नमस्कार मंडळी,
माफ करा धागा काढायला जरा उशीर झाला. माझ्या माहितीतील सेवा सुविधांची इथे माहिती देत आहे. इतरांनीही यात भर घालावी ही विनंती.
फेसबुक वर वृद्धांचे पालकत्व म्हणून ग्रुप आहे. अॅक्टिव ग्रुप आहे. या प्रवासात आपल्या सारखे बरेच जण आहेत, आपल्यासारख्याच किंवा त्यापेक्षाही कठीण समस्यांना तोंड देत आहेत, त्यातून मार्ग काढत आहेत हे बघून मनाची उभारी टिकवायला मदत झाली. त्या शिवाय मायबोली आणि मैत्रीण या संकेत स्थळावरील सदस्यांनी वेळोवेळी खूप मदत केली.
आईबाबांसाठी कोतवालवाडी ट्रस्ट तर्फे ट्रेनिंग घेतलेल्या लिव इन केअर गिवर्/सोबत करणार्या होत्या. मंजूडीच्या रेफरन्सने ही सोय झाली.
मी संस्थेचे हे काम करणार्या रश्मी मॅडमशी बोलून त्यांचा फोन नं इथे शेअर करण्यासाठी परवानगी घेतली.
रश्मी मॅडम +९१ ७७९६८४६२२३
त्यांचे ऑफिस नेरळला असल्याने सेल फोन सर्विस तितकीशी खात्रीची नाही. मात्र मेसेज केला तर त्या १-२ दिवसात संपर्कासाठी वेळ ठरवून मग सविस्तर बोलता येते. या मुली शिकलेल्या असतात. लॅब वर्क वगैरेचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असतो. प्रिस्क्रिप्शन नुसार औषधे खरेदी/वेळेवर देणे, ब्लड वर्क साठी लॅब वाल्यांना घरी बोलवणे, डॉक्टरांशी बोलणे वगैरे व्यवस्थित करतात. तुमच्या घरी २४ तास रहाणार तेव्हा जेवून खाऊन +पगार असे असते. पगार डायरेक्ट केअरगिवरला द्यायचा असतो. आम्ही त्यांच्या अकाउंटला जमा करत असू. महिन्यातून काही दिवस सुट्टी घेतात. तेव्हा अॅडजस्ट करावे लागते कारण बदली मदतनीस नसते. मात्र आधी ठरवून मोठी सुट्टी घेणार असल्यास रस्मी मॅडमशी बोलून बदली मदतनीस मिळु शकते. माझ्या मावशीचाही या संस्थेचा अनुभव चांगला होता. मात्र केअर गिवर मुलीचे लग्न झाल्यावर दुसरी लगेच उपलब्ध नसल्याने नाईलाजाने आम्हाला दुसरी सोय शोधावी लागली.
कर्मभूमी केअरटेकर +९१ ९३२६४३६९०० मुंबई-ठाणे-नवी मुंबई भागात असाल तर यांचीही २४ तास लिव इन केअरगिवरची सोय आहे. त्या शिवाय त्यांच्याकडे ८/१०/१२ तास असे शिफ्ट मधे काम करणारे स्त्री-पुरुष दोन्ही आहेत. मात्र हा ब्युरो आहे. त्यामुळे बील ब्युरोला जाते मात्र केअरगिवर रजा घेते तेव्हा बदली केअरगिवर मिळते . सध्या माझ्या मावशीकडे यांच्यातर्फे केअरगिवर आहे.
आम्ही आजी केअर यांच्याकडेही चौकशी केली होती. आम्ही आईसाठी त्यांची एल्डर बडी ही सर्विस वापरली होती. मात्र आईला सुट न झाल्याने रद्द केले. त्यांच्या https://aajicare.in/ या संकेतस्थळावर त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांची माहिती आहे. यांच्याकडे संपर्कासाठी मेसेज केल्यावर लगेच उत्तर दिले गेले.
आईबाबांसाठी डॉक्टर होमविझीट साठी आम्ही जेष्ठ केअर यांची सर्विस वापरली. https://jyeshthacare.com/
मायबोलीकर एव्ही कडून यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्याचे डॉक्टर घरी येतात आणि डॉ. ठाकूर हे जेरिअॅट्रिक स्पेशॅलिस्ट विडीओ कॉलवर जॉईन होतात. एक वर्षभर आम्ही त्यांची सर्विस वापरली. मी इथून विडीओ कॉलवर जॉईन होत असे. डॉ. ठाकूरांची ठाण्यात कंसल्टिंग रुमही आहे. पेशंटचे नातेवाईक गरज पडल्यास तिथे जाऊन पुढील केअर प्लॅनसाठी मार्गदर्शन घेवू शकतात.
संपर्क सुनील भालेराव म्हणून आहेत. +९१ ८९२८९५२७२५ सर्व व्यवस्थित हँडल करतात. संपर्कासाठी मेसेज केल्यावर लगेच उत्तर येत असे. त्यांच्याकडे केअरगिवर, फिझीओ थेरपीस्ट वगैरे सुविधा देखील आहेत मात्र आम्ही त्या वापरल्या नसल्याने प्रत्यक्ष अनुभव नाही.
