Submitted by तुष्कीनागपुरी on 11 February, 2025 - 05:27
एकदा एका झुरळाला
असह्य झाले झुरळपण
त्याने फुलपाखरू होण्याचा
मनामधे केला प्रण
विविध रंगांनी आपले
पंख त्याने रंगवले
फुलांवर दिमाखात
तेही मिरवू लागले
फुलपाखरामध्ये फिरला
पाहिल्या विविध छटा
पण थोड्याच वेळात
झाला एकटा एकटा
त्याला समजणारे
तिथे कोणीच नव्हते
फुलपाखरांचे सगळे
संदर्भ वेगळे होते
ओशाळला बिचारा
परत फिरला माघारी
मित्रांनी केली होती
स्वागताची तैयारी
बगिचा रिटर्न झुरळ
म्हणून मित्रांचे स्वागत
ग्रहण करत बिलगला
सगळ्यांना धावत धावत
मनापासून म्हणाला
मित्रांनो मी चुकलो
आपल्याच वेडात ख-या
झुरळपणाला मुकलो
आता एक चांगले
झुरळ व्हायचे ठरवलेय
स्वतःच्या अस्तित्वाला
आता मी ओळखलय
तुष्की नागपुरी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त आहे. आशय आवडला.
मस्त आहे. आशय आवडला.
@रानभुली, धन्यवाद
@रानभुली, धन्यवाद
आवडली.
आवडली.