सुलेखा
सुरेखा आणि सुलेखा या दोघी बहिणी. अरे हो त्याच्या अगोदरची कथा पण सांगितली पाहिजे. सुप्रिया फडके बडोद्याला लहानाची मोठी झाली. आई शाळेत शिक्षिका तर वडील सयाजीराव गायकवाडमध्ये प्राध्यापक. अर्थातच घरी वातावरण कर्मठ . हे साधारण ऐंशीचे दशक असावे. सुप्रिया बीए हिस्ट्री करत होती. त्यांच्या जवळच एक राणे नावाचा हुशार मुलगा राहत होता. तो एमकॉम करत होता. सुरेश राणे लहानपणापासून फडक्यांच्या घरी येत जात होता. त्याची सुप्रियाशी घट्ट मैत्री होती. त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही समजले नाही. दोघेही त्यांच्या परीक्षा चांगल्या रीतीने पास झाले. सुप्रियाच्या घरात लग्नाचे विचार येऊ लागले. स्थळे सांगून येऊ लागली. बडोद्यात महाराष्ट्रीयन समाज बराच मोठा आहे त्यामुळे स्थळांना तोटा नव्हता. त्याच सुमारास सुरेशला एका मोठ्या टेक्सटाईल कंपनीत चांगली नोकरी लागली. त्यामुळे त्यानेही सुप्रियाचा प्रस्ताव दोन्ही घरी ठेवला. अर्थातच दोन्ही घरून प्रचंड विरोध झाला. सुप्रियाचे बाहेर जाणे बंद केले आणि निश्चित लवकर लग्न करण्याचा निश्चय तिच्या पालकांच्या मनात येऊ लागला. 'लहानपणापासून तुम्ही आम्हा दोघांना पाहत आहात मुलगा म्हणून आणि हुशार मुलगा म्हणून तुम्हाला तो आवडतो असे असताना आमच्या लग्नाला विरोध का ?' सुप्रिया.
'सुप्रिया तो मुलगा चांगला आहे हे आम्ही मान्य करतो परंतु तो आपल्या जातींचा नाही. आपल्यात अजून कोकणस्थ-देशस्थ वाद चालू आहे. त्यातून मराठा कोकणस्थ विवाह तर मान्यच होणार नाही.' आई.
'आई आम्ही दोघे सज्ञान आहोत. एकमेकांना अनुरूपही आहोत मग हि आडकाठी का ?' सुप्रिया
'मुली तुम्ही दोघेही सज्ञान आहेत हे कबूल, पण अजून आपला समाज सज्ञान नाही. हा विवाह जर आम्ही करून दिला तर लोकं आम्हाला चप्पलांचा हार घालून आमची गाढवावरून धिंड काढतील' बाबा
असे बऱ्याच वेळा वाद विवाद रंगत गेले आणि घरचा नकार ठाम राहिला. थोड्याफार फरकाने असेच सवांद सुरेशच्या घरीही रंगत होते.
सात आठ महिने असे गेल्यावर दोघांनीही पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर लगेच सुरेशने बडोदा सोडले आणि तो अहमदाबादजवळ कल्लोळ या ठिकाणी नोकरीला लागला. राहण्यास मात्र तो अहमदाबादलाच होता. सुरेशची पाहिल्यापासूनची स्थिती चांगलीच होती आणि त्याला नोकरीही चांगल्या पगाराची लागली होती त्यामुळे त्याने घरून एकही पैसा न घेता आपले स्वतंत्र बिऱ्हाड थाटले .
इकडे मात्र फडक्यांना प्रचंड टिकेना तोंड द्यावे लागले. रावपुऱ्यातला चांगला निवास सोडून त्यांना बडोद्याच्या उपनगरात जाणे भाग पडले. तेथेही लोकांना आम्हाला मुलबाळ नाही असेच सांगायला सुरवात केली.
दोन्ही कुटुंबांनी सुरेश -सुप्रियाशी सबंध तोडून टाकले होते. सुरेश सुप्रियाचा संसार बहरात होता आणि त्याच्या संसारवेलीवर दोन सुंदर फुले आली, सुरेखा आणि सुलेखा. दोन्ही मुली अतिशय सुंदर होत्या आणि आता त्यांच्ये कुटुंब श्रीमंत गणले जात असल्यामुळे अतिशय टापटिपीत होत्या. सुरेश आणि सुप्रिया याना विजातीय लग्नाचा फारसा कुठे त्रास झाला नाही. त्यांना खरा फटका बसला तो सुलेखाचे लग्न ठरवताना. कुठलेही ब्राम्हण स्थळ अथवा उच्चवर्णीय मराठ्याची मुलगी म्हणून स्थळ नाकारू लागले. तर मराठी स्थळं मुलीचे नाव राणे असले तरी बामणाकडची आई असल्याने शहाणवकुळी राहिले नाहीत किंवा कुळाचा पदर घरासला अशी करणे देऊन स्थळ नाकारू लागले. परिस्थिती बिकट होत गेली. सुरेखा आणि सुलेखा याना मात्र या गोष्टीची कल्पनाच नव्हती . सुरेखाचे बीकॉम झाले होते पण तिला शिक्षणाची आवड नसल्याने तिला लग्न करायचे होते. सुलेखा मात्र BA होऊन LLB च्या टर्म्स भारत होती. दोन्ही मुली सुलेखा जास्त हुशार तडफदार आणि बिनधास्त होती.
लहानपणापासूनच तिचा एक पाच जणांचा ग्रुप होता. विवेक , हेमंत, सचिन आणि वरद . यात विवेक ची आर्थिक स्थिती यथा तथाच होती आणि बीए झाल्यावर तो नोकरीला लागला होता. बाकीच्या तिघांचे घरचे व्यवसाय होते आणि गडगंज पैसे होता. त्या तिघांच्या पैशावर हा पाच जणांचा ग्रुप ऐश करत असे. सुलेखाचे लग्न ठरत नाही असे म्हंटल्यावर विवेक स्वतःहून सुलेखाशी लग्न करायला तयार झाला. नकार देण्यासारखे काही नव्हतेच म्हणून लग्न करायचे ठरले. हेमंत, सचिन आणि वरद यांनी लग्नाकरिता बराच पैसे खर्च केला आणि लग्न वाजत गाजत झाले. या लग्नामुळे राणे कुटुंब सुखी झाले. परंतु इकडे विवेकच्या घरी वेगळेच नाट्य रंगत होते.
बिचारी सुलेखा हिंदी पिक्चरमधल्या सुहागरातच्या स्टाईलमध्ये विवेकची वाट पाहत बसली होती. बराच वेळ झाला तरी तो आला नाही. साडेदहावाजता हेमंत, सचिन आणि वरद हे खोलीत आले.
सुलेखाने दचकून हेमंतला विचारले तुम्ही सर्वजण इथे तडफडायला कशाला आलात. जा तुमच्या बावळट मित्राला पाठवून द्या.
'तो येऊन काय करणार?' सचिन
'अरे आज सुहागरात आहे. तुमचे लग्न झाल्यावर तुम्हाला कळेल.' सुलेखा
तेच करायला आम्ही तिघे आले आहोत. तिघे पुढे सरकत म्हणाले.
'आहे तिथेच थांबा आणि विवेकला बोलावून आणा. सुलेखा किंचाळली.
आजूबाजूची लोकं जागी होऊ नयेत म्हणून मित्रांनी विवेकला आणले. आत्तापर्यंत सुलेखाने रणरागिणीचे रूप धारण केले होते. 'विवेक मुर्खा हा सर्व काय प्रकार आहे ?'
माफ कर सलू पण पैशाकरिता मी या तिघांना तुला विकले आहे. ते हवे तेव्हा तुला वापरू शकतील. चिडून, रडून , रागावून काही उपयोग होणार नाही हे सुलेखाच्या लक्षात आले. ती त्या चौघांना म्हणाली दहा मिनिटे तुम्ही माझे ऐका. आज माझ्यावर तुम्हाला बलात्कारच करावा लागेल आणि तसे झाले तर मी तुमच्या चौघांविरुद्ध बलात्काराची केस नोदवीनं. तुमचे बाप बडे असल्यामुळे कदाचित तुम्ही अहमदाबाद मध्ये केस मिटवू शकाल, पण मी हे केस ठाणा , पुणे आणि नाशिकला नोदवीनं . या तीन ठिकाणी तुमचे पालक जाऊ शकतील असे मला वाटत नाही. त्यातून तुमची नाचक्की झाली तर तुम्हाला लग्नाला पोरी मिळणेही कठीण होईल. त्यापेक्षा मी एक सोयीचा मार्ग सांगते तो ऐका.
'तुम्हाला 'एकत्र राहण्याचे अग्रीमेंट' होतात हे माहिती असावे . आपणही एक असेच अग्रीमेंट करू . ' सुलेखा
त्याकाळी गुजरातमध्ये दुसरे लग्न करताना त्याला लग्न न म्हणता द्विभार्या कायद्यातून सुटण्याकरिता चक्क एकत्र राहण्याचे अग्रीमेंट व्हायचे . चारही पोर एकमेकांची तोंड पाहत बसली. परिस्थितीला अशी कलाटणी मिळेल याची त्यांना जाणीव नव्हती. हा बोला आज आपण असेच अग्रीमेंट करू आणि त्यानंतर आपण पक्के अग्रीमेंट करून घेऊ असे म्हणून विवेकला त्यांनी एकाकोरा कागद आणण्याला पिटाळले. कागदावर तारीख टाकून मथळा टाकला, एकत्र राहण्याचे अग्रीमेंट. मग लिहायला सुरवात केली. खाली नमूद केलेले असे म्हणून पाची जणांची नावे टाकली. नंतर कलमे लिहायला सुरवात केली.
पहिल्या तिघांना चौथ्या व्यक्तीशी शारीरिक सबंध ठेवायचे आहेत. या करिता सुरवातीची रक्कम म्हणून प्रत्येकी रुपये अडीच लाख देईल आणि त्या नंतर प्रत्येक जण दरमहा पंचवीस हजार देत राहिल .
महिन्यातून तिघेजण प्रत्येकी एक आठवडा चार क्रमांकाच्या व्यक्तीबरोबर बरोबर असतील . उरलेले दिवस शारीरिक शुद्धीकरिता असतील.
कधी काळी हे अग्रीमेंट बंद करायचे झाल्यास पहिले तिघे प्रत्येकी रुपये पाच लाख क्रमांक चार ला देतील.
क्रमांक पाच या व्यक्तीची या सर्वाला अनुमती आहे.
तिने चौघांना या कागदावर सह्या करायला सांगितल्या आणि त्यानंतर ती त्यांना म्हणाली तुम्ही सर्वानी अडीच लाख रुपये माझ्या अकाउंट मध्ये भरा आणि व्यवस्थित हनिमून प्लॅन करा, मग आपण हनिमूनला जाऊन कार्यक्रमाची सुरवात करू. त्या कागदाच्या दुसऱ्यादिवशी झेरॉक्स काढून त्या चौघांना देण्याचे तिने मान्य केले. दुसऱ्यादिवशी पहाटेच कोणी उठण्याच्या अगोदर सुलेखा आपले काहीही सामान ने घेता पुण्यात शेखरकडे गेली. पुण्याला पोहचेपर्यंत संद्याकाळ झाली होती. त्यावेळी ती धर्याने आणि हुशारीने वागली होती परंतु आता मात्र शेखरकडे आल्यावर तिचे अंग कापू लागले होते आणि दरदरून घाम फुटला होता. शेखरने काही न विचारता तिला जेवायला घातले आणि उद्या सकाळी बोलू तू झोप शांतपणे असे तिला म्हणाला. त्याच वेळेला तिचा अहमदाबाद मध्ये शोध सुरु झाला होता. त्या दिवशी रात्री तिने विवेकला शेखरचा फोन वापरून सांगितले ती सापुताऱ्याला आली असून दुसऱ्यादिवशी परत येत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने शेखर आणि त्याच्या बायकोला सर्व हकीकत सांगितली आणि कागदही दाखवला. शेखरने समर्थ पोलीस ठाण्यातील त्याच्या एक अत्यंत जवळच्या मित्राला, सिनियर इन्स्पेक्टर मोडक याला बोलावून घेतले. चहा नाश्ता झाल्यावर सर्व हकीकत ऐकून मोडक खदा खदा हसू लागला आणि म्हणाला you have done a splendid job . सुलु या नाटकाची सुरवात केलीय याचा शेवट मी कसा करतो हे बघच.
