पुणे गटग - १६ फेब्रुवारी संध्याकाळी ४ वाजता

Submitted by पियू on 13 February, 2025 - 13:29

१६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता पासून पुढे पुणेकरांचे गटग वाळवेकर गार्डन, वाळवेकर नगर येथे करायचे ठरवले आहे. डॉक्टर कुमार यांची उपस्थिती या गटग ला असणार आहे.

तरी सर्वांनी आपली हजेरी लावावी होsss.

https://g.co/kgs/TH6R7dc

सध्या बागेचे मुख्य प्रवेशद्वार बांधकामामुळे बंद असून बाजूच्या छोट्या दाराने आत शिरायचे आहे.

आत शिरल्यानंतर उजव्या हाताला दिसतो तो पहिला पॅगोडा आपल्याला गप्पाटप्पा आणि बसण्यासाठी धरायचा आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण सर्वांनी भेटण्यासाठी पुन्हा एक गटग जानेवारी महिन्यात करण्याचे ठरते आहे हो !!
तरी सर्वांनी आपापल्या सोयीचा दिवस / वार / ठिकाण कळवा जेणेकरुन सर्वांच्या सोयीने गटग ठरवता येईल.

आत्तापर्यंत उपस्थिती नक्की कळवलेले सदस्य -

पियु
डॉ. कुमार

अरे वा!! मस्त होउ द्यात गटग. कुमार सर आणि अन्य सर्व माबोकरांना भेटायला मला खूप आवडले असते. एक मॅच्युरिटी लेव्हल कळते प्रत्येकाची प्रतिसादातून. गुणाविशेष व विकार - व्यक्तीचे हे दोन्ही पैलू त्याच्या तिच्या प्रतिसादातून कळतात.

अरे वाह! परवाच म्हणजे २१ डिसेंबरला नाताळच्या सुट्टीनिमीत्ताने भारतात आलेल्या अनिवासी आणि निवासी भारतीयांचे गटग (मिपाच्या भाषेत कट्टा) पुण्याला 'वाडेश्वर-डेक्कन' येथे संपन्न झाले. विशेष म्हणजे त्याला उपस्थित असलेल्या एकूण १० जणांपैकी ८ जण मायबोली आणि मिपाचे नियमित सदस्य/वाचक आहेत. त्यानिमित्ताने कुमार सरांशी २०२५ ह्या वर्षात (जानेवारीतले भायखळा, एप्रिल/मे मधले हैद्राबाद आणि परवाचे पुणे कट्टा/गटग) तीन वेळा भेट झाली आहे.

जानेवारी २०२६ च्या आगामी गटग साठी हार्दिक शुभेच्छा! फोटोंसहित सविस्तर वृत्तांताच्या प्रतीक्षेत आहे.

सं भा
यंदा तुमच्यासंगे खरोखर मजा आलेली आहे ! आता या कट्ट्या गटगला पण याच Happy
. . .
वा वा ! झाली का यंदाची घोषणा

नुकताच एक सुरेख कट्टा डेक्कनवर झाला. तो जरी मिपातर्फे असला तरी त्यात संजय भावे, मी आणि ६ अन्य मायबोलीकरांचा समावेश होता. इथे वृत्तांत पाहू शकता :
https://www.misalpav.com/node/53374

,
मलाही तुम्हाला कधीतरी भेटायला आवडेलच.
जमल्यास यंदा ऑनलाईन हजेरी लावा, हा का ना का Happy

आपण सर्वांनी भेटण्यासाठी पुन्हा एक गटग जानेवारी महिन्यात करण्याचे ठरते आहे हो !!>>>>>>>
धनि आणि rmd भारतात येणार आहेत. १ फेब्रुवारीला पुण्यात गटग करायचे ठरले आहे. ठिकाण नक्की झाले की सविस्तर धागा येईलच.

ऋतुराज
योग चांगला आहे पण . . .
नेमके 30 जानेवारीच्या सुमारासच मला परगावी जायला लागण्याची दाट शक्यता आहे. अंदाजे पाच दिवस.

* धनि आणि rmd>>>
त्यांचा मुक्काम किती आहे?

>>>>>>धनि आणि rmd
मस्त! मस्त!! दोघे दिलखुलास आहेत.

Pages