India's got latent - चला निषेध नोंदवूया.
India's got latent अश्या नावाचा एक कार्यक्रम येतो.
कुठे येतो कल्पना नाही. पण फेसबूक, इन्स्टा, युट्यूब वर शॉर्ट आणि रिल्स स्वरूपात याचे व्हिडिओ मुबलक बघावयास मिळतात.
Latent या शब्दाचा अर्थ काय मला माहीत नाही. मी आधी ते टॅलेंट समजूनच याचे काही एपिसोड बघितले. एक दोन फनी वाटले म्हणून अजून काही एपिसोड बघितले तसे वरचेवर दिसू लागले. आणि हळूहळू त्यांचा ठेवणीतील 18+ स्टॉक समोर येऊ लागला. मग मात्र मी न बघण्याची काळजी घेऊ लागलो कारण मोबाईल मुलांच्या हातात सुद्धा जातो.
तरीही अध्येमध्ये याचे व्हिडिओ नजरेस पडायचेच. आणि रिल बघने हे असे व्यसन आहे की जे समोर येईल ते झोप उडवून बघितले जाते.
गेल्या आठवड्यात मात्र हादरवून टाकणारे व्हिडिओ नजरेस पडले. मुले मुली एकत्र बसले आहेत आणि एकमेकांची खेचणे म्हणजे रोस्ट करणे या नावाखाली काहीही अश्लील शब्दफेक चालू आहे. म्हटले हे तर फार वाया गेलेले प्रकरण आहे. दूर राहिलेलेच चांगले.
आणि आज त्यांनी काहीतरी मोठे कांड केले, अश्लील टिप्पणीचा कळस गाठला ज्या बद्दल दिलगिरी व्यक्त करताना दिसले.
बातमी काय हे शोधले तर खरेच किळस वाटावे आणि युवा पिढीची चिंता वाटावी असे एकेक व्हिडिओ समोर आले.
चिंता यासाठी वाटली कारण ज्याने आज हे कांड केले त्या Ranveer Allahbadi याला नरेंद्र मोदींच्या हस्ते National creater award असा पुरस्कार मिळाला आहे.
चिंता यासाठी वाटली कारण हा शो जो चालवतो तो समय रैना नावाचा मुलगा अमिताभच्या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात आला होता आणि अमिताभ त्याच्या विनोद बुद्धीचे कौतुक करतl होता.
चिंता यासाठी वाटली कारण ही मुले एकीकडे आदर्श म्हणून समोर आणली जात आहेत तर तेच दुसरीकडे चुकीचा आदर्श ठेवत आहेत.
कोण बनेगा करोडपतीमध्ये या समय रैना सोबत एक तन्मय भट म्हणून मुलगा आलेला. जर मी चुकत नसेल तर यालाच मी कित्येक वर्षांपूर्वी एआयबी रोस्ट या कार्यक्रमात रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करन जोहर या बॉलीवूड कलाकारांसोबत अश्लीलतेची निचतम पातळी गाठताना पाहिले होते.
आज India's got latent ची बातमी पाहिल्यावर तो कार्यक्रम आठवला कारण मी त्यावेळी देखील मायबोलीवर धागा काढला होता. आणि धक्का तेव्हा बसलेला जेव्हा काही लोकं त्या कार्यक्रमाचे कौतुक करत होते, तर कित्येक जण आपल्याला काय त्याचे म्हणत होते. उलट रुचत नाही तर आपण असले कार्यक्रम बघू नये हा उपाय सुचवत होते.
तो धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/52596
आज पुन्हा मायबोलीवर धागा काढला कारण आज "आपल्याला काय त्याचे?" म्हणावे अशी परिस्थिती उरली नाहीये. आज कॉलेज जाणारया प्रत्येक मुलाकडे मोबाईल असतो तर शाळेत जाणाऱ्या मुलांचे सुद्धा इंस्टाग्राम अकाऊंट असते. आणि त्यांनाही हे व्हिडिओ कुठल्याही सेन्सॉरशिपशिवाय बघायला उपलब्ध असतात.
मुळात लहान मुलांनीच काय पुरेशी अक्कल न आलेल्या कुठल्याही तरुणांनी असे व्हिडिओ बघू नयेत असे वाटते.
सोशल मीडियावर सर्रास दिसणाऱ्या या कंटेंटवर काही निर्बंध असावेत असे वाटते.
म्हणून आज संधी मिळाली आहे तर निषेध नोंदवतो!
निषेध नोंदवताय की कौतुक करताय
निषेध नोंदवताय की कौतुक करताय?
ऋन्मेऽऽष >> तुमच्या
ऋन्मेऽऽष >> तुमच्या जाहिरातीचा इतका फायदा झाला की आता नेटफ्लिक्स वर पण यायला लागले हे
धागा गैर प्रकारांचा निषेध
धागा गैर प्रकारांचा निषेध नोंदवायलाच आहे.
पण याचा अर्थ कोणाला फासावर लटकवायचे नाहीये.
लॅटेंट सीजन २ एपिसोड १ अजून पाहिला नाही.
पण ज्यांनी पाहिला त्यांनी प्लीज कन्फर्म करावे की ज्या गोष्टींवरून वाद झाला होता ती पातळी आताही कायम आहे की आता सुधारणा आहे.
सुधारणा असल्यास ते या धाग्याचे यश म्हणू शकतो
समय रहेना आणि लेटन हे काय आहे
समय रहेना आणि लेटन हे काय आहे याची माहिती सांगा.
आज रात्री वेळ मिळाला तर बघेन.
आज रात्री वेळ मिळाला तर बघेन.
समय रैना स्टील अलाईववाला व्हिडिओ मागे शाळेच्या ग्रूपवर शेअर केला होता तेव्हा चर्चा झालेली. मगाशी तिथल्या एका मित्राने सांगितले की यावेळी काळजी घेऊन बनवला आहे एपिसोड. तरी माझे मत व्हिडिओ बघूनच मांडेन
मजा आली लेटंट बघून.
मजा आली लेटंट बघून.
पूर्वी काय गोंधळ झालेला माहीत नाही, पण मला जाम मजा आली हा एपिसोड बघून.
निषेध कुठे नोंदवायचा? कुणाचा?
निषेध कुठे नोंदवायचा? कुणाचा? का?
माहिती दिली तर निर्णय घेता येईल. म्याटरर काय आहे?
मी आधीचा सिझन, बहुचर्चित
मी आधीचा सिझन, बहुचर्चित एपिसोड, कमबॅक काहीही बघितलेले नाही...नेटफ्लिक्सवर दिसला पहिला एपिसोड लावला तेही रिल मधे प्रसिद्ध झालेल्या ट्र्म्पसाठीच !! फार भन्नाट पकडल त्याने कॅरेक्टर...बाकी समय रैना काहि खास वाटला नाही बहुधा खुप कॉन्शस होता..सगळ "जपुन जपुन जा रे पुढे धोका आहे" चालल होत.
ओव्हर हाइप नेपोकिड आलिया एकदम मन्दोबा , जराही सेन्स ऑफ ह्युमर नाही..टॅटु माइकने दाखवत होती कपाळ बडवती!
आलिया के सुंदर मुलगी आहे.
आलिया के सुंदर मुलगी आहे. सौंदर्य शाप असतं. कारण त्यामुळे शत्रू तयार होतात. तिच्या चेहऱ्यात मासूमियत आहे. बघितलं कि दया येते. या क्रूर जगात हिचं कसं होणार असं वाटतं.
नेटफ्लिक्सवर आल्याने
नेटफ्लिक्सवर आल्याने आमच्याकडे मुलीने (वय वर्षे १२) बघायची इच्छा व्यक्त केली.
नेटफ्लिक्स वर असल्याने सेंसर वर्जन असेल असे वाटते.
तरी मी सावधपणे तिला म्हणालो की adult प्रकरण आहे ते. लहान मुलांसाठी नाही.
त्यावर ती म्हणाली की तिच्या कित्येक फ्रेंडसनी बघितले आहे.
मग मी म्हटले ओके. त्या केसमध्ये वीकेंडला बघूया. त्याआधी मला बघून घ्यावे लागणार.
त्यात प्रोफॅनिटी/ एफ वर्डस
त्यात प्रोफॅनिटी/ एफ वर्डस आहेत. मला आठवत असेल तर म्युटही केलेले नाही. मुलांना दाखवण्यासारखे माझ्यामते नाही.
इतकी काय हौस आहे लग्गेच
इतकी काय हौस आहे लग्गेच मुलांना ओक्के म्हणण्याची? ना का मतलब ना नही होता है?
अंशतः सहमत आहे...
अंशतः सहमत आहे...
नांव बघितल्यानंतर त्यांना अपेक्षित वेगळं आहे हे सांगणे न लगे.
****************
आलिशान गाडीखाली चिरडणारा अगरवाल आणि कठड्यावरून ढकलून दिला गेलेला अगरवाल - दोघेही एकाच कारणातून घडत आहेत.
एखाद्याचा जीव घेणं फार मोठं पाप किंवा फार वाईट कृत्य नाहीये - हा समज तरुण मेंदुंमधे रुजतो आहे - हे आपोआप घडत नाहीये.
आई वडिलांना सांगायची भीती वाटली म्हणून खून केला - असं नाहीये ते.
आई वडिलांना सांगणं गैरसोयीचा प्रकार वाटला, त्यासमोर “खून करणं” फार काही वेगळं वाटलं नाही - असंय ते.
श्रीमंत वर्गाने पुढची पिढी घडवण्यात खाल्लेली माती बघून आतातरी मध्यम वर्गाने जागं व्हायला हवंय.
समाजाने पुढच्या पिढीत नीतिमूल्यं रुजवण्याची जबाबदारी ऑप्शनल केली की जे होतं ते आपण अनुभवत आहोत.
हा रोग आधी उच्चभ्रू वर्तुळात पसरला.
तिथून झपाट्याने अस्पिरेशनल मिडल क्लासमध्ये मुरला.
ईच चाईल्ड इज स्पेशल
ही / शी हॅज फ्रीडम ऑफ चॉईस
लेट हिम / हर अलोन
रिस्पेक्ट हिज / हर प्रायव्हसी
लेट हिम / हर ग्रो इनटू अॅन इंडिपेंडंट पर्सन
लेट हिम / हर वॉच / बी विथ पीपल दे वॉन्ट
ही सगळी “सोबो” (साऊथ बॉम्बे) थेरं चित्रपट, सीरिअल्समधून आपल्यापर्यंत पोहोचली आणि मुलांच्या मेंदूत रुजली.
चांगलं वाईटाची समज यायच्या आत कोवळ्या मनांना “मुक्त” केलं आपण.
रूढी परंपरांमध्ये “बांधून” ठेवायचं नव्हतं आपल्याला मुलांना.
त्यांच्यावर नीतिमत्तेचे, साधनशुचितेचे संस्कार करणं बुरसटलेलं वाटलं आपल्याला.
मुलांना योग्य-अयोग्य, पाप-पुण्य यात फरक करणं शिकवण्याची जबाबदारी नको होती आपल्याला. यातूनच मुलांना मोकळीक देण्याच्या नावाखाली बेबंद करून टाकलं आपण.
परिणाम समोर आहेत.
त्यांना “स्वातंत्र्य” दिलं असं म्हणून - आपली पोरं काय खातात, काय बघतात, काय विचार करतात - याकडे लक्ष देण्याच्या जबाबदारीतून आपण हात झटकून टाकले.