मोडक ने अहमदाबाद मध्ये त्याच्या IPS मित्राला फोन करून सर्व सांगितले. त्याप्रमाणे त्या तिघाच्या पत्त्यावर अहमदाबाद मधल्याच ACP जयशंकर यांनी तिघानवर समन्स बजावले. मोडकनेही पुण्यातले समन्स तिघांना बजावले. तिघांना बजावले तुम्ही माझ्या हॉटेलवर या नाहीतर मला पोलीस पाठवून तुम्हाला अरेस्ट करून आणावे लागेल त्यातून तुमचे अपराध नॉनबलेबेल आहेत. त्यातून मी तुम्हाला कितीही दिवस लोकअपमध्ये ठेऊ शकतो. तिघे धावत मोडक कडे आले. जयशंकर ही उपस्थित होताच. हॉटेलच्या जिम मध्ये हे सर्व नाटक रंगणार होते. आल्या आल्या जिमचे दार पोलिसांनी लावून घेतले त्यांनी नाव सांगताच मोडकांनी त्यांच्या खटखट श्रीमुखात लागवल्या आणि ते गरजले पोरी म्हणजे काय रस्त्यावरची खेळणी वाटतात का ? पोरं पार बावचळून गेली होती. असे काही होईल अशी त्यांची कल्पनाच नव्हती. घरात सांगण्याचीही सोय नव्हती. आलेल्या कॉन्स्टेबल्सनी त्या तिघांना बेड्या घालून बाजूला उभे केले अर्थातच हे नाटक होते. त्यानंतर विवेक आला. त्याने तर भरपूर मार खाल्ला . तो पोलिसांना जेव्हा म्हणाला हे तिघे रेप करणार होते माझा काय सबंध या शहाणपणाचा मोबदला म्हणून त्याला दोन मुस्काडीत आणि पोटात दोन लाथा मिळाल्या वर शिव्या खाव्या लागल्याचं. भडव्या बायकोला धंद्याला लावतो लाज नाही वाटत. त्यापेक्षा आईला आणि बहिणीला लाव ना. त्यालाही बेड्या घातल्या गेल्या. नंतर त्या चौघांना तिथेच ठेऊन जयशंकर आणि मोडक बाहेर जेवायला गेले . त्यानी प्रत्येकी अडीच लाख असे साडेसात लाख सुलेखाच्या अकाउंट मध्ये भरले होते आणि हनीमूनसाठीचा पूर्ण आराखडा तयार ठेवला होता. या सर्व प्रकारामुळे ते भलतेच घाबरून गेले होते. जाता जाता मोडक म्हणाले जेवून येऊन थोडीशी विश्रांती घेतो आणि या चौघांना नेऊ पुण्याला आणि टाकून लॉकअपमध्ये. पोलिसांच्या सायकॉलॉजि मेथड्स फार चांगल्या असतात कोण कशा तर्हेने दबेल हे त्यांना पूर्णपणे माहित असते. दोन एक तासाने परत आले तो पर्यंत हॉटेलच्या नोकरांनी दोन बेड्स तेथे आणून ठेवली होती. बाहेरून येताच जयशंकर आणि मोडक त्या दोन बेडवर आराम करू लागले अर्थातच हे नाटकच होत. चौघांनी वारंवार हाक मारूनही दोघे त्यांच्याकडे बघतही नव्हते. साडेचार पाच वाजता दोघांचा चहा झाला , त्यानंतर त्या चौघांकडे लक्ष गेले परत एकदा सगळ्यांना छानपैकी प्रसाद देण्यात आला. चौघेचजण गया वया करू लागली काहीतरी तोड काढा असे म्हणू लागली. किती खर्च करायला तयार आहेत असे मोडकनी त्या तिघांना विचारले. हेमंत म्हणाला करू एक दोन लाख. हे वाक्य ऐकल्यावर त्याच्या थोबाडीत बसली आणि मोडक गरजले पुण्यावरून आम्ही इथे काय चिंचोके खेळायला आलो काय. मी एकदाच सांगतोय ते ऐका त्या मुलीला पंधरा लाख द्यावे लागतील आणि अग्रीमेंट कॅन्सल करावे लागेल तसेच आम्हाला दोघांना प्रत्येकी अडीच लाख रुपय द्यावे लागतील आणि आमचे जे चार कॉन्स्टेबल आले आहेत त्यांना प्रत्येकी पंचवीस हजार द्यावे लागतील . अशी एकदंर एकवीस लाखाची तडजोड कारवी लागेल. तुमच्यातील कोणी किती द्याचे ते तुमचे तुम्ही ठरवा. आणि यावर निगोसिएशन होणार नाही. आम्ही जर आज तुम्हाला पुण्याला घेऊन गेलॊ तर हा आकडा अजुन पंधरा वीस लाखाने वाढेल. तेव्हा विचार करून सांगा जाताय का राहताय. अर्ध्यातासाने हेमंत म्हणाला साहेब मला तुम्ही सोडा कारण पैशाची व्यवस्था कारवी लागेल . मोडक म्हणाले ठीक आहे पण माझा एक पोलीस तुझ्याबरोबर राहील . दोन तासात सुलेखाच्या खात्यात आणि इतरांच्या खिशात योग्य तो माल गेला आणि सर्वजण सुखी होऊन पुण्याला गेले. सुलेखाने पुण्यालाच राहायचे ठरवले आणि राणे कुटुंब मेहसाण्याला शिफ्ट झाले.