ओंडके
आयुष्याच्या संध्याकाळी मी एकटाच विचार करत असताना शेवटी कालाय तस्मय नमः असेच म्हणावे लागते. आयुष्य हे नदीतील लाकडाच्या ओंडक्यासारखे असते. दोन ओंडके एकत्र येतात आणि काही वेळानी वेगळे होतात. ते दुसऱ्या ओंडक्यांना जाऊन मिळतात आणि हे चक्र चालूच राहते. प्रत्येक ओंडक्याचा प्रवाह, त्याचा वेग, त्याचे धबधबावरून पडणे किंवा पार समुद्रापर्यंत जाणे हे वेगळेच असते. आत्ता हे आठवायचे कारण म्हणजे मे महिना. पूर्वीपासून लग्न, मुंजी आणि शाळेतील खरेदी यांचा महिना.
1960 साली अशाच एका मे महिन्यात मी अप्पा बळवंत चौकातील वर्मा बुक स्टॉल मध्ये खरेदी करत असताना, सुहास साठे प्रथम भेटला. रवी ने म्हणजे दुकानांच्या मालकाने सुहास साठेची ओळख करून दिली.
'शेखर हा बघ सुहास साठे . हा मूळचा वाईचा . आत्ता पर्यंत तो वाईच्या शाळेत शिकत होता पण दहावी-अकरावी करिता तो पुण्यात आला आहे'. सुहास बुजरा होता आणि तसाच भिडस्त स्वभावाचाही वाटला. आमच्या थोड्याश्या गप्पांनंतर असे समजले कि आम्ही दोघेही एकाच वर्गात आहोत . वर्ग म्हणजे दहावी अ, पेरूगेट भावे स्कूल. त्याकाळी भावे स्कूल प्रमुख माध्यमिक शाळातील एक होते. त्यावेळी पुण्यात नु म वी किंवा भावे स्कूल असा सदाशिव पेठी लोकांचा आग्रह असे.
थोड्याच दिवसात माझी आणि सुहासची घट्ट मैत्री जमली. आम्ही दोघे एकाच बाकावर बसू लागलो. त्या काळात पेरूगेट भावे स्कूलचे दहावी अ आणि अकरावी अ हे वर्ग जास्तच शिष्ट असायचे. बाकीचे वर्ग त्याना फारच खालच्या लेवलचे वाटायचे . गम्मत म्हणजे साठ-बासष्ट वर्षांनी सुद्धा अकरावी अ ची 1963 सालची बॅच अजून भेटत असते. तर अशा शिष्ट वर्गात आम्ही दोन वर्ष काढली.
शाळेत सुहासचा ग्राऊंडकडे ओढा तर माझा लायब्ररीकडे ओढा. झपाटल्यासारखी मी लायब्ररीत सर्व पुस्तके वाचत होतो. लायब्ररीयनला काही मदतही करत होतो. ही आवड पाहून आमच्या भावे सरांनी मला आठवीत असतानाच ब्रिटिश कॉउंसिल लायब्ररीची मेम्बरशिप दिली होती. त्यावेळचा त्यांचा उपदेश म्हणजे 'तू पुस्तकं वाचायला लाग, त्यातले शब्द समजत नाहीत म्हणून डिक्शनरी उघडू नकोस. काही दिवसानी तुला त्यातले बरेच शब्द आपोआप कळायला लागतील. वाचताना तू इंग्रजी भाषेचा डौल, त्याच्या वापरातील फरक हे शीक उदारणार्थ पी जी वूड हाऊस, आर्थर कोनन डॉयल, अगाथा ख्रिस्ती यांचे वाक्यप्रचार, शब्द वापरयाची पद्धती जाणून घे. लेस्ली चार्टीस पण वाचायला हरकत नाही. तसेच ऑक्सफर्ड इंग्लिश , ब्रिटिश इंग्लिश , इंग्लिश इंग्लिश , स्कॉटिश एइंग्लिश किंवा आयरिश एइंग्लिश हे पण जाणून घे. ब्रिटिश कॉउंसिल मध्ये जाशील तेव्हा तेथील ब्रिटिश वर्तमानपत्रे वाच यातून तुझे शब्द भांडार विस्तीर्ण होईल आणि तुला इंग्लिश भाषा खऱ्या अर्थाने येईल. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय?, पास्ट परफेक्टिव म्हणजे काय? असे तुला आयुष्यात कोणी विचारणार नाही. इंग्लिश भाषा शिक त्यामागचे तंत्र नको'. मी सुहासलाही इंग्रजी भाषेची गोडी लावली. दहावी अकरावी झाली. दोघानीं फ़र्ग्युसन मध्ये प्री डिग्रीला प्रवेश घेतला. सुहास दोन वर्षात फारच सुधारला होता. दहावीतील प्रथम दिसणारा गबाळा सुहास आता हिरो सुहास झाला होता. पोरी त्याच्यावर अक्षरशः मरत असत. परंतु काही महिन्यातच आमची संगत सुटली. त्याला NDA ला ऍडमिशन मिळाली होती. लहानपणापासूनच एअरफोर्स मध्ये जायचे त्याचे स्वप्न होते. NDA तील ट्रेनिंग आणि त्यानंतर एअरफोर्स