अश्रूंची झाली फुले

Submitted by अविनाश जोशी on 15 April, 2025 - 08:31

अश्रूंची झाली फुले

लोंबकळणाऱ्या मंगळसूत्राशी मृदुला खेळत बसली होती. गेल्याच आठवड्यात ती हरिहरेश्वरला सहलीला गेली होती. निसर्गाचे रौद्र स्वरूप पाहून तिला भीती वाटत होती. असंख्य प्रेमी जीवांनी जीवनाचे स्वप्न बघितलेल्या या भरतीच्या लाटा, पण याच भरतीच्या लाटा पाण्याने कातळ फोडू शकतात हे तिने प्रथमच पहिले. जीवन असलेला समुद्र जेव्हा हजारो मासे भरती बरोबर बाहेर टाकून देतो, त्यावेळेस त्यांचा आधार नाहीसा होऊन हजारो मासे काठावर मृत्युमुखी पडलेली तिने गेल्या आठवड्यातच पहिली.

अशाच घोंगावणाऱ्या लाटा तिच्याकडे येत आहेत आणि काही दिवस तरी तिचे जीवन उध्वस्त होणार आहेत अशी तिला कल्पना नव्हती. हरिहरेश्वरच्या सहलीच्या दुसऱ्याच दिवशी तिचा बालमित्र अजितबरोबर औरंगाबादला लग्न झाले. घेतलेल्या शुक्रवार पेठेतील एका छोट्या खोलीत दोघांनी राजाराणीचा संसार थाटला होता.
भरकटत तिचे मन कित्येक वर्षा पूर्वीच्या प्रसंगावर स्थिर झाले. अजित हा राणे यांचा तिसरा मुलगा तर मृदुला हि माने यांची एकुलती एक मुलगी. माने आणि राणे हे शेजारी शेजारीच राहत होते. जातीत बराच फरक असूनही दोघांची घट्ट मैत्री होती. तीच मैत्री मृदुला आणि अजित यांच्यातही उतरली होती. एकमेकांशिवाय दोघांना करमत नसे. सर्व सण, उत्सव एकमेकांच्या घरीच साजरे होत. दोघांचेही सय्यदनगरात शेजारी शेजारी छोटेखानी बंगले होते. मृदुलाला ते दिवस आठवत होते. त्या केलेल्या भातुकली, अजितशी केलेल भांडण आणि शेवटी झालेले समेट या गोष्टीतून ती जाताच होती. मृदुलाची आई एका राज्य सरकार खात्यात होती. आणि तिचे चार मामा अलीकडे पलीकडे सय्यदनरमध्येच राहत होते. सर्व काही गोष्टीतील जीवनासारखे चालले होते.
अखेर तिला ती काळरात्र आठवली. त्या दिवशी राणे आणि माने दोघांच्याही घरचे न ऐकता मोटरसायकल घेऊन खामगावला गेले होते. फार संद्याकाळी पर्यंत न येण्याविषयी आणि रात्र झाली तर खामगावला राहण्याबद्दल दोघांच्याही घरी निक्षून सांगितले होते. पण ड्राइविंगच्या बाबतीत आपला स्वतःवरचा कॉन्फिडन्स फारच असतो आणि टुव्हीलरच्या बाबतीत तर जास्तच असतो. संद्याकाळपर्यंत दोन्ही घरी शांतता होती. साडेआठ वाजल्यावर दोन्ही घरात थोडीशी चिंता सुरु झाली. त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते आणि खामगावच्या घरी लँडलाईन नव्हते. त्यामुळे दोन्ही घरी ते खामगावलाच राहिले असावेत अशी कल्पना झाली. रात्री दोन वाजता बेल वाजली, मृदुलाच्या आईने दार उघडले. दारात पोलीस उभे होते. ती घाबरली पोलिसानी विचारले संतोष माने येथेच राहतात का ? आई ने होकार देताच ,पोलीस म्हणाले, आम्ही हायवे पोलीस आहोत. खामगावच्या पुढे एका ट्रक ने एका टुव्हीलरला उडवले आहे. आणि त्यात माने आणि राणे हे दोघेही जागच्या जागी ठार झाले आहेत. पोस्टमार्टम नंतर त्यांची प्रेते वडनेर हॉस्पिटल मध्ये मिळतील. हा गुन्हाही वडनेर पोलीस ठाण्यात आम्ही दर्ज केला आहे. प्रेत ताब्यात मिळायला अजून दोन दिवस लागतील. हे ऐकल्यावर मृदुलाची आई बेशुद्धच पडली आणि पोलिसांनी शेजारच्या घरातही जाऊन ही वार्ता सांगितली. दोन्ही घरे दुःखात पार बुडून गेली. मृदुलाच्या मनाला पप्पा आहेत आणि आता नाहीत अशी सुप्त जाणीव झाली होती. त्यामुळे होणारे आर्थिक , सामाजिक, कौटुंबिक बदल तिला फारसे समजले नव्हते. कोणीही पुरुष माणूस घरात नसल्यामुळे मृदुलाच्या घरी तिच्या मामांची आणि आत्याची उठ बस साहजिकच वाढली.

आत्तापर्यंत शांत असलेल्या दोन्ही घरातून वातावरण तापू लागले. आता मृदुलाच्या घरात मामांची सत्ता सुरु झाली. मामाच्या दृष्टीने माने मराठा कुणबी होते आणि राणे भटक्या जमातीतील होते त्यामुळे त्यांचा दर्जा कितीतरी खालचा होता. अशा दोन घरात खाणे, पिणे, एकत्र राहणे आणि हा व्यवहार होणे इष्ट नव्हते. जातीच्या मुद्द्यावरून त्या दोन घरात भांडणे झाली आणि त्याचे पर्यवसान म्हणजे दोन्ही घरातील लोकांनी एकमेकांशी संबंध पार तोडून टाकले. राणे कुटुंब पाच मैलावरील त्यांच्या गावी राहण्यास गेले आणि माने कुटुंब तेथेच राहू लागले. या ताटातुटीत मृदुला आणि अजित यांचीही ताटातूट झाली होती आणि दोघांनाही एकमेकांना भेटण्याची, बोलण्याची ओढ वाटू लागली. किंबहुना असे म्हणता येईल कि या ताटातुटीमुळेच मृदुला आणि अजित यांचे प्रेम वाढीस लागले. त्यावेळच्या चोरट्या भेटी एकमेकांच्या मित्र मैत्रिणीबरोबर पाठवलेले निरोप हे लक्षात घेऊन मृदुला स्वतःशीच खुद्कन हसली. काही दिवसांनी अजित बीई झाला आणि त्याला पुण्याजवळच्या एका कारखान्यात नोकरी लागली. मृदुलापण MSC कॉम्पुटर झाली आणि ती त्याच गावात क्लास मध्ये शिकवू लागली. दोघांचेही आता पत्रांद्वारे भेटणे सुरु झाले. पत्र अर्थातच मैत्रिणीच्या घरी. काही दिवसातच तिलाही पुण्यातल्याच एका संगणक कंपनीत नोकरी लागली आणि तिचा आनंद फारच वाढला.

पुण्यात आता दोघांच्या वरचेवर भेटी होऊ लागल्या आणि दोघांनीही लग्न करण्याचे ठरवले. घरून परवानगी मिळणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्या दोघांनी २१ वर्ष असल्याची सर्टिफिकेट मिळवली आणि रजिस्टर मॅरेजकरिता औरंगाबादला नोटीस दिली . हरिहर सहलीच्या दुसऱ्यादिवशी दोघांनी औरंगाबादला लग्न केले. तिच्याकरिता मंगळसूत्र, हिरवा चुडा आणि जोडवी तयारच होती त्यामुळे तिचे रूप फारच खुलले होते. लग्नाला दोघांचे मित्र हजार होते आणि बरीच फोटो सेशन्स, मॅरेज सर्टिफिकेट असे सर्व सोपस्कार छान झाले आणि अश्या रीतीने शेवटी मृदुला मान्यांची राणे झाली, सात दिवस कसे गेले हेही तिला कळले नाही.
विचारात ती फार हरवून गेली होती त्यावेळेस दरवाज्याची कडी वाजली. घरात ओट्यावर थोडी भांडी, दोन बसायच्या खुर्च्या आणि एक पेटीमध्ये थोडे कपडे आणि थोडे सामान एवढीच त्यांची सध्या मालमत्ता होती. त्यांचे घर कुणाला माहित नव्हते त्यामुळे कोण आले असावे असा साहजिकच तिच्या मनात प्रश्न आला. दरवाज्याची काडी उघडताच तिला आश्चर्याचा धक्का बसला होता आणि तिचा सख्खा लहान मामा आला होता. त्याला सगळे दगडू मामा म्हणत . ती आनंदाने चित्कारली. या दगडू मामा तुम्हाला कसे घर सापडले ? दगडू मामानी दाराला आतून काडी घातली आणि तिच्या केसाला धरून तिला एक जोरात थोबाडीत दिली आणि ते म्हणाले ' काय का भडवे आपल्या जातीतील सगळी मुले मेली काय ?' मृदुलाने उत्तर फक्त हुंद्क्यानेच दिले. ती पूर्णपणे घाबरून गेली होती. मामांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून काढले आणि सर्व गॅसच्या आगीत जाळून त्याचा कचरा तिथेच टाकून दिला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्च्या पेटीकडे वळवला. त्यातून मॅरेज सर्टिफिकेट, फोटो काढून टराटरा फाडल्या , त्याही गोष्टी शेवटी होमात टाकल्या गेल्या. मृदुला अजूनही भितीनी थरथर कपातच होती. हे काय चाले आहे हे तिच्या लक्ष्यात येत नव्हते. हा सगळं होम झाल्यानंतर मामांनी तिला हाताला धरून बाहेर काढले, कुलूप लावले आणि किल्ली खिडकीतून आत टाकली. चेहऱ्यावर रडू आणल्यास भर रस्त्यात तिला ठार करण्याची धमकी तिला दिली. त्यांनी सय्यदनगरवरून खास मोटार तिच्याकरिता आणली होती. त्याच्यात तिला कोंबून तिच्या शेजारी बसले आणि ड्राव्हर ला म्हणाले 'चलो उस्मान चाचा अपना माल तो मील गया' .
गाडी सुरु झाली पण तिचे मन भलतेच पडले होते. सहा वाजता अजित येईल त्याच्याकडे किल्ली आहे त्यामुळे तो दार उघडून आत जाईल तिथे सगळं जाळपोळ पाहून त्याला काहीच कळणार नाही आणि मामा आल्याचे त्याला अजिबात कळणार नाही. पुढचे धिंडोरे काय निघतात हे बघत राहायचं. घरी पोहचले तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. घरात आई ,चार मामा, त्यांच्या बायका, आत्या, आजोबा आणि जातीतील काही मंडळी तिची वाटच पाहत होती. मृदुलाने जाणले होते कि काहीही झाले तरी रडत बसायचे नाही . आज तिने सकाळपासून काही खाल्ले नव्हते . घरी येताच सगळॆ जण तिच्यावर तुटून पडले. शिव्यांचा भडीमार सुरु झाला . शांतपणे तिने चपला काढल्या आणि देवाला नमस्कार केलाआणि तिच्या अंगावर आलेल्या सर्वाना ती म्हणाली , 'मला माझ्या घरातून जबरजस्तीने उचलून आणून येथे बसवले आहे आणि तुम्ही सगळे थोर लोक माझ्यावर प्रश्नाचा भडीमार करत आहे. नंतर तिने व्यवस्थित जेऊन घेतले. जेवण झाल्यावर सर्वांसमोर उभे राहून ती म्हणाली माझे आणि अजितचे पूर्वीपासूनच प्रेम आहे. आम्ही दोघेही एकवीस वर्षाचे सुज्ञ आहोत आणि कायद्याने लग्न करण्यास आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही. तुम्ही परवानगी दिली तरी उत्तम, नाही दिली तरी उत्तम. यावर दगडू मामा तिला म्हणाला तू खाल्यच्या जातीत केलेलं लग्न आम्हाला कुणालाच पसंत नाही. परिवारातील तू सगळ्यात मोठी मुलगी आहेस, तुझ्या या लग्नामुळे इतर कोणाची लग्न होणे शक्य नाही. ती उसळून म्हणाली कुठल्या उच्च जातीचे दाखले देता ? तुमच्या उच्च जातीत नववधूची सर्व लग्न चिन्हे काढून जाळून टाकणे यात तुम्ही कोणता धर्म पळता ? दगडू मामा तिला म्हणाला, पण तुझे लग्न आम्हाला मान्य नाही ' . 'पण कायद्याला ते मंजूर आहे आणि आम्ही नवरा बायको आहोत हि गोष्ट तुम्ही टाळू शकणार नाही. तीच्यावर भरपूर टीका होत होती पण तिने कशालाही उत्तर दिले नाही. शेवटी तिला सांगितले कि हे लग्न आम्हाला मान्य नाही तुझ्याकरिता आम्ही जातीतला दुसरा मुलगा पाहत आहे. तिला अकोल्याला आत्याकडे ठेवण्याचे ठरले कारण तो पत्ता कोणाला माहित नव्हता. तिचा मोबाईल घेतला होता आणि अकोल्यातील बंगल्यातील फोन मधून तिला कुठलाही फोन करता येणार नव्हता. तिच्या बाहेर जाण्यावर बरीच नियंत्रणे आली होती.

अजित घरी आला त्यावेळेस रात्र झाली होती आणि त्याला प्रचंड भूकही लागली होती. घरी आला तर दाराला कुलूप. त्याच्याकडील किल्लीने कुलूप उघडून तो आत गेला. आत धुराचा वास येत होता आणि बरीच जाळपोळ झाल्याचे त्याला दिसत होते. त्याला काय झाले याचा अंदाज आला होता पण कोणी केल हे माहित नव्हते. आजूबाजूला ओळख ही नव्हती. त्यामुळे त्याला कोण आले हे कळणे शक्य नव्हते. परंतु कोणीतरी नातेवाईकाने तिला परत सय्यदनगरला नेले असावे असे त्याने पक्के केले.

त्याने एकदा फोन लावून बघितला तर मृदुलाचा फोन बंद होता. मेसेज पण नव्हता . बायको सय्यदनगर मध्येच असणार अशी त्याची खात्री होती. जवळच्या मित्रांना सगळी हकीकत सांगून त्यांना मदत करण्याबद्दल विचारले. पुढच्या दोन तीन दिवसात त्याने मॅरेज सर्टिफिकेट, दोघांचे बर्थ सर्टिफिकेट, लग्नातले फोटो अशी कागदपत्रांची जुळणी केली नंतर रीतसर समर्थ पोलीस ठाण्यात जाऊन त्याने बायकोला पळवून नेल्याची तक्रार नोंदविली. तक्रारींबरोबर सर्व कागदपत्रे त्याने पोलीसना दिली. माहेरच्या लोकांनी तिला पळवली असेल असा संशय व्यक्त केला. त्यानंतर त्याने व त्याच्या मित्राने पुण्याच्या बाहय भागात असणाऱ्या नवीन मोठ्या संकुलाची पाहणी केली होती. पुणे दिवे घाट रस्त्यावर एका अति भव्य संकुलात त्यांना एका मित्राची जागा आढळली. मित्र तेथे राहत नव्हता तर त्याने इन्व्हेस्टमेंट म्हणून ती जागा घेऊन ठेवली होती. जागेचा प्रश्न सुटला असला तरी बायको कुठे आहे हे कळले नव्हते.
तिकडे मृदुलाला स्थळे दाखवण्यात येऊ लागली. पहिली काही स्थळे घरच्यांनीच नाकारली. नंतर आलेले एक स्थळ श्रीमंत होते, मुलाला चांगली नोकरी होती व त्याला मृदुला आवडली होती असे वाटले. मृदुलाची त्याने खाजगी एकांतात बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस मृदुला चटकन त्याला म्हणाली तुमचा होकार आहे हे मला कळते परंतु मी विवाहित आहे घरच्यांना हे लग्न पसंत नसल्यामुळे त्यांनी मला डांबून ठेऊन हे सर्व सुरु केल आहे. कृपया मला मदत करा . माझ्याकडे येथे फोन नाही. परंतु तुम्ही मला कसे कळवायचे हे बघा . अजून पाच दहा मिनिटे जुजबी बोलून दोघेही घरात गेले. घरातील सर्व लोक खुश झालेली वाटली. आलेल्या मुलाचे नाव प्रसाद होते. तो त्यांच्याच जातीतला होता आणि त्याने योग्य शिक्षण घेऊन त्याला चांगली नोकरीही होती. निघताना प्रसाद घरच्यांना म्हणाला, 'हे बघा मला आज वेळ नाही परंतु मी आठ दहा दिवसात येऊन परत एकदा मृदुलाशी सविस्तर चर्चा करेन आणि त्यानंतर तुम्हाला पुढचे ठरवता येईल येण्याच्या आदल्या दिवशी मी फोन करून तुम्हाला कळवेन'. घरचे खुश होऊन गेले. मृदुला सोडून बाकीच्या सर्वाना लग्न जमणार अशी खात्री वाटू लागली.
सहा-सात दिवसांनी त्याचा दुसऱ्यादिवशी येत आहे असा फोन आला. मधल्या काळात प्रसाद ने अजित बरोबर संपर्क साधला होता आणि त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे अजित प्रसाद बरोबर अकोल्याला येणार होता. अजितने त्याची टुव्हीलर प्रसादच्या जालना जवळील एका गावात ठेवली होती आणि प्रसादच्या कारमधून ते अकोल्याला जाणार होते. घरापासून दूरच उतरून प्रसाद एकटाच मृदुलाला भेटण्यास जाणार होता. काही वेळ थांबून , थोड्यावेळाने प्रसाद मृदुलाला घेऊन आणि अजितला घेऊन अतिवेगाने आपल्या गावाला येणार होता. गावाला येताच न थांबता अजित मोटरबाईक घेऊन त्याच्या नवीन जागेत राहण्यास जाणार होता. सकाळी अकरा वाजता अकोल्याहून प्रसाद आणि मृदुला कार घेऊनबाहेर पडले. त्यावेळी घरातील सर्व टाटा करायला जमले. मृदुलाही आनंदात दिसत होती. घरच्यांना वाटले तिला प्रसाद आवडला असेल. पाच मिनिटात अजितलाही गाडीत घेऊन गाडी भरधाव वेगाने प्रसादच्या घरी निघाली. प्रसाद ने स्वतःचा आणि अजितने त्याचा फोन बंद ठेवला होता. प्रसादच्या घरच्या आग्रहाला न थांबता दोघांनी नुसतेच श्रीखंड पुरीचे भोजन केले आणि दोघेही पुण्याला जाण्यास निघाले. मोटरबाइक अजितच्या मित्राची होती. एक वाजेपर्यंत वाट पाहून घरच्यांनी प्रसादला फोन लावायचा प्रयत्न केला परंतु तो बंद होता. त्यानंतर त्यांनी त्याच्या घरी फोन केला. त्याला वेळेस प्रसाद झोपला होता, निदान घरच्यांनी तरी असे सांगितले. दोन वाजता घरच्यांचा धीर सुटला आणि त्यांनी प्रसादला उठवण्याची विनंती केली. प्रसादने उठण्याचे सोंग करत फोन घेतला ' काय मामा ? लगेच फोन केलात अहो दोन तीन दिवसात लग्नाची बोलणी करायला वडील येतील'. मामाचा धीर पार सुटला होता. ते म्हणाले मृदुला तुझ्या बरोबर नाही ? ' मामा अहो मृदुला लग्ना अगोदर सासरी कशी येईल ? ती कुठे आहे ?
'मला काय माहित ? मी तिला बाराच्या सुमारास माझ्या कार ने तुमच्या घराजवळच्या कोपऱ्यावर सोडले. पुढचा रास्ता वनवे असल्यामुळे मृदुला म्हणाली मोठा वळसा घालण्यापेक्षा तुम्ही मला इथेच उतरावा आणि तुम्ही घरी जा. त्याप्रमाणे मी केले. हे ऐकल्यावर घरच्यांचा धीर सुटला. मुलगी काहीतरी करून पुण्यास गेली असे त्यांना कळून चुकले. दोन तीन तास वाट पाहून ते जवळच्या पोलीस चौकीत मुलगी हरवल्याची कंप्लेंट देण्यास गेले. कंप्लेंट लिहून घेण्याऐवजी पोलिसांनी मामांना अटक केली. लंग्न झालेल्या मुलीला तुम्ही आणि तुमच्या नातेवाइकांनी पळवून आणल्याची तक्रार पुण्यात समर्थ पोलीस स्टेशनला नोंदली गेली आहे. त्यामुळे तुम्हाला अटक करून पुण्यास न्यावे लागेल. त्यातले दोन पोलीस त्यांच्या घरी गेले . घरच्या सर्व लोकांना त्यांनी दम भरला आणि त्यांनी परत असे केले तर सगळ्यांना लॉकप मध्ये टाकण्यात येईल अशी धमकी दिली. पोलीस गेल्यावर आपण काहीतरी करू अशी चर्चा होऊ लागली. त्या दिवशी काही करणे शक्य नव्हते कारण रात्र होत आली होती. आणि शेवटी त्यांनी त्या कुटुंबाशी कुठलाही सबंध ठेवायचा नाही असे ठरले.
मृदुला त्यांच्या नवीन घरात आली. तिची अवस्था एखाद्या भ्रमिष्टासारखी झाली होती परंतु तिचा अजितवरचा विश्वास प्रचंड वाढला होता. तो म्हणाला तू तिथे आहेस असे आम्हाला कालच कळले होते, पण तुला बाहेर कसे काढायचे ही आमच्या पुढे समस्या होती. पण प्रसादने सर्वच व्यवस्थित केले. त्याच्या रूपाने तुला देव माणूसच भेटला. दोघांनी प्रसादला पुण्यास पोचल्याचे कळवले आणि पुण्यास येण्याचे निमंत्रण दिले.

मृदुला पुण्यात अजित बरोबर आली पण पुढे काय हा प्रश्न दोघांपुढेही होता. पुढच्या जीवनासाठी दोघांनाही नोकरी करण्याची आवश्यकता होती परंतु एकदा झालेला प्रसंग परत होण्याची शक्यता त्यांच्या मनात घर करून होती. अजितची नोकरी खाजगी असल्यामुळे दुसऱ्या गावाला बदली मिळणे असे काही शक्य नव्हते. दोघेही चिंताग्रस्त अवस्थेत त्या घर संकुलात राहू लागली. दोघांनीही आपल्या फोन चे नंबर बदलले होते. मृदुला पण एका छोट्या कंपनीत नोकरीला होती. आणि तिला जरी तिथे परत घेतले असते तरी तिला तिथे जायची भीती वाटत होती. इकडे त्या कंपनीत मृदुला विषयी चर्चा चालूच होती. ऑफिसातील अजून एका मुलीला ती पुण्यातील तुळशीबागेत ओझरती भेटली होती. तिने आपण फक्त आनंदनगर मध्ये राहतो असे सूचित केले होते. बोलतानाही ती अतिशय भयभीत वाटत होती आणि भर थंडीतही तिला दरदरून घाम फुटला होता. ऑफिसातील शेखर आणि क्रांती यांनी तिला भेटायचे ठरवले. दोघे आनंदनगर मध्ये आले. तिथे गेटवर सांगितले दोनशे फ्लॅट असलेल्या एका सोसायटीत सात आठ फ्लॅटमध्येच लोक राहतात. त्यांनी त्या बिल्डींग्स दाखवल्या. एका इमारतीत चार फ्लॅट मध्ये लोक आली होती त्यांनी ती बिल्डिंग पाहायचे पहिल्यांदा ठरवले. पहिला आणि दुसरा मजला रिकामा होता. तिसऱ्या मजल्यावर दोन फ्लॅट मध्ये लोक होते पण मृदुलाविषयी कोणालाच माहित नव्हते. तिसऱ्या मजल्यावर पहिल्या फ्लॅट मध्ये त्यांना असे कळले कि शेजारच्या फ्लॅट मध्ये एक आजारी मुलगी राहते. दोघांनी फ्लॅटची बेल दाबली. बेल चा आवाज बाहेर ऐकू येत होता पण कोणीही दरवाजा उघडला नाही. थोड्यावेळाने पोलीसआयवर कोणीतरी पाहत असल्याचे दिसले परंतु दरवाजा उघडला नाही. क्रांती 'मृदुला आम्ही दोघेच आहोत दार उघड'.
क्रांती ने आणि शेखर ने बऱ्याच वेळ तिला समजावल्यावर तिने दार उघडले. अगोदरच नाजूक असलेली मृदुला या सर्व धक्क्यात पार वाळून गेली होती. खरोखरच जोरात वारा आल्यावरही ती उडून गेली असती. तिने सांगायला सुरवात केल्यावर शेखर तिला म्हणाला 'हे सर्व आपण नंतर पाहू. तू ऑफिस मध्ये रेगुलर यावं असं मला वाटत. मी आणि सुजय असताना ऑफिस मधून किंवा ऑफिसच्या परिसरातून तुला हात लावायची कुणाची ताकद नाही. दहा बारा दिवस तुला येथून ऑफिस मध्ये आणि ऑफिस मधून परत असे कोणीतरी सोडेल. तू अजितला विचारून त्याचा होकार कळवं. अशीच तू येथे बसून राहिलीस तर तू वेडीही होशील आणि आजारीही पडशील. मग काही दिवसांनी तुझ्यावर फुलं टाकायला आम्हाला यावं लागेल असा निरोप अजितला सांग.
अजितला तिची चिंता होतीच. तिचे घरात बसने भीतीदायक वाटत होते परंतु काही मार्ग सापडत नव्हता. त्याने तात्काळ होकार दिला. त्याप्रमाणे ऑफिस मधील कोणी कर्मचारी तिला दुचाकीवरून आणत होता आणि परत सोडत होता. दोन आठवड्याने तिचा धीर आल्यावर तिने स्वतःच बस ने किंवा ऑटोने येणास सुरवात केली. नंतर शेखरने तिला सांगितले इतक्या लांबून ये-जा करण्यापेक्षा तुम्ही या परिसरात जागा बघा. अजितला ही लांब पडत होते. त्याने तातडीने जागा शोद्यायाला सुरु केली. एक जागा अतिशय आवडली, भाडेही त्याला परवडले असते पण मालक तीस हजार डिपॉजिट मागत होता. मृदुलाने शेखरला हे सांगितले . तो तिला घेऊन त्या इमारतीच्या मालकाकडे गेला तो त्याच्या ओळखीचा निघाला . शेखर त्याला म्हणाला, 'चंद्या हि माझी मुलगी आहे. तुला तीस हजार कसले पाहिजेत ?' तो म्हणाला पहिल्या भाडेकरूला दहा हजार द्यायचे आहेत. शेखरने तिथल्या तिथे दहा हजार त्याला देऊन टाकले आणि मृदुलाला म्हणाला तुमच्या संसारात काहीच नाहीये त्यामुळे एका दिवसात सामान इकडे येऊ शकते . हा परिसर मध्यवर्ती होता आणि सर्व सुख सोयी हाकेच्या अंतरावर होत्या. आता मृदुलाची भीती कायमची गेली. त्यांचा संसार सुखाने चालू झाला .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users