आईबाबांसाठी अनामय हेल्थ ची डिपेंडंट /असिस्टेड लिविंग सेंटर निवडले ते बाणेरचे. त्यांचे दुसरे सेंटर नेरुळ येथे आहे.
नेरुळच्या सेंटरला स्वत:चे स्वतः करु शकणारे आणि असिस्टेड्/डिपेंडंट लिविंग अशी दोन्ही प्रकारची सोय आहे. प्रत्यक्ष भेट देणे शक्य नसेल तर ते विडीओ टूरही अॅरेंज करतात. संपर्क +91 8948424242
तपस म्हणून पुण्यात संस्था आहे. नात्यातील व्यक्तीकडून यांच्याबद्दलही खूप चांगले ऐकले आहे. मात्र मी संपर्क केल्यावर त्यांनी मला वेबसाईटचा अॅड्रेस दिला. प्रत्यक्ष बोलण्यासाठी वेळ ठरवायची होती तर सकाळी बोलता येइल असा मेसेज आला मात्र फोन केल्यावर कुणी उचललाच नाही. मे बी कनेक्शन नीट नसावे.
या सर्व माहितीबद्दल धन्यवाद _
या सर्व माहितीबद्दल धन्यवाद _/\_
पुण्यामध्ये गेली ३ वर्षे
पुण्यामध्ये आई वडिलांसाठी गेली ३ वर्षे आम्ही असिस्ट फॉर पॅरण्ट्स ही सर्विस वापरतो. https://assist4parents.com/
आम्हाला चान्गला अनुभव आहे.
आम्ही घेतलेल्या प्लॅन मध्ये त्यांचा एक ठरलेला/ली (असाइन्ड) मदतनीस आठवड्यातून एक दिवस ४ तासांसाठी येतो/ते. त्या चार तासात बँकेत वा दुकानात जायला सोबत, डॉक्टरांच्या अपॉइन्टमेंट घेणे/बरोबर जाणे, गप्पा/वेलनेस चेक वगैरे करतात. तसेच इमर्जन्सीमध्ये त्यांना फोन केला की अँबुलन्स बोलावणे, बरोबर हॉस्पिटलला जाणे, सुरुवातीचे अॅडमिशन वगैरे सोपस्कार ते करतात. इमर्जन्सीमध्येही त्यांचा चांगला अनुभव आला होता.
खूप खूप धन्यवाद, स्वाती!
खूप खूप धन्यवाद, स्वाती!
खूप उपयोगी धागा. इथे सगळी
खूप उपयोगी धागा. इथे सगळी माहिती टाकल्याबद्दल धन्यवाद स्वाती.
खूप उपयोगी धागा. इथे सगळी
खूप उपयोगी धागा. इथे सगळी माहिती टाकल्याबद्दल धन्यवाद स्वाती.>>>>> +१
आईबाबा रुळले का तिथे?
खूप उपयोगी धागा. इथे सगळी
खूप उपयोगी धागा. इथे सगळी माहिती टाकल्याबद्दल धन्यवाद स्वाती. >> +१११
स्वयंपाक करणारी बायां
स्वयंपाक करणारी बायां प्रोवाईड करणारी संस्थांचे नंबर आ़हेत का कोणाक्व्डे?
ठाणे/ नवी मुंबईत हवे आहेत एकांना
चांगले संकलन.
चांगले संकलन.
आणखी काही -
शंतनु नायडूचे https://www.thegoodfellows.in/
https://dignityfoundation.com/
फेसबुकवर मुंबईच्या उपनगरांसाठी , किंवा अगदी कॉलनीचे फेसबुक ग्रुप्स आहेत. तिथेही माहिती मिळू शकते.
धन्यवाद स्वाती हा धागा
धन्यवाद स्वाती हा धागा काढल्याबद्दल.
धन्यवाद स्वाती हा धागा
….
या संकलनाबद्दल धन्यवाद
या संकलनाबद्दल धन्यवाद स्वाती२.
मी गेल्या आठवड्यात कल्पवृक्ष
मी गेल्या आठवड्यात कल्पवृक्ष या संस्थेला भेट दिली. ऑर्किड हॉटेल समोर, म्हाळुंगे. पुण्यात त्यांच्या चार शाखा आहेत. माझ्याकडे फोन नंबर नाही.
माझ्या मित्राची आई तेथे आहे. त्यांची तब्येत तेथे ठेवल्यावर लक्षणीय सुधारली. घरी नीट मॅनेज होत नव्हते. मित्राचा अनुभव खूप चांगला आहे.
आपल्याला वृद्धांना संभाळण्याचा अनुभव नसतो. ते एक वेगळे शास्त्र व कला असते हे लक्षात घ्या. कितीही वाईट वाटले तरी काही बाबतीत तो सर्वांच्या दृष्टीने आवश्यक व उत्तम पर्याय असतो.