Submitted by किरण कुमार on 19 May, 2025 - 06:24
हरलो नाही , मी शत्रूला जयंत केले आहे
मी ग्रीष्माच्या लाटेलाही वसंत केले आहे
हत्ती मेला उंट अडकला मला न पर्वा त्याची
साध्या प्याद्याने वजिराला जिवंत केले आहे
तुझ्या मिठीतुन प्रश्न भाबडा उगा मनाला पडतो
या श्वासांना कुणी अचानक ज्वलंत केले आहे
आयुष्याला फार सुगंधी करावयाचे नव्हते
तिने दिलेल्या काट्यालाही पसंत केले आहे
उगाच मोजत बसलो संख्या मूर्तींची मी येथे
अस्तित्वाला कधीच त्याने अनंत केले आहे
- किरण कुमार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा