मित्रानो
साहित्य चोरी हा प्रकार महाराष्ट्रात पार तुकाराम महाराज असल्यापासून लोकांना माहीत आहे
ऑनलाईन विश्वात तर कॉपी पेस्ट लगेच शक्य असता
फेसबुक आधी फक्त गुगल आणि ऑर्कुट ला शोधून आपले लिखाण चोरी शोधतात येत होती पण आता १७६० social नेटवर्किंग मुळे ते पण अवघड झाले
परत कोणी साहित्य चोरी केली तर लोक आपापल्या वाल वर त्याच्या नावाने खडे फोडून ठणाणा करतात
आतापर्यंत मराठी विश्वात तरी एखाद्या साहित्य चोराला चोरी खाली अटक किंवा जेल झाल्याचे ऐकिवात नाही
२ वर्ष आधी एका कविता चोरी प्रकरणी पोलीस कम्प्लिन्ट ची कॉपी वायरल होत होती तोच सर्वात मोठा पराक्रम
इथे वर्षानुवर्षे खून ,बलात्कार ,दरोडे लोकांना शिक्षा मिळत नाही त्यामुळे सगळ्याचा उत्साह मावळत जातो
पोलीस स्टेशन ची पायरी शहाण्याने चढू नये असे म्हणतात
तर एक साधा सरळ उपाय पण आधी साहित्य चोरांचे वर्गीकरण
काही लोक हौशी असतात ,एक दोन लेख उचलतात सोडून देतात ,त्यांना दुर्लक्ष करावे
अट्टल चोर
१) जे ब्लॉग किंवा फेसबुक पेज मोनेटाईझ करतात
२) जे लायकस व शक्यतो ऑनलाईन मुलींना इंप्रेस करायला लेख छापतात
दोघानं एकाच उपचार आहे ,साधा
आधी मी काय केले ते नमूद करतो
तर माझा नोकरी संदर्भ ब्लॉग होता जिथे फ्रेशर आदी इत्यादी जॉब पोस्ट करत होतो
एकाने सरळ माझी rss फीड उचलायाला सुरु केले
मला कल्पना होती जॉब पोस्टिंग ला copyright एवढे सोपंय लागू होत नाही व पोलीस यंत्रणा आधीच खूप ताणा खाली आहे
मी अर्धे rss feed fulltext जागी शॉर्ट करून बघितले तरी त्याचा कॉपी चालू ,नंतर कळलं कि इंटरनेट वर शॉर्ट फीड ला पण फुल्ल करून मिळते ते पण ऑटोमॅटिक
rss फीड काढून पण उपयोग नाही ,scraping च्या १७६० स्क्रिप्ट आहेत ,साध्य वेब पेज ला पण rss कॉन्व्हर्ट करून मिळते
साधा उपाय
मी आधी माझे adsense ब्लॉग वरून बंद केले
मी मुद्दाम माझ्या कन्टेन्ट मध्ये असे काही शब्द टाकले कि जे ऍडसेन्स मध्ये banned आहेत , गांजा ,मर्डर वगैरे
त्याने स्क्रिप्ट ने कॉपी केले असल्याने त्याला कळले नाही ,सरळ कॉपी केले ,
मी त्याचे adsense अकाउंट रिपोर्ट मारून टाकले
सहसा होस्टिंग dmca असले तरच बंद करतात ,पण जर असला भयानक कन्टेन्ट असला तर नॉन dmca पण रिपोर्ट करतात
माझे कोणी शत्रू नसल्याने व माझे शब्द मी हाइडे करून टाकल्याने माझा ब्लॉग मात्र सेफ राहिला
हाईड करायची पद्धत पण सोपी होती , माझा ब्लॉग चा बॅकग्राऊंड पांढरा असल्याने मी ह्या शब्दांना सेम कलर दिला ,शब्द दिसेनासे झाले,त्याचा ब्लॉग मात्र काळा असल्याने लगेच शब्द दिसले
नंतर त्याचा ब्लॉग उडाला कि गुपचूप माझे ऍडसेन्स चालू केले व धोकादायक शब्द रेमोव्ह केले ,ह्याला फक्त १-२ दिवस लागतात
जास्त नुकसान नाही
त्याच् पूर्ण होस्टिंग अकाउंट ,डोमेन अकाउंट आणि ऍडसेन्स उडाले ,परत आले नाही
तुमचा पण कन्टेन्ट कोणी सारखा सारखा चोरत असेल तर तो कन्टेन्ट पूर्ण वाचायची शक्यता कमी ,
मुद्दाम असा hidden कन्टेन्ट टाका ,समजा त्याचा घर माहीत असेल तर त्याच्या आजू बाजूच्या एखाद्या छोट्या राजकीय नेत्यावर /गुंठा मंत्रींवर टीका hide करून टाकली तरी चालेल ,कार्यकर्ते त्याच्या दारी नक्की जातील
बघा प्रयत्न करून एखादा तांत्रिक मुद्दा कळला नाही तर खुशाल विचार ,ट्रॉल दुर्लक्ष करण्यात येतील
मस्त आहे उपाय
मस्त आहे उपाय
पण जे लोक प्रायव्हेटली म्हणजे
पण जे लोक प्रायव्हेटली म्हणजे फक्त स्वतःकरता, लेख कॉपी करुन संग्रही ठेवतात, त्यांनाही याचा त्रास होऊ शकतो का?
यांची ब्लॉगची कुठेही वाच्यता नसते. फक्त स्वांताय सुखाय हे लोक संग्रह करुन, वाचत असतात.
सामो
सामो
त्यांच्या वाचक पैकि लीक केला तर?
लिंक कॉपी/बुकमार्क करावी, लेख
लिंक कॉपी/बुकमार्क करावी, लेख कॉपी-पेस्ट का करायचा?
टेक्निकल टर्म्स डोक्यावरून
टेक्निकल टर्म्स डोक्यावरून गेल्या. पण काहीतरी भन्नाट वाटलं.
लिंक कॉपी/बुकमार्क करावी, लेख
अगदी 'खिळ्याच्या डोक्यावर हातोडी'
खिडोहा !
.
.
असे अनेक पर्याय ऑफलाइन वाचनासाठी उपलब्ध असताना का बरं चोप्य पस्ते?
अरे वाह.. भारी आहे हे
अरे वाह.. भारी आहे हे
कोण लीक करणार? ती व्यक्ती
कोण लीक करणार? ती व्यक्ती साठवते व वाचते. अन्य कोणलाही तो ब्लॉग ना माहीत असतो. चुकून त्या लिंकवर अलाच तर तुम्हाला 'प्रायव्हेट ब्लॉग' असे दिसते.
पण एका ब्लॉग/साईट वरून आपल्या
पण एका ब्लॉग/साईट वरून आपल्या ब्लॉग मध्ये कॉपी करण्याचे प्रयोजन कळले नाही. दोन्हीकडे ऍक्सेस करायला नेट कनेक्शन हवे. मग जेव्हा वाचायचे आहे तेव्हा ओरिजिनल साईटवरच जाता येईल ना.
प्रवासात ऑफलाईन वाचता यावे यासाठी मी पूर्वी कधीतरी सेव्ह ऍज पिडीएफ केले आहे.
बरेच वेळा मुळ लिखाण मुळ
बरेच वेळा मुळ लिखाण मुळ लेखकाकडून काढून टाकले गेले (जे इकडे आपण अनेकदा पाहतो) तर वाचकाला ते नंतर सवडीने / पुन्हा पुन्हा वाचन करणे कसे शक्य होणार !! अश्या भविष्य कालीन संकटाची तरतूद म्हणून सुद्धा काही जण फक्त स्व- संग्रही ठेवण्यासाठी कॉपी पेस्ट करत असतील.
किती लिंका सांभाळायच्या?
किती लिंका सांभाळायच्या? त्यापेक्षा रेल्वेत आपला ब्लॉग उघडला- वाचले - मस्त दिवस जातो.
ब्लॉग दिवस पहिलाः दिनांक य