीच्या एका कर्नलच्या बायकोला काही कारणास्तव पोलीस स्टेशनवर नेल्यावर आर्मीच्या दोन कंपन्यांनी पोलीस स्टेशनला सशस्त्र वेढा घातल्याचे वृत्त प्रसिद्ध आहे. काही वेळ विचार करून एअर फोर्स कमांडर म्हणाला 'ठीक आहे. मारामारीत तुझं काही पडलं आहे का ते बघ.' लेफ्टनांनी सर्व खिसे चाचपले आणि म्हणाला 'माझे आय डी कार्ड सापडत नाही ते बहुदा त्या जागेवर पडले असावे '
'आय डी हरवला ? त्यापेक्षा जवळच्या पोलीस स्टेशन ला जाऊन स्वतःच लोकअप मध्ये जाऊन बसायचे होते. पेन तरी खिश्यात आहे का ? का तेही पडले .'
'आहे सर'
'मग माझ्यावर कृपा करा आणि पंधरा दिवसापूर्वीचा अर्ज द्या कि, माझे आय डी कार्ड सापडत नाही तरी मला दुसरं द्यावं'
'एस सर' लेफ्टननं ने अर्ज दिला आणि तो निघून गेला
त्याचे आय डी कार्ड मारामारीच्या ठिकाणी पडले होते. तोपर्यंत पोलीस मारामारीच्या ठिकाणी आले होते, अर्थातच त्यानां आय डी कार्ड सापडले. या आय डी कार्ड वर एक सूचना लिहलेली असते . कि हे आय डी कार्ड कोणाला सापडल्यास ते जवळच्या स्टेशनला नेऊन द्यावे. पोलिसांना खुनाची केस नेहमीच मोठी असते. आणि त्यातून आर्मीतला म्हण्टल्यावर त्यांना जास्तच चेव येतो. खुनाच्या जागी आलेला इन्स्पेक्टर फारच हुशार होता. त्याने पोलिसांच्या दोन -तीन गाड्या घेऊन त्या विविक्षित एअर फोर्स स्टेशनवर पोहचले. अशा प्रकारच्या स्टेशनवर पोलीस वॉरन्टही मिळू शकत नाही आणि परवानगी असल्याशिवाय आतही जाऊ शकत नाही त्यातून रात्री तर नाहीच नाही. पण साधारणतः अशी परवानगी नाकारली जात नाही. त्या एअर फोर्स स्टेशनला तीन दारे होती. एका दारावर पोलीस इन्स्पेक्टर गेला तिथे त्याला अडवण्यात आले. इन्स्पेक्टर गार्ड्सना म्हणाला 'मला कमांडर साहेबाना भेटायचे आहे. महत्वाचे काम आहे.' गार्डना अगोदरच आज्ञा असल्यामुळे त्यांनी परवानगी नाकारली. इन्स्पेक्टरने त्यांना वारंवार सांगितले कि त्याला महत्वाचे काम आहे निदान त्यांना फोन तरी करू देत. गार्ड्सने त्यालाही नकार दिला व सांगितले रात्री आम्ही त्यांना डिस्टर्ब् करू शकत नाही. उद्या सकाळी सात वाजता या. इन्स्पेक्टरचा नाइलाज झाला त्याने चातुर्याने स्टेशनच्या तिन्ही दारावर एक एक गाडी ठेवली आणि बाहेर जाणारा एक एक माणूस किंवा वेहिकल रस्त्यावर आल्यावर तपासण्याची आज्ञा केली. त्याच प्रमाणे तो ठराविक माणूस दिसल्यास त्याला पकडण्याची पण आज्ञा केली. इन्स्पेक्टरने चातुर्याने मारामारी व खून झालेल्या साक्षीदारांना त्या माणसास ओळखण्यासाठी चार पाच जणांना आणले होते. त्यातील माणूस त्याने प्रत्येक दारावर पोलिसांबरोबर ठेवला. अशा रीतीने तो पळून जाणार नाही असा बंदोबस्त केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पोलिसांनी परत गार्ड्सना कमांडर ची परवानगी मागितली आता नवीन गार्डस होते. साडेसात वाजता त्यांना आत जायची परवानगी मिळाली आणि कमांडर बंगल्यातच भेटतील असे सांगितले. इन्स्पेक्टर त्यातल्या एका सुशिक्षित साक्षीदाराला घेऊन आत गेले. कमांडर साहेब बंगल्याच्या बागेत नाश्ता करत बसले होते त्यांचा सहायक शेजारीच उभा होता. 'Please Seat . Have some breakfast'. इन्सपेक्टर साहेबांना निदान चहा तरी हवाच होता त्यामुळे ते निमूटपणे साहेबांसमोर बसले. खाणे झाल्यावर कॉफी पिताना साहेबानी विचारले Yes officer what we can do for you ?