“आई, काहीही काय? वेडी आहेस का?” असं म्हणणारी १४-१५ वर्षांची मुलं मुली सर्रास दिसत आहेत चहूकडे. कशाचं लक्षण आहे हे? धाक नसल्याचं! आईचा नाही, बापाचा नाही, कुणाचाच नाही.
पण हे म्हटलं रे म्हटलं की “धाक नको शिस्त हवी” वगैरे उथळ आणि हास्यास्पद तर्कट मारले जातात. धाकाशिवाय शिस्त लागत असते काय? पोरांना लाडीगोडी लावून शिस्त लागत असते काय? किती बिनडोक होत चाललोय आपण!
आपल्या या बिनडोकपणाची किंमत पुढची पिढी चुकवते आहे.
चिरडून टाकणारा वेदांत अगरवाल आणि ढकलला गेलेला केतन अगरवाल - हे दोघेही याच धाक नसण्यातून अनुक्रमे गुन्हेगार आणि गुन्ह्याचे शिकार झाले आहेत.
जामीन मिळाल्यानंतर वेदांतचं जंगी स्वागत करणारे आई बाप बघितले आहेत आपण. काय संस्कार केले असतील यांनी वेदांतवर? पुढे कसा जगणार आहे हा? मुळात असा कसा घडला आहे हा?
केतनला प्लॅन करून मारण्याचा कट रचणारी सिया केतनला आज ओळखत नव्हती. फॅमिली रिलेशन्स होते त्यांचे जुने. ओळखत होते एकमेकांना. तरी त्याला मारण्याचा कट रचता आला. का शक्य झालं हे?
कारण स्पिरिच्युअल फाऊंडेशन हललं आहे आपलं.
प्रत्येकात ईश्वराचा अंश आहे हे शिकवणं बंद झालं आहे आपलं.
प्रत्येक जीवाचा आदर, सन्मान करायला हवा हा “उपदेश” अतिशयच “बोअरिंग” आहे हे आपणच आपल्या पुढच्या पिढीला भासवलं आहे.
आता मुलांबरोबर बसून रामायण, महाभारत वा सुरभी बघितलं जात नाही.
मुलं त्यांच्या स्क्रीन्सवर अॅनिमे बघतात. अॅनिमल बघतात. हिंसक गेम्स खेळतात.
भावना बोथट झाल्यात यांच्या. आपण करून बसलोय वा करू धजावतोय ते कृत्य वावगं, वेगळं, विचित्र, अनैतिक आहे - असं वाटतच नाहीये त्यांना.
सराईत गुन्हेगार प्लॅन करतो तसे प्लॅन होत आहेत. किंवा सराईत गुन्हेगार जसा कसल्याही पश्चात्तापाशिवाय जगू शकतो तसे त्यातून बाहेर येत आहेत.
आणि हे - अगरवाल आणि अगरवाल - हे अपवाद नाहीत. तुरळक नाहीये हे. मोठ्याप्रमाणावर होतंय. इन्टेन्सिटी कमी अधिक असेल, पण हे सर्वत्र होतंय.
आपण आज सुखी समाधानी जगू शकतो आहोत कारण आपल्या पूर्वजांनी कष्टानी एक व्यवस्था बांधली होती. आपण आपल्या आळसापोटी ती व्यवस्था खिळखिळी करून सोडतोय - पुढची पिढी किंमत मोजणार आहे त्याची.
जागं व्हायला हवंय आपण!
ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
अमितव, हो, स्वतः पहिले
@ अमितव,
हो, स्वतः पहिले यासाठीच बघणार कारण अगदीच काही वाह्यात वाटले तर ते कानावर पडू नये याची काळजी घेता येईल.