अकॅडमीतील ट्रेनिंग नंतर तो एअरफोर्स मध्ये जॉईन झाला. काही दिवसातच त्याला फ्लाईट लेफ्टनंट ची पोस्ट मिळाली. सुट्टीत घरी आला असता घरच्यांनी वाईतील एका मुलीशी त्याचे लग्न ठरवले. ज्ञानकोश इमारतीजवळ राहणारे दाते , त्यांची एकुलती एक कन्या वसुमती. दोघे एकमेकांना अनुरूप होती. सुहास जवळ जवळ 6 फूट आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेला तर वसुमती गोरी, सडपातळ आणि 5 फूट 5 इंच उंचीची. बी ए इकॉनॉमिक्स झालेली आणि law च्या टर्म्स भरत असलेली . एकमेकांना पहाताच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडली. बर साठे , दाते अशी कुटुंब असल्याने लग्न जमण्यास काहीच हरकत नव्हती. दोघांचा साखरपुडा झाला आणि मग दोघे पाचगणी, महाबळेश्वर अशी हिंडू लागली. पुढच्या सुट्टीत लग्न करण्याचे ठरले आणि कदाचित त्याला Squadron लिडर पोस्ट ही मिळाली असती. त्यामुळे त्याला फॅमिली कॉर्टर मिळणे सुलभ झाले असते. ऑगस्ट 1965 मध्ये सुहासला मोठी सुट्टी मिळाली आणि Squadron लीडर पोस्टही मिळाली. त्यामुळे 10 ऑगस्टला त्यांचा लग्न महुर्त ठरला . लग्न मोठ्या झोकात झाले. संघ्याकाळी रिसेपशन सुरु झाले. तारा वर तारा येत होत्या. टेलिग्राम वर टेलिग्राम येत होते. त्याकाळी टेलिग्रामवर ग्रीटिंग्ज फार लोकप्रिय होती. त्यात एक IAF कंमाड कडून आलेल्या एका टेलिग्रामकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. संघ्याकाळी रिसेपशन चालू असता एक एअर फोर्सचे व्हेईकल तिथे आले त्यातून एक एअर फोर्स चा JEO खाली उताराला आणि सुहास कडे जात सर तुमचे वॉरंट आणले आहे तुम्हाला लगेच निघायला पाहिजे. तुम्ही टेलिग्राम वाचलाच असेल. मग त्या टेलिग्रामची शोधाशोध सुरु झाली. त्यात एक टेलिग्राम होता पाकशी युद्ध कधीही होऊ शकते ताबडतोब उधमपूर एअरपोर्टला रिपोर्ट करा. तुमच्या साठी पुणे एअरपोर्टला वॉरंट पाठवले आणि वाई वरून तुम्हाला नेण्यास गाडी येईल. ते वाचताच कंमाडला एक दिवस थांबा अशी विनवणी करणे शक्यच नव्हते. त्यामुळे तो जीप मध्ये बसला आणि पुण्याला निघाला. मला अर्थातच मदतीकरिता बरोबर घेतले. पुढील दोन-तीन तास वसुमती मोठ्या धैर्याने रिसेपशन मध्ये बसली आणि नंतर आईच्या गळ्यात गळा घालून रडत बसली.
पुणे एअरपोर्ट आल्यावर प्रवासी वाहतूक दिल्लीपर्यंत नव्हतीच शेवटी एअरफोर्स विमानाला वॉरंट देऊन पुणे - मुंबई एअरफोर्स विमानाने मुंबईहुन दिल्लीला इंडियन एअरलायन्स आणि पुढे एअरफोर्स विमानाने तो उधमपूरला पोहचला. त्याच्या ग्रुप कॅप्टननी त्याचे अभिनंदन केले आणि त्याला Squadron लीडर चे पत्र देण्यात आले. सुहास त्यावेळेला NAT विमानाचा (GNAT) पायलट म्हणून काम करायचा. अवजड बॉम्बर विमाने सॉर्टीवर जात असताना ती विमाने त्याची संरक्षक म्हणून जायची.
1965 च्या युद्धात NAT विमानांनी फार महत्वाची कामगिरी बजावली. NAT याचा अर्थ डास . त्यांच्या हालचालींचा वेग अमेरिकेच्या S35 लाही लाजवणारा असायचा. S35 विमान वळण सुरु करायच्या आत NAT त्याच्या पाठीमागे पोहचलेले असायचे. ते विमान अतिशय छोटे होते. त्यावेळेला आलेल्या NAT वरच्या विनोदा मध्ये RK लक्ष्मण ने काढलेले व्यंगचित्र फारच बोलके होते. त्यात प्लँनिंग रूम मध्ये एका भव्य टेबलवर मॅप ठेवलेला असून त्यावर पाक जनरल विचार करत आहे असे दाखवले होते. त्याचवेळेस एक NAT विमान एका खिडकीतून आत येऊन दुसऱ्या खिडकीतून बाहेर जाताना, मॅप वर बॉम्ब टाकल्याचे दाखवले होते.
