Submitted by अनन्त्_यात्री on 13 May, 2025 - 00:21
ओथंबल्या नभाखाली
भारलेली हवा
सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये
सैरभैर थवा
गर्जणारा मेघ शिंपे
सृजनाचा ठेवा
वीज ओढी कड्यावर
ओरखडा नवा
काजव्यांच्या ठिणग्यांचा
पानोपानी दिवा.
आरस्पानी स्वप्नी सांगे
शकुनाचा रावा,
"दृष्टावल्या भवताला
काळी तीट लावा "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूप सुंदर....
खूप सुंदर....
सुंदर ...
सुंदर ...
आई गं किती सुंदर.
आई गं किती सुंदर.
वा! सुंदर!
वा! सुंदर!
क्या बात है !!
क्या बात है !!

मस्त!!
मस्त!!
प्रतिसाद देणाऱ्या सर्व कविता
प्रतिसाद देणाऱ्या सर्व कविता-रसिकांना धन्यवाद !