उबर-रिक्षाचा ग्राहकांसाठी नवा जाचक नियम

Submitted by कुमार१ on 3 April, 2025 - 01:54

मागच्या आठवड्यात मी चार दिवसांसाठी गावाला गेलो होतो. जाताना घरून पुणे स्थानकावर गेलो तेव्हा उबर रिक्षा केली होती. त्या ॲपमध्ये बुकिंगच्या वेळेला जी रक्कम दाखवली तीच प्रवास संपताना घेतली गेली. चार दिवसांनी मी मध्यरात्रीनंतर पुण्यात परतलो तेव्हा उबर रिक्षा बुक केली. ती बऱ्याच प्रतिक्षेनंतर मिळाली. परंतु रिक्षा चालकाने आधी फोनवरच मला सांगितले की रात्रीच्या मीटरप्रमाणे पैसे होतील, ॲपनुसार नाही.
त्यावेळेस माझी सहनशक्ती संपलेली होती आणि पुन्हा नव्याने अन्य बुकिंग करणे मला शक्य नव्हते म्हणून मी होकार दिला.

रिक्षात बसल्यानंतर मी चालकांना विचारले की हा नियम कधी झाला आहे ? त्यावर ते म्हणाले की तुम्हाला एसएमएस आला नाही का ? नुकताच हा आमचा करार झालेला आहे.
अर्थात मला काही कंपनीचा संदेश वगैरे आलेला नसल्याने मला त्यांचे म्हणणे काही पटत नव्हते. प्रवासात मी त्यांना माझी नाराजी बोलून दाखवली. अखेरीस माझे घर आले. ॲपनुसार 115 रुपये होते तर रात्रीच्या मीटर नुसार 163 झाले. संपूर्ण प्रवासात मी बडबड केलेली असल्यामुळे त्या चालकांनी स्वतःहूनच थोडी तडजोड करून माझ्याकडून दीडशे रुपये घेतले. सध्याच्या धोरणानुसार उबरचा वाटा गेल्यानंतर चालकांना बरीच कमी रक्कम मिळते असे त्यांनी मला नम्रपणे सांगितले.

आज वृत्तपत्रात संबंधित नियम १ एप्रिलपासून लागू झाल्याची बातमी आली आहे : https://www.freepressjournal.in/pune/ubers-new-auto-fare-rule-leaves-pun...

म्हणून पुण्यातील सर्वांच्या माहितीसाठी हा धागा काढलेला आहे. आपापला अनुभव नोंदवा. या संदर्भात ओलाची काय भूमिका आहे ते अद्याप कळलेले नाही. कुणाला काही अनुभव आला असल्यास लिहा.

वरील बातमीनुसार उबरने त्यांच्या aggregator धोरणापासून फारकत घेतलेली दिसते. आता ते रिक्षाचालकांकडून दिवसाला फक्त 19 रुपये अशी संगणकीय फी म्हणून घेणार आहेत. तसेच रिक्षाचालकाने ग्राहकाकडून घ्यायच्या रकमेबाबत त्यांनी कानावर हात ठेवले आहेत.

या संदर्भात ग्राहक कायदा वगैरेंची कोणाला माहिती असल्यास जरूर लिहा.

* * *

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परिवहन आयुक्तांशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्यामुळे बुधवारपासून (१६/७) राज्यातील ऑनलाईन सेवा देणारे सर्व कॅब आणि रिक्षाचालक संपावर जाणार आहेत.

उबेर आटो मधून उतरल्यावर आजकाल रिक्षाचालकास ऑनलाइन/कॅश पेमेंट करणे हे नेहमीचे झाले असल्याने तशी सवयच लागली आहे. परवा कॅब केली. कॅब पोस्टपेड आहे लक्षात आले नाही. उतरल्यावर सवयीप्रमाणे त्याला गुगल पे केले. त्यानेही घेतले (त्याला बिचाऱ्याला काय कल्पना माझे उबर पोस्टपेड आहे). नंतर ऍप पाहतो तर उबर मला हे पेमेंट केल्याशिवाय पुढचे बुकिंग करू देत नव्हते. झाले. उबरलाही तितकीच रक्कम पे केली! नशीब त्यांच्या कस्टमर सर्विसला सांगितल्यावर (तेही त्यांच्या ऍप मध्ये बरीच धडपड करावी लागली. ऑनलाइन पेमेंटचे स्क्रीनशॉट वगैरे द्यावे लागले) त्यांनी "एकवेळ उपकार" म्हणत रिफन्ड केले. चूक माझीच होती म्हणायचं नी काय.

