दुःखाला आयुष्य खूप
सुखाला त्याचे अप्रूप...
लोक कवटाळून बसती
जुनी दुःखे युगायुगांची,
विसरून जाती सुखाला
क्षणिक म्हणुनी नाव ठेवती...
दुःखाचे वारूळ मोठे
गहिरे दुःख खोलवर,
छोटीमोठी नाराजी
वारुळात रहाते वरवर...
सुखाचा झरा हंगामी
वाहतो जेव्हा पाऊसपाणी,
खळखळ हसतो वाहताना
हळहळ होते आटताना...
सुखाला दुःखच फार
एकटे असते एकाकी,
दुःखाचे भलतेच लाड
सगेसोयरे त्याचे अपार...
दुःख समजावते सुखाला
जरी सोबती मजला फार
भांडणेचं त्यांची वारंवार,
सुख न नांदे माझ्या दारी
धनी माझा कायम भिकारी...
कधी निमित्त कधी नाहक
डसतो आम्ही यजमानाला,
छळतो देउनी वेदना दाहक
अतृप्त तरी पोखरून घराला...
जरी दीर्घ आयुष्य माझे
अंधारमय आहे ते सगळे,
एक कवडसा सुखाचा
विरवतो अंधार दुःखाचा...
खोल दुःखाच्या डोहावर
अलगद सुखाची एक लहर
उमटवून तरंग आनंदाचे
क्षणाला देते आयुष्य युगाचे...
दुःख सांगून जाते सुखाला
विरह देतो अर्थ जीवनाला
विभक्त आपले असणे जरी
युगायुगांचे आपण सांगाती...
कासव माझा सांगाती या लेखाची
कासव माझा सांगाती या लेखाची आठवण आली.