तरीही हट्टाने बघायचेच का आहे तर प्रॉब्लेम असा आहे की एकदा मुलांच्या फ्रेंडसर्कल मध्ये बघितले गेले, चर्चा सुरू झाली तर उत्सुकतेने ते बघणारच. जर अडवले तर उत्सुकता आणखी वाढते आणि मग ते आणखी थ्रिलने बघितले जाते. मला ते थ्रिल किल करायचे असते म्हणून लगेच ओके म्हणायचे असते
पण म्हणून स्वतःहून आठवण करून देणार नाही. पण समोरून आठवण झालीच तर विषय ताणनार नाही. आपण तयारीत असलेले बरे.
आणि म्हणूनच अश्या शो वर माझा आक्षेप यासाठीच असतो की मुलांना घरी किंवा बाहेर सहज उपलब्ध होईल अशा सोशल मिडिया रीळ किंवा नेटफ्लिक्स वगैरे वर हे सेन्सर न करता नको.
बाकी एफ वर्ड ओके.. आमच्या इथे गार्डनमधून मुले खेळताना ते ऐकू येतात. आपण किती कुठले बॅडवर्ड वापरायचे हे आमच्याकडे मी क्लिअर केले आहे. त्यातही कुठले बॅड वर्ड सौम्य आणि कुठले अगदीच वाह्यात असतात हे सुद्धा समजावले आहे. मी स्वतः चाळीत बालपण गेलेला आहे. मला टीनेजर मुलांच्या तोंडी शिव्या असण्याचे कौतुक नाही.
फक्त मला त्या शो मध्ये हिणवायला गलिच्छ भाषा वापरली जात असेल तर ते नको आहे. शिव्या दिल्या की आपण कूल वाटतो हा विचार नको आहे. आणि ज्यावरून बाद झालेला ती लेव्हल नक्कीच जराही नसेल अशी आशा करतो. असो, मीच अजून पाहिला नाही तर त्यावर सध्या काही बोलायला नको.
अर्थात मी काही हा सल्ला इतर पालकांना देणार नाही. कारण प्रत्येकाची केस वेगळी असते. प्रत्येकाची मुले आणि त्यांच्या आजूबाजूचे वातावरण वेगळे असते. त्यात आमच्या घरचे कल्चर वेगळेच आहे. आम्ही घरी मित्रांमध्ये वापरली जाते तशी टपोरी भाषा आपसात वापरतो. जी सर्वसाधारण घरात वापरली जात नाही. पण तो वेगळ्या धाग्याच्या विषय राहील. त्या मागचा माझा पॉईंट ऑफ व्यू आणि त्यातली मजा अनुभवल्याशिवाय किंवा थोडक्यात सांगून कोणाला कळणार नाही. तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल
मुलांनी शिव्या ऐकल्या असतातच.
मुलांनी शिव्या ऐकल्या असतातच.
केवळ शिव्याच असतील तर बघू द्यावे असे माझे वैयक्तिक मत आहे. लहानपणी मी सुधा कॅरीमिनाटी वैगेरे शिवराळ कंटेंट खूप पहिले. ते त्याकाळी भयंकर विनोदी वैगेरे वाटायचे. पण आज त्यात हसू येण्यासारखे काय हा प्रश्न पडतो. पण कधीही स्वतःला तोंडातून शिवी काढावी वाटली नाही. त्यावेळीही नाही आणि आजही नाही.
ऋन्म्या, ती सगळी भगवद्गीता
ऋन्म्या, ती सगळी भगवद्गीता ठीकच आहे. पण ना का मतलब ना होता है. अॅडल्ट्स झाल्याशिवाय काय बघायचं नाही हे मुलांना सांगितलंस का? ते बघतीलच किंवा नाहीच, किंवा तू हो म्हणल्याशिवाय नाही बघणार हा वेगळा विषय आहे. चोरुन बघू नये म्हणुन अधिकृत महामार्ग तयार करून द्यायचा का, आणि ते बरोबर आहे का- हा प्रश्न. 'ओनली अॅडल्ट्स' हा विषय तुम्ही घरात कसा ट्रीट करता हा विषय. मलाही यावर समाधानकारक रस्ता सापडलेला नाही. तू धागा काढतोस का?
