Submitted by अनन्त्_यात्री on 12 February, 2025 - 04:14
शब्दांचा दंश जिव्हारी-
होता मी विमुक्त झालो
माथ्यावर सूर्य तरीही
काजव्यासवे झगमगलो
शब्दांची अविरत गाज
भवताल भारूनी उरली
नादावर अनुनादाची
हलकेच लहर शिरशिरली
शब्दांचा अबलख वारू
चौखूर उधळुनी गेला
अर्थाचा लगाम लहरी
हातून कधीचा सुटला
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वा!
वा!
>>> होताच मी विमुक्त झालो
इथे वृत्त गडबडतंय - 'होता मी' असं हवं आहे का?
सुरेख!
सुरेख!
स्वाती_आंबोळे, धन्यवाद .
स्वाती_आंबोळे, धन्यवाद . सुचविलेली दुरुस्ती केलीय
rmd धन्यवाद