Submitted by द्वैत on 21 May, 2025 - 13:35
सरळ नसतो कुठला रस्ता
अटळ असती वळणे काही
प्रश्न उगवती असे कलंदर
ज्या प्रश्नांना उत्तर नाही
उत्तर नसते चूक बरोबर
उत्तर असते त्यातील अंतर
उत्तर जन्मे प्रश्नाआधी
उत्तर उरते प्रश्नानंतर
पाप पुण्य ही दोन पारडी
आणि थांबे मध्येच काटा
त्यावेळी जे सत्य गवसते
त्यातून फुटती उत्तर वाटा
या वाटेच्या वाटसरूंना
भीती न मागे वळावयाची
कुणा कितीसे कळले किंवा
कुणा न काही कळावयाची
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
क्या बात! आवडली.
क्या बात! आवडली.
सुंदर!
सुंदर!
खूप छान कविता.
खूप छान कविता.
वाह
वाह
वाह!!
वाह!!
फारच सुंदर!
फारच सुंदर!
फारच सुंदर!
.