<< चोरुन बघू नये म्हणुन
<< चोरुन बघू नये म्हणुन अधिकृत महामार्ग तयार करून द्यायचा का
>>>
समजला मुद्दा.
पण अधिकृत महामार्ग नाही. सीसीटीव्ही के निगराणी मे असलेला मार्ग म्हणून याकडे मी बघतो.
एखादी गोष्ट (जसे की शिव्या देणे) ही आसपासच्या आपण राहतो त्या समाजात नॉर्मल असते. आणि त्या समाजाचा भाग म्हणून तुम्हीही द्याल. पण तरीही ती चुकीचीच असते हे मुलाना समजावे याकडे माझा कल असतो.
बाकी Adults only विषयाबाबत मुलांशी कसे डील करावे याबाबत स्वतंत्र धागा वीकेंडला काढू शकतो. मागेही काढणार होतो पण राहिलेला.. इतर कोणी काढला तरी चालेलच. विषय इंटरेस्टचा आहे.
माझ्या मुलाने बघायचा विषय
माझ्या मुलाने बघायचा विषय काढला असता तरी मी ही नाही न म्हणता तुझ्यासारखाच विचार केला असता. ह्यातून रिबेल करण्यापेक्षा यात काही फार ग्रेट नाही हे त्यालाच समजणे जास्त ऑरगॅनिक आहे.
चोरून बघण्यापेक्षा काही ठिकाणी महामार्ग नाही केला तरी त्या पायवाटेवरून एकत्र प्रवास बरा असं वाटतं.
काहीतरी कुठेतरी भारी आहे,
काहीतरी कुठेतरी भारी आहे, एक्सायटिंग आहे, ग्रेट आहे, आपल्याला माहित नसलेलं पण टेम्प्ट करणारं आहे, हे भारी असतं ना. एखाद्या गोष्टीत फार काय ग्रेट नाही, हे कळाल्यावर पुढे जाऊन या भिडूंसाठी डिप्रेसिंग होतं. मला स्वतःलाच काही प्रमाणात झालेलं. यांना किती होईल, हे गणितं आणि थेरम्स मांडून कदाचित सांगता येईल, पण सारे सारखे नसतात हेही आहेच.
एथिक्सच्या आणि कोड ऑफ कंडक्टच्या बाबतीत अभुतपूर्व कोंडीत सापडलेली आपली शेवटची पिढी असेल का / ना? ऋन्म्या धागा काढ बघू.
आपली शेवटची पिढी असेल का / ना
आपली शेवटची पिढी असेल का / ना?
>>>>
शेवटचे असे काही ठोस म्हणता येणार नाही. पण बदलाचा वेग वाढला आहे. जनरेशन गॅपचा वेग वाढला आहे. मला माझ्या मुलांना वाढवताना तो कव्हर करायचा आहे. माझ्या आईवडिलांनी मला खूप चांगले संस्कार दिले असे म्हणू शकतो कारण त्यानुसार मी घडलो आहे. पण म्हणून त्यांची मेथड मी जशीच्या तशी वापरू शकत नाही. आपल्या आईवडिलांनी आपल्याला धाकात ठेवले म्हणून आपण आज चांगले घडलो तर धाकच हवा असे म्हणू शकत नाही. (आपल्या पिढीत सुद्धा काही सगळे सद्गुणांचे पुतळे नव्हते ते सोडा) पण आज मला माझी पॅरेंटिंग चालू काळाशी मॅच करायची आहे. आपण वापरत असलेली एखादी मेथड चुकीची सुद्धा असेल. अर्थात सामान्य पालक एक्स्पर्ट कसे असतील? ते चुकणारच. पण आपण मुलांच्या जडणघडणीचा विचार करत आहोत हे महत्वाचे आहे असे वाटते. वाया त्यांची मुले जातात ज्यांना काही पडलीच नसते. कारण त्या मुलांनाही हे समजले असते की आपल्या आईबापाला आपली काही पडलीच नाहीये आणि त्यातून ते निगरगट्ट झालेले असतात.
आपली शेवटची पिढी असेल का / ना
आपली शेवटची पिढी असेल का / ना? >>
असं बहुतेक प्रत्येक पिढीला वाटतं. कारण आपल्या आजोबांना वाटणारे एथिक्स आपण पायदळी तुडवलेले असतात. असे काही त्रिकालाबाधित एथिक्स नसावेतच.
एथिक्सच्या आणि कोड ऑफ
एथिक्सच्या आणि कोड ऑफ कंडक्टच्या बाबतीत अभुतपूर्व कोंडीत सापडलेली आपली
शेवटचीपिढी >> हा विचार विलक्षण आहे. पिढी शेवटची कि नाही अलाहिदा.कुणी धागा काढलाच तर तोपर्यंत विसरून गेलो असेन.
हो, प्र्त्येक पिढीला वाटतं.
हो, प्र्त्येक पिढीला वाटतं. पण एक्स्पोजर आणि एक्स्प्लोजन गेल्या दोन शतकांच्या तुलनेत गेल्या दोन दशकांत किती झालं असेल असं वाटतं?
तरीही हे मान्य आहेच की ते कितीही प्रमाणात झालं असलं तरी परिमाणं बदलली. परिमाणं बदलली नसल्याचं ढोंग तरी नको करुया- हे बरोबर आहे. या सार्यात मी कुठेय हे मी फिगरआऊट करण्याचा प्रयत्न करतोय- इतकंच काय ते. त्याने काय होईल न होईल, पण मी याच काळात याच अवस्थेत याच प्रदेशात नक्की का आलो- हे समजायला किंवा समजणार नाही- हे समजायला मदत होईल- इतकंच. बहुतेक काहीच समजणार नाही हे गृहित धरलं आहेच,
धागा निघणार असेल (तर) डोक्यात
धागा निघणार असेल (तर) डोक्यात काय आलं होतं ते थोडक्यात नोंदवतो.
कोणत्याही विचारसरणीच्या डाव्या किंवा उजव्या किंवा पाश्चात्य / भारतीय / व्यक्तीस्वातंत्र्याच्या अतिरेकाला बळी न पडता, स्वातंत्र्य हे जबाबदारीसोबत येतं हे तत्त्व मुलांना शिकवणं गरजेचं आहे. मुलांना पूर्णपणे मोकळं सोडणं जितकं घातक आहे, तितकंच त्यांच्यावर अवाजवी बंधनं आणून त्यांना गुदमरवून टाकणंही चुकीचं आहे.
भारतीय वातावरणात * सुवर्णमध्य साधायचा असेल, तर 'धाक' कमी आणि 'संवाद' जास्त असावा लागेल, जेणेकरून मुलं इंटरनेटवर काही चुकीचं पाहतील तेव्हा ते पालकांपासून लपवण्याऐवजी स्वतःहून येऊन बोलू शकतील.
* आपण कुठे आहोत हे महत्वाचं. सर्वांना, सर्वत्र , सर्वकाळ लागू होईल असं तत्व याबाबतीत असेल असं वाटत नाही. थंब रूल डिराईव्ह करणे म्हणजे निव्वळ ऑनलाईन सभा जिंकणे होईल. प्रत्यक्षात अंमलात आणता येईल असे तत्त्व अंगिकारावे....
धाग्याच्या विषयाबाबत.
धाग्याच्या विषयाबाबत.
मला स्वतःला समय रैना वगैरे मंडळींचं अप्रूप अजिबात नाही. इन्सल्ट कॉमेडीचंही नाही. तिडीकच आहे. पण टीन एजर्स मधे काय असावं याचा विचार पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीच्या अंगाने करायचा कि मुलांचे मानसशास्त्र , मेंदूचा विकास आणि मानवी वर्तन या पॅरामीटरवर करायचे हा माझ्या मते कळीचा प्रश्न असायला पाहीजे.
मी हे शोज बघत नाही पण ऐकून आहे. क्लिप्स दिसतात. सुनील पाल कसा का असेना त्याला रोस्ट करण्याच्या नावाखाली इन्सल्ट केले गेले. याचे परिणाम मुलांवर काय होतात? इथे अमेरिकेत कसे स्वातंत्र्य देतात आणि भारतात कशी गळचेपी होते याबद्दल नकोच बोलायला. इथे बालमानसशास्त्राचे तज्ञ असतील ते करेक्ट करतीलच.
मुलांचा मेंदू स्पंजसारखा असतो. हे वाक्य कितीही गुळगुळीत वाटलं तरी नाईलाज आहे. मुलं जे पाहतात, ते केवळ करमणूक म्हणून पाहत नाहीत, तर त्यातून ते जगात कसं वागायचं याचे सामाजिक संकेत, नियम शिकत असतात.
मानवी मेंदूमध्ये मिरर न्युरॉन्स असतात, जे आपल्याला इतरांचे दुःख किंवा वेदना समजून घेण्यास (करुणा) मदत करतात. जेव्हा मुलं सातत्याने असे शो पाहतात जिथे दुसऱ्याचा अपमान करून, त्याला कमी लेखून हसवलं जातं, तेव्हा त्यांच्या मेंदूतील ही
सहानुभूतीचीकरूणेची भावना बधीर होऊ लागते. त्यांना दुसऱ्याची थट्टा उडवणे नॉर्मल वाटू लागते. प्रत्येकाची जडणघडण वेगळी असते. प्रत्येक जण अशा प्रकारच्या थट्टेसाठी तयार नसतो. हे माहिती नसताना अशा शोज पाहण्याने मुलांच्या बाबतीत सहानुभूतीचा आणि करूणेचाही र्हास होऊ शकतो. ओंकार दाभाडकर यांच्या पोस्टशी अंशतः सहमत आहे हे त्यासाठी.रोस्टिंग शोमध्ये वापरली जाणारी भाषा, टोन आणि देहबोली मुलं नकळत आत्मसात करतात. शालेय वयात होणारे बुलिंग किंवा मित्रांना चिडवणे, टोमणे मारणे यामागे अशा कंटेन्टचा मोठा हात असतो. ही भाषा नॉर्मल होऊ शकते.
जी मुलं स्वतः न्यूनगंडाने ग्रस्त असतात, ती अशा शोमधील इन्सल्ट स्वतःशी जोडून घेतात आणि अधिक अंतर्मुख किंवा आक्रमक बनू शकतात. हे फक्त मुलांच्या बाबतीतच नाही तर मोठ्यांच्या बाबतीतही होऊ शकतं. मुलांच्या बाबतीत अनुभवाची कमतरता, समज आलेली नसणे हे अधिकचे पॅरामीटर्स आहेत. (घरात एकटे राहणारे पुरूष, समाजात न मिसळणारे पुरूष किंवा लहान मुलं यांचं मानसशास्त्र पाहिलं तर त्यांच्यात काही गुण हे जादाचे असतात, काही इतरांच्या द्दृष्टीने कमी असतात. पण अशांना ही भाषा, ही वागणूक मानवत नाही).
म्याटर काय आहे?
म्याटर काय आहे?
>>>>>म्याटर काय आहे?
>>>>>म्याटर काय आहे?

अचानक उपटून रामाची सीता कोण - असे लोक ही ओळ म्हणत खरे. हाहाहा.
नाही हो. हे तर आपल्याच
नाही हो. हे तर आपल्याच दुसऱ्या आयडीच्या पोस्ट कडे लक्ष वेधण्यासाठी
(No subject)
दु:खी आत्माचार्य!
दु:खी आत्माचार्य!
Pages