सुहास नुकताच Squadron लीडर झाला होता याचा अर्थ एका Squadron चे (बहुतेक वेळेला नऊ विमानाचे) मार्गदर्शन तो करणार होता. अशाच संरक्षक सॉर्टीवर एकदा गेलेले असतानां सुहासच्या विमानाला एक मिसाईल लागून विमाची हानी झाली आणि त्यातून त्याचे इंजिन पेटले. त्यावेळी विमान साधारण तीन हजार फूट उंचीवर होते. सुहासने सीट इजेक्टचे तंत्रज्ञान वापरले. योग्यरीत्या पॅराशूट उडवून तो खाली निघाला येथपर्यंत सगळे ठीक होते. परंतु खाली येताना शत्रूची एक ट्रेसर बुलेट त्याच्या नाकातून गेली आणि नाक लोंबायला लागले. तशाच स्थितीत तो खाली उताराला ती जागा पाक मध्ये सहा किलोमीटर आत होती. त्याच्या सुदैवाने त्या सेक्टर मध्ये कित्येक ठिकाणी आपली सेना दहा ते पंधरा किलोमीटर आत गेलेली होती. त्यामुळे त्याला दोन तीन तासाच्या पायपिटीनंतर एक व्हेहिकेल मिळाले आणि प्रथम तो बेस कॅम्पवर व नंतर अंबालाला एअरफोर्स विमानांनी गेला. तिथे नाकावर प्राथमिक उपचार करून त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली आणि सात दिवसानंतर त्याला पुण्याच्या कमांड हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले. त्यावेळेस ते हॉस्पिटल कृत्रिम अवयवांकरिता प्रसिद्ध होते. तेथे त्याच्यावर प्लास्टिक सर्जेरी करण्यात आली. पुढच्या सहा ते आठ आठवड्यात त्याच्यावर प्लास्टिक सर्जरीही झाल्या आणि त्याला फिरण्याची मुभा मिळाली . या काळात तीन चार वेळा वसू त्याला पुण्यात येऊन भेटून गेली होती. त्याकाळी फोन ची परिस्थिती फारच वाईट होती आणि डिस्चार्जचे तारीख अनिश्चित होती. नंतरही त्याच्या फॉर्मॅलिटीज होत्या. हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेतल्यावर त्यानां कमांड ऑफिस च्या रेस्पेक्टिव सेकशनला जाऊन ड्युटी जॉइनिंग करावे लागे व परत बाहेर जाऊन त्यांना रजा घ्यावी लागे. ही प्रक्रिया नॉर्मली लगेच होत असे परंतु हा सदन कमांड मध्ये सगळी कागदपत्रे देणार होता. तर त्याचे हेड कॉर्टर नॉर्थ वेस्टर्न कमांड होते. त्यामुळे कदाचित लगेच किंवा एक दिवस लागण्याची शक्यता होतीच. त्याने घरी कळवले होते कि तो दोन-तीन दिवसातच वाईला पोहचेल आणि निघण्याच्या दिवशी तो घरी टेलिग्राम करेल. दुसऱ्या दिवशी त्याने घरी टेलिग्राम पाठवली रीचिंग वाई टुडे. वसुच्या सर्व मैत्रिणीनी तिला चिडवून बेजार केले होते. साठे-दाते दोन्ही घरची दोन्ही मंडळी त्या दिवशी गावाला निघून गेली होती. ते कुठे गेली हे सुद्धा वसुला माहित नव्हते. वसू आणि सुहासला एकांत मिळावा म्हणून हे सर्व केले गेले होते. वसू संध्याकाळपासून वाट पाहत होती. रात्री नऊ वाजता दाराची बेल वाजली. ती अपेक्षेने दार उघडायला गेली, दार उघडताच पोस्टमन पाहून ती निराश झाली त्यातून पोस्टमन ने साठ्यांच्या नावावर तार आणली होती. तारेत लिहले होते ' Squadron Leader died in road accident in active duty. His body will be sent to Wai Today. Tomorrow his cremated ceremony will be conducted at Wai with guidance of Major General Saxena posting Kolhapur regiment and SP Dhumal of Maharashtra Police. हि तार वाचल्यावर वसू दारातच बेशुद्ध पडली आणि एका ओंडक्यापासून दुसरा ओंडका कायमचा निघून गेला होता.
ओंडके
Submitted by अविनाश जोशी on 22 May, 2025 - 07:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचली. सत्यकथा आहे का?
वाचली. सत्यकथा आहे का?
हो . सत्यकथा आहे .
हो . सत्यकथा आहे .
ओह!
ओह!
किती वाईट घडले.
युद्धात पराक्रम गाजवला.
आणि रोड accident
बापरे
बापरे
नियतीचा धोंडा.
नियतीचा धोंडा.