निर्जीवांचा लळा
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक ओळखीच्या माणसाप्रमाणे काही निर्जीव गोष्टींचीही आपल्याला सवय झालेली असते. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या दैनंदिन रूटीन मध्ये आपल्याला त्याच गोष्टी हव्या असतात. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर एका ठरलेल्या जागी बसूनच, ठरलेल्या कपातच चहा किंवा कॉफी पिणे, आपल्या ठरलेल्या ताट, वाटीत खाणे, आपल्याच पेला, तांब्यातून पाणी पिणे, झोपताना ठरलेली चादर वा उशी घेणे अश्या अनेक गोष्टी असतात.
बरेचदा त्या ठरलेल्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर मग कसतरी होतं, चुकचुकल्यासारखं वाटत. असं का बरे होत असावं? खर तर हा नुसत्या सवयीचा भाग नसून बरेचदा त्या वस्तूंशी आपल्या किंवा आपल्या प्रेमाच्या व्यक्तीविषयीच्या भावना, आठवणी जोडलेल्या असतात. स्त्रियांच्या बाबतीत तर ते फार प्रकर्षाने जाणवत. आईच्या लग्नातली पितळी भांडी दर वर्षी मोडीला देऊ म्हटलं तर मोडवत नाही. बाबांचं आऊटडेटेड झालेलं घड्याळ अजून तसच पडून आहे , ते टाकवत नाही. घरात अगणित बॅगा आहेत पण आजोबांची जुनी सुटकेस (आणि त्यातलं बरच काही ) तसच पडून आहे. मिक्सर येऊन जमाना झालाय पण पाटा वरवंटा आणि, खलबत्ता अजून माळ्यावर पडून आहेच. काही जुन्या साड्या व कपडे बोहारणीच्या गाठोड्यातून परत हळूच कपाटात कोपऱ्यात जाऊन बसताहेत. काही जुने दागिने आता कशावरही मॅचिंग होऊ लागलेत. काही जुनं फर्निचर रंगरंगोटी करून परत दिमाखात वापरात आलय. खरंच अगदी चहापावडर, साखरेच्या डब्यातल्या त्या किल्व्हरच्या चमच्यांपासून ते नथ, एकदाणी, मोहनमाळ या दागिन्यांपर्यंतच्या असंख्य निर्जीव गोष्टीनी आपल्याला एक अनामिक लळा लावलेला असतो. तो सुटता सुटत नाही.
आता कदाचित आधुनिकीकरणाच्या जमान्यात ह्यातल्या काही गोष्टी कालांतराने नसतीलही, किंवा त्याची सवयही सुटेल परंतु त्यांची आठवण मात्र कायम राहील. आवडत्या उदबत्तीच्या सुगंधासारखी..... मंद.....
तुमची आहे का एखादी अशी वस्तू...आवडती?
मी ममोची समै!
मी ममोची समै! कुठल्याही वस्तुत जीव अडकत पण वस्तुंची उपयोगिता संपली तरच टाकून देते.
हे पा, हे त्या सरफेसांचं कसब
हे पा, हे त्या सरफेसांचं कसब असतं, त्याचं श्रेय आपण घेऊ नये. तुम्ही होऊन वस्तू ठेवल्या नाहीत तर सरफेसेस कोणाचं लक्ष नसताना आपल्या वस्तू आपण उत्पन्न करतात >>>
मी ममोची समै! कुठल्याही
मी ममोची समै! कुठल्याही वस्तुत जीव अडकत पण वस्तुंची उपयोगिता संपली तरच टाकून देते.!!+११
,आवडत्या गोष्टी आहेत काही
पण लळा किंवा जीव लावणं सोडून दिलंय
.
नाही फरक पडत आता
आवडता विषय! माहेरी असल्या
आवडता विषय! माहेरी असल्या सटरफटर ' अनमोल ' गोष्टींनी एक कप्पा भरलेला आहे. इथे माझ्या घरात अधूनमधून काहीकाही गोष्टी सापडत राहतात ज्यांचा उपयोग संपलाय पण त्यांच्यात उगाच जीव अडकलाय. मग दरवेळी decluttering करताना त्या बाहेर येतात, भरपूर विचारमंथन होतं आणि शेवटी निदान काही वस्तू गुपचूप पुन्हा कपाटात जातात

तूर्त या वस्तूंमध्ये काही कपडे, काही फुटकळ कानातली वगैरे आहेत.
बाकी ठरलेला कप, पेला, ताट वगैरे असलं काही नाही
हे त्या सरफेसांचं कसब असतं,
हे त्या सरफेसांचं कसब असतं, त्याचं श्रेय आपण घेऊ नये. तुम्ही होऊन वस्तू ठेवल्या नाहीत तर सरफेसेस कोणाचं लक्ष नसताना आपल्या वस्तू आपण उत्पन्न करतात >>>
हे त्या सरफेसांचं कसब असतं,
हे त्या सरफेसांचं कसब असतं, त्याचं श्रेय आपण घेऊ नये. तुम्ही होऊन वस्तू ठेवल्या नाहीत तर सरफेसेस कोणाचं लक्ष नसताना आपल्या वस्तू आपण उत्पन्न करतात >>
+१००
माझाही फार जीव अडकतो पर्सनल
माझाही फार जीव अडकतो पर्सनल गोष्टीत. ऋन्मेष यांची पूर्ण पोस्ट माझीच समजली तरी चालेल .
तरी अधूनमधून स्वतः च decluttering करतेय ,अनिंद्य यांचा डेथ क्लिनिंग वाला धागा वाचून .
लहानपणीच्या मोजक्या वस्तू अजूनही जीवापाड जपून ठेवल्यात .त्यात शाळेच्या ट्रिप ला घेतलेला गणपती ,तेव्हाची डायरी ,फोटोज ,चित्रं ...एक इमिटेशन ची बांगडी (कडं) लहानपणी पासून जपून ठेवलीय , फॅशन ज्वेलरी तर विचारूच नका. ट्रेन मधल्या खड्यांच्या कानातल्यापासून ते कापड बीड्स ज्वेलरीपर्यंत सगळ्या गोष्टी जमवायला आवडतात, जमवून ठेवल्यातआणि फेकवतही नाही. आवडते कपडेही होत नाहीत तरी जपून ठेवायची सवय होती .शेवटी कपाटात जागा होत नाही म्हणून त्यातले काही देऊन टाकले पण एक दोन ओढण्या ठेवल्याच त्या वापरतेही .अँटिक कलात्मक वस्तू तर खूप आवडतात .आईचा तांब्याचा जुना हंडा मी मोडू दिला नाही.मला हवाय हवंतर मी घासेन या बोलीवर.
एव्हढंच कशाला अगदी पेपरच्या कात्रणापासून सुरू झालेला प्रवास आता स्क्रिनशॉट्स वर आलाय, फोन मेमरी भरलेय, फोन हँग होतोय ,पण सुंदर फोटोज डिलिट करवत नाहीत .
ताट वाट्या चादरी फेवरेट असल्या तरी बदलत जातात, तेच योग्य आहे ,जुनं गेल्याशिवाय नवं येणार कसं.
बाकी वस्तूंबद्दल आसक्ती नाही किंवा काही फरक पडत नाही हे सगळं झूट आहे याचाअर्थ एकतर तुम्ही नीरस आहात किंवा संतपदाला पोहोचला आहात.
पण माझ्यामते वस्तूंची आसक्ती असावी मरेपर्यंत ,जगणं आनंदी करतो हा ठेवा. वस्तू पाहिल्या तरी मन त्यात्या क्षणात आठवणीत जातं. मेल्यानंतर तसही सगळं इथेच सोडून जायचंय मग मरेपर्यंत जपलं ,उपभोग घेतला तर काय हरकत आहे. हो पण मरण्यापुर्वी शक्य तितके ज्याला देता येईल त्याला देऊन गेलेलं पण चांगलं ,पिढ्यानपिढ्या गोष्टी ,वस्तू पुढे सरकत राहतात.
मरण उद्या आलं तर? उद्या कशाला
मरण उद्या आलं तर? उद्या कशाला पुढच्या क्षणाला आलं तर? ते काय सांगुन थोडी येणारे! तयारी कालच चालू केली पाहिजे ना?
हे फारच निगेटिव्ह झालं.
पण जे काय आहे ते आनंदात स्विकारावं, हे किंवा ते काही चूक नाही की बरोबर नाही. फक्त ते तसं आहे. 'आज' मजेत घालवला की झालं. मग तो आसक्तीत असेल की निरासक्तीत घालवलेला असेल. मजा आली पाहिजे. बास!
बाकी वस्तूंबद्दल आसक्ती नाही
बाकी वस्तूंबद्दल आसक्ती नाही किंवा काही फरक पडत नाही हे सगळं झूट आहे >>> करेक्ट!
ते डिक्लटर जमलं नाहीये अजून.
सिमरन तुझी पोस्ट वाचून लक्षात आलं की वस्तूंमधे फारसं अडकणं झालं नसलं तरी पुस्तकं, फोटोज, गाणी असल्या गोष्टींत मन अडकलेलं आहेच
फोन मेमरी भरलेय, फोन हँग
फोन मेमरी भरलेय, फोन हँग होतोय ,पण सुंदर फोटोज डिलिट करवत नाहीत .
>>>>
बापरे हा तर वेगळाच विषय आहे. माझ्याकडे लाखात फोटो आणि हजारोत व्हिडिओ आहेत. त्यांची विल्हेवाट न लावता साठवण कशी करायची हा मोठाच प्रश्न आहे. बरे झाले हा मुद्दा इथे निघाला. यावर वेगळा धागा काढुया वीकेंडला..
अमितव खरं सांगू का ,आधी तुमची
बाकी आज मजेत घालवला की बस...मजा आली पाहिजे याला +100
आसक्ती वगैरे डिप्रेशनच्या काळात सुचलेलं ज्ञान आहे त्या काळात सगळं नश्वर आहे, वस्तूंबद्दल, एकंदरीत कशाबद्दल ही काहीच वाटेनासे झालेलं पण नंतर काही काळाने केसांच्या क्लिप्स, ब्रेसलेट खरेदी करून आले तेव्हा घरचे रिलॅक्स झाले ,आली नॉर्मलला म्हणून
नशीब तेव्हा जपलेल्या वस्तु टाकून दिल्या नाहीत.
जीवापाड जपलेली माणसं कोणतंही
जीवापाड जपलेली माणसं कोणतंही कारण न देता दुर गेली तेंव्हापासुन ना वस्तुत जीव अडकवत.
आसक्ती व निरासक्ती आपल्या
आसक्ती व निरासक्ती आपल्या हातात नाही, तुम्हाला आसक्ती असेल तर तुम्ही सुदैवी आहात आणि तसेच राहा म्हणेन. त्यातही एकप्रकारे निरागसताच आहे. आसक्ती नसेल तर तुम्ही 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' पाहिला आहे व धीराचे आहात, 'लेटिंग गो' ची ताकद तुम्हाला कळली आहे. त्याबद्दल कौतुक. निर्लेपपणाचे समाधान किंवा 'पॉवर ऑफ लेटिंग गो' ( इमोशनल, फिजिकल) ने तुम्ही भयंकर निर्भय होता आणि मन अपग्रेड होऊन बसतं व परत आधीच्या व्हर्जन कडे येता येत नाही. कारण तुम्ही मावत नाहीत त्यात.
ह्या गोष्टी ठरवून, मुद्दाम किंवा प्रभाव पाडायला करताच येत नाहीत. शिवाय जे आपल्या हातातच नाही त्याचं श्रेयही कसं घेणार. सगळेच जण आपापल्या बुद्धी, स्वभाव, अनुभव आणि परिस्थिती नुसार सर्वाईव्ह होत राहतात. एकाचा प्लॅन दुसऱ्याला चालत नाही. त्यामुळे जज किंवा तुलना करण्यात हशील नाही. तुम्ही कोणी करत नाही आहात, ईनजनरल सांगतेय.
जे असेल नसेल त्यात आनंदात राहावे, निर्जीवात नसेल तर सजीवात, मूर्त अनुभवात नसेल तर अमूर्त अनुभवात. प्रेम व लळा ही आपली सहजप्रवृत्ती असते. बरोबर तेवढं केलं जातंच. मोठ्या दुष्काळानंतरही दगडाच्या कपारीतून अंकूर फुटतो तसा माणूस आनंद घ्यायला शिकतच असतो, कुठे- कसा हे महत्त्वाचे नाही. म्हातारपणी उगाच तळमळायला नको झाले, हे राहून गेले ते राहून गेले. उगा भोगून मरावं, दुस्वासी- कडवट म्हातारी काही कमी नाहीत जगात. आसक्त वा निरासक्त आता आनंदात राहून म्हातारपणी तिकडे जायचं नाही एवढं कळलं तरी जिंकलं. शेवटचा दिस गोड होणं आणि तो आजच्या एकेक दिवसातही वेचता येणं हा मथितार्थ.
आश्रमाचे शटरडाऊन करते.
माझा वस्तूंपेक्षा राहत्या
माझा वस्तूंपेक्षा राहत्या घरावर जीव जडतो, अर्थात ते घर तसं असलं पाहिजे. माझं लहानपणी १५-१६ वर्षं राहिलेलं घर आम्ही सोडलं (तिथे आजी पुढे राहतच होती) तरी तिथे मी आधी रोज जात असे. आजीला भेटणं हे एक कारण झालं, पण मुळात त्या घरात पाच मिनिटं बसून जी निर्धास्त शांत भावना मनात येत असे, उसको उपमाच नहीं. नंतर बेंगळूरी वसतिगृहात राहत असताना माझी खोली बदलली तरी पुढे काही दिवस मी जुन्या खोलीत चक्कर टाकत राहिलो - रिकामीच होती ती. मित्राने कान उघाडणी केल्यावर तो प्रकार बंद केला.
असा प्रकार मी न्हाव्या बद्दल
असा प्रकार मी न्हाव्या बद्दल केलेला आहे. डोंबिवलीहून ठाण्याला रहायला गेल्यावरही दोन तीन वर्षे तरी केशकर्तनालयात जायचं म्हणजे डोंबिवलीला. तेच मग पुण्याला गेल्यावर केस ठाण्याला गेल्यावर कापायचे असं होऊ लागलं.
प्रेम लळा काही न्हवता. पण दुसरीकडे जायची अँझायटी होती का काय कोण जाणे.
अस्मिता छान पोस्ट .आश्रम काढच
अस्मिता छान पोस्ट .आश्रम काढच
त्या लाल जोडा वाल्या माँ पेक्षा खूप आध्यात्मिक आणि तितकंच लॉजिकल लिहितेस.
थॅंक्यू सिमरन. आपोआपच निघतो
थॅंक्यू सिमरन. काढेन आश्रम, तुम्ही सगळे या पण तेथेही.
लाल जोडा वाल्या माॅंना जानी दुष्मनच्या अस्वलाने उचललं असतं, उगाच मारलं त्याला.
हर्पा,
पोचलं. माझीही एक अशी पडवी होती, आजीपाशी बसायची. पण तो वाडा किल्लारीच्या भूकंपानंतर खिळखिळा झाला आणि नंतर तेथे जाणं सुरक्षित राहिले नाही.
आजीला भेटणं हे एक कारण झालं, पण मुळात त्या घरात पाच मिनिटं बसून जी निर्धास्त शांत भावना मनात येत असे, उसको उपमाच नहीं. >>>
असा प्रकार मी न्हाव्या बद्दल
असा प्रकार मी न्हाव्या बद्दल केलेला आहे. >> मी पण.
घरातील कोणताही आडवा सरफेस
घरातील कोणताही आडवा सरफेस लगेच भरून टाकण्याचे कसब माझ्याकडे आहे.>>>>

अशा प्रत्येक गोष्टीचा "लळा" असेल असे नाही पण डिक्लटरिंग हे "कधीतरी करू" मधे रोज आज रोख उद्या उधार स्टेट मधे असते>>>>>> डिक्लटरिंग मोठा प्रश्न
तोच तीन तासांचा प्रवास आहे, पण डेक्कन क्वीनने जाताना जे वाटते ते इंद्रायणी एक्सप्रेसने जाताना नाही. वंदे भारत तर त्याहून नाही. >>>>> फा पर्सनल टच:)
हे पा, हे त्या सरफेसांचं कसब असतं, त्याचं श्रेय आपण घेऊ नये. तुम्ही होऊन वस्तू ठेवल्या नाहीत तर सरफेसेस कोणाचं लक्ष नसताना आपल्या वस्तू आपण उत्पन्न करतात. >>>>>
मग दरवेळी decluttering करताना त्या बाहेर येतात, भरपूर विचारमंथन होतं आणि शेवटी निदान काही वस्तू गुपचूप पुन्हा कपाटात जातात>>>>>> same here
आईचा तांब्याचा जुना हंडा मी मोडू दिला नाही.मला हवाय हवंतर मी घासेन या बोलीवर.>>>>> मी पण आई आणि आजी यांची भांडी ठेवली आहेत मी घासेन बोलीवर
एव्हढंच कशाला अगदी पेपरच्या कात्रणापासून सुरू झालेला प्रवास आता स्क्रिनशॉट्स वर आलाय, फोन मेमरी भरलेय, फोन हँग होतोय ,पण सुंदर फोटोज डिलिट करवत नाहीत . Happy तरी अधूनमधून स्वतः च decluttering करतेय ,अनिंद्य यांचा डेथ क्लिनिंग वाला धागा वाचून .>>>>>> हे वाचून मला अगदी अगदी झालं.
चलो decluttering करे अशी चळवळ/ मोहीम काढायला हवी
त्यांची विल्हेवाट न लावता साठवण कशी करायची हा मोठाच प्रश्न आहे. बरे झाले हा मुद्दा इथे निघाला. यावर वेगळा धागा काढुया वीकेंडला..>>>> ऋन्मेSSष, बरेच धागे काढायचे पेंडिंग आहे तुमचे
'आज' मजेत घालवला की झालं. मग तो आसक्तीत असेल की निरासक्तीत घालवलेला असेल. मजा आली पाहिजे. बास! Happy>>>>>> सत्यवचन
उगा भोगून मरावं, दुस्वासी- कडवट म्हातारी काही कमी नाहीत जगात. आसक्त वा निरासक्त आता आनंदात राहून म्हातारपणी तिकडे जायचं नाही एवढं कळलं तरी जिंकलं. शेवटचा दिस गोड होणं आणि तो आजच्या एकेक दिवसातही वेचता येणं हा मथितार्थ.
आश्रमाचे शटरडाऊन करते. Proud>>>>>>
आता हे भोग आलिया
भोगुनी ते सरती
(संदर्भ: उदंड झाली दोडकी)
फारच लवकर केले आश्रमाचे शटरडाऊन.
अजून उपदेश चालल असता
माझा वस्तूंपेक्षा राहत्या घरावर जीव जडतो>>> वस्तू आणि वास्तू attachment होतेच. एक समाधानाची भावना असते बरेचदा.
असा प्रकार मी न्हाव्या बद्दल केलेला आहे. डोंबिवलीहून ठाण्याला रहायला गेल्यावरही दोन तीन वर्षे तरी केशकर्तनालयात जायचं म्हणजे डोंबिवलीला. तेच मग पुण्याला गेल्यावर केस ठाण्याला गेल्यावर कापायचे असं होऊ लागलं.>>>> एवढ्या लांब केस कापायला..भलतीच रोचक केस आहे
थॅंक्यू सिमरन. काढेन आश्रम, तुम्ही सगळे या पण तेथेही. Happy
लाल जोडा वाल्या माॅंना जानी दुष्मनच्या अस्वलाने उचललं असतं, उगाच मारलं त्याला. >>>>>
अस्मिता, नक्की काढा आश्रम आम्ही येऊ नित्यनियमित. अनुग्रह द्यावा भक्तांना
लळा, जिव्हाळा शब्दच खोटे....
लळा, जिव्हाळा शब्दच खोटे....
लाल जोडा वाल्या माॅंना जानी
लाल जोडा वाल्या माॅंना जानी दुष्मनच्या अस्वलाने उचललं असतं, उगाच मारलं त्याला >>>
जादु अस्वल रिटर्न्स!
सुंदर पोस्ट अस्मिता.
सुंदर पोस्ट अस्मिता.
आश्रमाचे शटरडाऊन करते.>>>
आश्रमाचे शटरडाऊन करते.>>>
बोलो अस्मितामैय्या की जय!!!
जोक्स अपार्ट खरंच छान लिहिलं आहेस.
घरातील कोणताही आडवा सरफेस लगेच भरून टाकण्याचे कसब माझ्याकडे आहे
>>> आमच्या कुटुंबात सगळ्यांकडे हे कसब आहे. आता तर माझी मदतनीस पण हे आपलं कर्तव्य असल्यासारखं वागते.
मला लळा नाही गोष्टींचा पण पझेसिव्हनेस भरपूर आहे. काही पर्सनल गोष्टी अगदी मुलीनेही मला न विचारता वापरलेल्या मला आवडत नाहीत.
पूर्वी मी ममव वृत्तीने झाकणं नसलेले डबे वगैरे खूप जमा करून ठेवायचे. आता वापरात/आवडत नसलेल्या गोष्टी मदतनीस मुलीला देऊन टाकते. ती माझी पर्सनल शॉपरसारखी पर्सनल रिसायकलर आहे. तिच्या अख्ख्या चाळीत ते कोकणातल्या गावात अशा कुठेही वस्तू वाटून टाकण्याचं अमेझिंग कसब तिच्यात आहे.
>>आश्रमाचे शटरडाऊन करते.
>>आश्रमाचे शटरडाऊन करते.
फ़ारच योग्य शब्दात लिहिल आहे. मी आसक्ती आणि निरासक्ती च्या अगदी मधोमध आहे. शक्यतोवर गोष्टी सोडवत नाहीत पण एकदा सोडल्या कि चुटपूट वगैरे काही लागून राहत नाही.
तुमच्या आश्रमाची मेम्बर्शिप आहे का हो
आश्रम काढ गं अस्मिता,
आश्रम काढ गं अस्मिता, वाड्याच्या जवळच बघ जागा म्हणजे निवांत जाता येईल.

हर्पा घरा बद्दल लिहीलंयस हम्म्म, ज्या घरात लहान पण गेलं, ग्राऊंडवर खेळलो नदीवर फिरलो कॉलनीत हुंदडलो ती सगळी जागाच बुलडोझर फिरवून सपाट केली आहे. आमची एन् आर सी आता फक्त आठवणीतच आहे. ( फक्त शाळा ठेवली आहे अशी बातमी वाचली) अदानी ने सगळी प्रॉपर्टी घेतलीये ना.
मी फार विचार करून सुस्कारे नाही सोडत. जमीन दोस्त झालेल्या कॉलनी चे व्हिडिओ येत होते आमच्या ग्रुप वर ते मात्र बघितले नाही. बघवलेच नाहीत.
बाकी सगळ्या नव्या पोस्टी पण आवडल्या. माझ्या बहिणींना ह्या धाग्याची लिंक पाठवली तर आवडलं तिला , ती म्हणाली कुठलाही विषय पुरतो तुम्हाला.
थॅंक्यू सर्वांना.
थॅंक्यू सर्वांना.
पूर्वी मी ममव वृत्तीने झाकणं नसलेले डबे वगैरे खूप जमा करून ठेवायचे. >>>> माझ्याकडे झाकण हरवलेला डबा उगाच पसारा म्हणून फेकून दिला तर दुसऱ्या दिवशी झाकण सापडते मग तेही डबाच नसल्याने टाकून द्यायचे.
धनुडी, कुठलाही विषय पुरतो तुम्हाला.>>>>
जादु अस्वल रिटर्न्स!>>>>>>
जादु अस्वल रिटर्न्स!>>>>>> rmd, तूच आण त्याला परत.
आधी लवकर सापडला असता. आता नैऋत्य, ईशान्य..सगळ्या दिशांना पांगला.
धनुडी,
चमचा मस्त आहे.
ती म्हणाली कुठलाही विषय पुरतो तुम्हाला>>>>> खरंय.
आश्रम काढ गं अस्मिता, वाड्याच्या जवळच बघ जागा म्हणजे निवांत जाता येईल. >>>>>
तर दुसऱ्या दिवशी झाकण सापडते
तर दुसऱ्या दिवशी झाकण सापडते मग तेही डबाच नसल्याने टाकून द्यायचे >>>
बाकी ते झाकण हरवले म्हणून डबा फेकून देऊया हे माझ्या आईला सांगायला गेलो तर तिला ते चार्जर हरवला म्हणून मोबाईल फेकून देण्यासारखे वाटेल
बाकी ते झाकण हरवले म्हणून डबा
बाकी ते झाकण हरवले म्हणून डबा फेकून देऊया हे माझ्या आईला सांगायला गेलो तर तिला ते चार्जर हरवला म्हणून मोबाईल फेकून देण्यासारखे वाटेल>>>> अगदी
भांडी घासायची पावडर ठेऊनच त्याला या जन्मातून मुक्ती मिळते
झाकण हरवले म्हणून डबा फेकून
झाकण हरवले म्हणून डबा फेकून देऊया हे माझ्या आईला सांगायला गेलो तर तिला ते चार्जर हरवला म्हणून मोबाईल फेकून देण्यासारखे वाटेल>>>> +१
भांडी घासायची पावडर ठेऊनच त्याला या जन्मातून मुक्ती मिळते >>> +१००
Pages