ढेरी पॉमपॉम
----------------------------------------------------------------------------------
माझी आई मला ना ढेरी पॉमपॉम म्हणते . असं म्हणतात का एखाद्याला ? आता आहे माझी ढेरी पॉमपॉम ! थोडीशी मोठी . थोडीशी गोलगोल .
मला नाही आवडत असं . ती ना थोडीशी खोडकर आहे . पण काय करणार ? आईसाहेब आहेत ना . हा शब्द मी कुठून घेतला ? तर - बाबा तिला बाईसाहेब असं म्हणतात .
अन गंमत सांगू ? - खरं तर बाबांची ढेरी तर जाम पॉमपॉम आहे . मग ती त्यांना असं म्हणत नाही ते . पण मी म्हणते बरं का बाबांना - ए ढेरी -ए पॉमपॉम ! पण ते ना माझ्यावर रागवत नाहीत .
पण एकदा गंमत झाली . आई त्यांनाही म्हणाली - ढेरी पॉमपॉम ! बाबा फक्त हसले . म्हणाले - असं आहे काय ? आता मी व्यायाम करतो . आणि जादू - पोट आत !
ते असं म्हणतात . करत काहीच नाहीत . मला माहितीये ना . पण एक गोष्ट आहे . आई त्यांना असं म्हणाली , ते मला नाही आवडलं .
पण देवाला सगळं कळतं . दुसऱ्यांना त्रास दिला की तो ... बरोबर शिक्षा करतो !
आणि मला असं लक्षात आलं की आईची ढेरीपण पॉमपॉम झाली आहे . पण मी काही बोलले नाही . आणि बापरे ! ती ढेरी पॉमपॉम झाली आणि आणि - ती पॉम पॉम पॉम झाली !
तेव्हा मला राहवलं नाही . मी चिडवलं तिला तसं . तेव्हा ती हसली . तिने मला जवळ घेतलं . माझा पा घेतला .मला असं आवडतं , बरं का ? मग काय म्हणाली ती, माहितीये ?
म्हणाली - आता आपल्याकडे एक नवीन बाळ येणार आहे . तुझ्याशी खेळायला .
अच्छा ! अस्सं होतं . आईच्या पोटात बाळोबा बसले होते . आणि म्हणून तिची ढेरी पॉम झाली होती तर . हे मला नवीनच कळलं .
मला तर एकदम मज्जा वाटली . खूप आनंद झाला . मग मी पळत बाहेर गेले . मला काय करावं तेच कळेना . मग मी गोलगोल फिरले . उड्या मारल्या . मग दमले, तेव्हा एका जागी बसले . छान छान कविता म्हणल्या .
मग मी विचारात पडले . मला त्या बाळाशी खेळावं लागणार . पण ते काही लगेच खेळणार नाही . मग आधी त्याला गाणीबिणी म्हणून दाखवावी लागणार . त्याच्याशी बोबडं बोबडं बोलावं लागणार .
पण काय झालं माहितीये ? माझ्या मनात आणखी एक विचार आला - त्या नवीन बाळाची ढेरी पॉमपॉम असली तर ? ...
हुय्या ! माझ्या जोडीला आणखी एक ढेरी पॉमपॉम !
--------------------------------------------------------------
व्वा.. मस्तच..
व्वा.. मस्तच..
बाळ पण पाॅम पाॅम ढेरी असू दे..
(No subject)
सो क्युट !
सो क्युट !
मस्त आहे. आवडली!
मस्त आहे. आवडली!
वाचक मंडळी आभार
वाचक मंडळी आभार
ही गोष्ट खास मुलांसाठी आणि त्यांच्या सुट्टीसाठी
मस्त, आवडली..
मस्त, आवडली..
मस्त!
मस्त!
क्युट आहे गोष्ट
क्युट आहे गोष्ट
छान आहे बालकथा
छान आहे बालकथा
कसली गोड गोड गोष्ट आहे! मस्त…
कसली गोड गोड गोष्ट आहे! मस्त…
खूप खूप आवडली गोष्ट
खूप खूप आवडली गोष्ट
फार फार गोड!!! आवडली.
फार फार गोड!!! आवडली.
मुलांच्या गोष्टीला इतका
मुलांच्या गोष्टीला इतका प्रतिसाद . आनंद आहे मंडळी
खूप आभार
पण ज्यांच्याकडे बच्चे कंपनी आहे , त्यांना ही गोष्ट ऐकायला मिळावी ही अपेक्षा
मोठ्या मंडळींना पुन्हा धन्यवाद
गोड गोड गोष्ट आहे! आवडली
गोड गोड गोष्ट आहे! आवडली
लहान मुलांना एकांकिका म्हणून करायला छान आहे. मुलीला सांगावेसे वाटतेय पण कोणतेच references मॅच होत नाहीत
(No subject)