वरील संपात सर्व संघटना सहभागी नसल्याने फूट पडली आहे. त्यामुळे रस्त्यावर आलेले कॅबचालक मनमानी भाडे आकारणी करत आहेत.

पुण्यात काल ओळखीच्यांना रॅपिडो मात्र नेहमीच्या दरात मिळाली

uber, ola, rapido वापरताना १५ मिनिट आधीच बुक करावी, ड्राइवर एक्स्ट्रा चार्जेस मागत असेल तर स्पष्ट नाही सांगावे, ऍप जेवढे दाखवत आहे तेवढेच देणार असे स्पष्ट सांगावे. भलेही चार गाड्या सोडाव्या लागल्या तरीही चालेल. गाडी बुक केल्यावर ड्रायव्हरचा फोन येतो, कुठे जायचे आहे चार्जेस किती आहे वगैरे तो विचारतो, ड्रायव्हरच्या ह्या मनुपुलेशन ला बळी पडू नये, जे मूर्ख लोक ड्रायव्हरचा फोन उचलून ह्या गोष्टी करतात त्यांनाच ड्रायव्हर त्रास देतात. एक तर ड्रायव्हरला तुम्ही कुठे आहात हे दिसत असते नि तुम्हाला कुठे जायचे आहे हे त्याला गाडीत बसण्याआधीच सांगण्याची गरजच नाही. आपण मुर्खासारखी ही सगळी माहिती ड्रायव्हरला देतो, तो अशिक्षित माणूस तुमच्या सारख्या सुशिक्षित माणसाला maupulet करतो. एकाच वेळी ओला उबेर रॅपिडो वर राईड लावाव्यात जो आधी येईल त्याच्या गाडीत बसून ओटीपी सांगून निघावे. पण कुणाचाही फोन आजिबात उचलायचा नाही. ड्रायव्हर हलत नसेल तसे ऍप मध्ये दिसते त्याची गाडी हलत आहे की नाही तर आपण स्वतःहून फोन लावायचा नाही, ही त्यांची टेक्निक असते जास्त पैसे मागायची, नाहीतर ते आपल्यालाच राइड दिलीत करायला सांगतात किंवा आपण डिलीट करू ह्याची वाट पाहतात, राईड आजिबात डिलीटकरायची नाही त्या ऐवजी दुसऱ्या आप वरून सेम ठिकाणी जाण्यासाठी राईड बुक करावी. ड्रॉव्हरला येऊ द्यावे, ऍप दाखवते आहे एवढेच पैसे देणार स्पष्ट सांगावे. पैसे शक्यतो कॅशच द्यावेत, पोस्टपेड, ओला वॉलेट वगैरे वापरू नये एवीतेवी आपले पैसे जाणारच असतात.
लक्षात ठेवा जो ड्रायव्हरचा फोन उचलतो तो फसतो.
मी कधीही एक्स्ट्रा चार्जेस देत नाही, जेवढे ऍप दाखवत आहे तेवढेच देतो, जर ड्रायव्हर आरटीओ नियम वगैरे दाखवायला लागला तर त्याला स्पष्ट सांगावे हे तुक्ष्य कंपनीला समजाव आणी त्यांना ऍप मध्ये हे चार्जेस लावयला लाव. आणी हो उध्दट, जास्त पैसे मागणाइय ड्रायव्हर चे रिव्हीव खराब करावे नी राईड झाल्यावर कंपनीला तक्रार करावी, रिफंडही मागावा. ड्रायव्हरला ऍपच्या बाहेर दाखवत असलेल्या रकमेच्या वर एक रुपयाही जास्त देऊ नये आणी त्याला हे त्याच्या गाडीत बसण्याआधी स्पष्ट सांगावे.

परवा काचीगुडा रेल्वे स्टेशनवरून एअरपोर्टला जाताना ओला कॅब बुक केली. ड्रायव्हर चा फोन आला. त्याने भाडे किती होत आहे ते विचारले. आम्ही सांगितले. गाडी आली. गाडीत बॅगा वगैरे ठेवून ओटीपी सांगायची वेळ आल्यावर ड्रायव्हर म्हणाला,"राईड कॅन्सल करा. मी तुम्हांला तसंच (म्हणजे ओला ऍप न वापरता) नेतो.मला तुम्ही डायरेक्ट पैसे द्या." त्याला पैसे किती विचारले तर ६०० म्हणाला. ओलावर ५३० होते. मग नवरा म्हणाला,"तुम्ही जास्त मागताय पैसे तर मी का कॅन्सल करू?" मग जास्त काही न बोलता तो आम्हांला एअरपोर्टला घेऊन गेला . त्याला ५३०/-च दिले.
ड्रायव्हर लोकांना किती बिल होणार हे आधीच माहिती नसते का?

ग्राहकांना गंडवण्याचे प्रकार बऱ्यापैकी दिसत आहेत. ग्राहकांनी ठाम राहणे हाच त्यावरचा उपाय आहे.. आपल्या कामाच्या तातडीनुसार आपल्याला निर्णय घ्यावा लागेल.

खरं आहे कुमार१, रात्री अकरा वाजता परक्या गावात मी एकटी असताना एरवी ड्रायव्हर असं म्हणाला असता तर मी गप्प ऐकलं असतं. नवऱ्याने जरा ठामपणे सांगितले म्हणून तो गप्प आला असावा.

काल इथे उबर बुक करताना अव्वाच्या सव्वा भाडे दिसले. धोरणांमध्ये काहीतरी बदल झाला आहे, असे कानावर होते आणि दुसरा सोयीचा पर्याय नव्हता म्हणून उबर टॅक्सी बुक केली. लगेचच उबर चालकाचा फोन आला - "तुमची बुकींग ओरिजिनलच आहे ना?" मी उडालोच. म्हटले यातही आता फेक बुकींग वगैरे काही प्रकरण चालू झालेय की काय. मी त्याला 'म्हणजे काय?' असे विचारल्यावर म्हणाला की 'अहो, उबरचा बंद चालू आहे. आणि काही ठिकाणी खोटे बुकींग करतात आणि तिथे पोचल्यावर ड्रायवरला खाली ओढून मारहाण करतात. माझ्या मित्राला काल असे मारलेय. म्हणून विचारले. दोन दिवसांपासून गाडी बंद ठेवली. धंदा झाला नाही. किती दिवस बंद ठेवणार? शेवटी तुमचं बुकींग घाबरत घाबरत स्वीकारलंय.'

ड्रायव्हर लोक खोटे बोलतात, पहिली गोष्ट त्यांचे फोनच उचललायचे नाहीत. एयरपोर्ट ला असल तर एयरपोर्ट टैक्सी वापरावी १००-२०० जास्त गेले तरी चालेल. ओला उबेर ची राईड तर मुळीच कॅन्सल करू नये, सामान ठेऊन झाल्यावर कॅन्सल करायला लावतात ह्यामागे ट्रिक आहे, आपण परत सामान उठाठेव करणार नाही असा त्यांचा होरा असतो, शांतपणे गाडीतून उतरून सामान उतरवून दे म्हणून सांगावे.

ड्रायव्हर लोक खोटे बोलतात, पहिली गोष्ट त्यांचे फोनच उचललायचे नाहीत. एयरपोर्ट ला असल तर एयरपोर्ट टैक्सी वापरावी १००-२०० जास्त गेले तरी चालेल. ओला उबेर ची राईड तर मुळीच कॅन्सल करून प्रायव्हेट करू नये. सामान ठेऊन झाल्यावर कॅन्सल करायला लावतात ह्यामागे ट्रिक आहे, आपण परत सामान उठाठेव करणार नाही असा त्यांचा होरा असतो, शांतपणे गाडीतून उतरून सामान उतरवून दे म्हणून सांगावे.

उबर कंपनीने उच्च न्यायालयात नाव घेतल्याने चालकांनी उबरवर बहिष्कार टाकून त्यांचे ॲप काढून टाकण्याचे ठरवले आहे

https://indianexpress.com/article/cities/pune/cab-drivers-unions-call-st...

Pages