'सर, आम्हाला तुमच्या युनिटचे एक आय डी कार्ड सापडले आहे. साहेबांनी सहाय्यकाकडे हात केला. सहाय्यकाने इंस्पेक्टरकडे हात केला. इन्स्पेक्टरने कार्ड देण्याऐवजी म्हंटले 'ते कार्ड प्लाइट लेफ्टनं सुरेंद्र शर्माचे आहे'
'हो त्याने पंधरादिवसपूर्वी कार्ड हरवल्याचा रिपोर्ट दिला होता ' सहायक
'ऑफिसर या छोट्या गोष्टींकरिता तुम्हाला यायची काय गरज होती? कुठल्याही पोलिसांबरोबर पाठवले असते तर चालले असते.'
इन्स्पेक्टर साक्षीदाराकडे वळून म्हणाला यांना हे कार्ड सापडले आहे आणि त्यांना ते प्रत्यक्ष माणसाला द्यायला आवडेल.' इन्स्पेक्टर
'कमांडर त्या माणसाला बोलावून घ्या आणि हे प्रकरण तुम्हीच हाताळा' साहेब आपल्या सह्यकाकडे वळून म्हणाले. इन्स्पेक्टर ला म्हणाले 'ऑफिसर हे विंग कमांडर गुलाठी माझे सहायक तुम्हाला आवश्यक त्या गोष्टी पुरवतील मी निघतो. असे म्हणून कमांडर निघून गेले. गुलाठी इंस्पेक्टरकडे वळून म्हणाले 'मी तुम्हाला या आय डी कार्ड ची पावती देण्याची व्यवस्था करतो आणि ते योग्य त्या माणसाला पोहचवतो. इन्स्पेक्टर हुशार होता तो माणूस समोर आला तर साक्षीदार पण त्याला ओळखेल अशी त्याला खात्री होती. म्हणून तो म्हणाला कि, सर तुम्ही त्या माणसाला येथेच बोलावले तर आम्हालाही बरे वाटेल.
' पण ते शक्यच नाही'
इन्स्पेक्टरला दाट शंका आली पहिल्यांदा सगळं कागदपत्रे पूर्ण करा नंतर ओळख परेडमध्ये या साक्षीदारांना बोलवा. असे करण्यात निश्चितच साक्षीदार चेहरे विसरले असते . त्याची केस वीक झाली असती. तो सहाय्यकाला म्हणाला बघा ना साहेब त्याला बोलावता आलं तर आम्हाला फार आनंद वाटेल. वाटल्यास आम्ही थांबतो. सहायक त्याला म्हणाला. 'सर ते शक्यच नाही कारण या माणसाची बदली दोन आठवड्यापूर्वी हैद्राबादला झाली आहे तो तिथे रुजू झाला आहे. इन्स्पेक्टर दचकलाच. त्याने दारावर पहारे ठेवले होते. पण हे एअर फोर्स स्टेशन होते. त्याला रात्रीच हैद्राबादला विमानाने पाठवले होते आणि बंगलोर आणि हैद्राबाद मध्ये तो बंगलोर मधून निघून हैद्राबादला दोन आठवड्यापूर्वी जॉईन झाल्याची सर्व कागदपत्रे तयार होती. पोलीस हात चोळत बसले आणि काही दिवसांनी खुनाची केस अज्ञात इसमाच्या विरुद्ध अशी नोंदण्यात आली आणि अर्थातच ती बंद झाली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान