Submitted by चंद्रहास शास्त्री on 13 March, 2025 - 06:32
स्मरतेस तू मला
- हसरा चन्द्र
स्मरतेस तू मला
तेव्हाच मी जिंकतो.
स्मरण्यावाचून तुझ्या
जिंकूनही मी हारतो.
या स्मरण्याची जादू
अशीच राहो सदा
ही जीवनरेखा दैवी
अशीच राहो सदा
मनाशी मनाने असे
आपण बोलतो किती
कोकीळांचे बोल हे
आळविती स्वर वासंती
ही रंगत इतकी न्यारी
संगत मनाची ही खरी
शब्द कंठी मौन ओठी
गोष्ट आपुली बहु मोठी
चांदण्या दूत होऊनी
अपुले हास्य फुलविती
थोडीशी भिजते पापणी
क्षणात चित्त हे द्रवविती
तो एक अश्रूबिंदू स्वये
काव्यमोती होत असे
विरहातही सहज सखे
श्लोकपूर्ती होत असे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा