चंद्र, चांदण्यासाठी

Submitted by Kalpesh Gaikwad on 11 April, 2025 - 12:48

हसतात फार लोक दुःख लपवण्यासाठी
हुंदका दाबला‌ होता रडू रोखण्यासाठी
निजलेल्या मनाचा विचार कोण करेल
भांडतात लोक अरे! उत्तरे पुसण्यासाठी
रे! मिळवतात काय माणसे आयुष्यभर
टाकतात लाकडे मढ्यावर जळण्यासाठी
रस्ता , घर , जमीन, जंगल, पैसा, पाणी
धडपड चालू आहे पुढे कमवण्यासाठी
जिंदगी अशी असते एकटी मरण्यासाठी
नाते‌ शेवटी असते कधीमधी भेटण्यासाठी
किती वागा गोड‌ गे! किती बोला चांगलेच
बोट नेमके ‌तेथेच येते पोटासाठी दारासाठी
हिशोब माझा गतकाळाचा हा! जुनाट आहे
नोंद‌‌ थोडकी तेथेच आहे चंद्र, चांदण्यासाठी

Group content visibility: 
Public - accessible to all site users