
आपल्यापैकी बहुतेकांच्या घरांमध्ये छोटे-साधे का होईना देवघर असायचे-असते. मराठी लेखनात संध्याकाळी दिवेलागणीला आजी-आजोबा-वडीलधारी मंडळी कशी लहान मुलांना शुभम करोति, रामरक्षादि प्रार्थना परवचा म्हणायला उद्युक्त करत, शिकवत अशी वर्णने फार येतात. त्यावरून दैनंदिन प्रार्थना हा बहुसंख्य घरांमध्ये रुळलेला उपचार होता असा निष्कर्ष काढता येतो. आजही घरोघरी देवघर दिसते. कुणाकडे मोठे, कुणाकडे साधे, फळीवरचे. मनःशांतीसाठी, अडचणीच्यावेळी करुणा भाकण्यासाठी, आनंदाच्या प्रसंगी आभार मानण्यासाठी, सणावाराचा आमोद साजरा करण्यासाठी देवघरात देवपूजा-प्रार्थना करणे घरोघरी परंपरेने चालत आलेले आहे.
सहसा घरातले जेष्ठ पंचोपचाराने किंवा दोनवेळा दिवा लावून, मंत्रादि म्हणून देवपूजा करतांना दिसतात. कार्यबाहुल्यामुळे काहीजण दररोज पूजन करू शकत नसले तरी घराबाहेर पडतांना देवघरातल्या देवाला नमस्कार करून बाहेर पडतात. काहीजण तिथे बसून मंत्र, प्रार्थना, पोथ्या, धार्मिक पुस्तकांचे नियमित वाचन करतात. आदल्या पीढीत असलेला सकाळ-संध्याकाळ देवापुढे दिवा लावण्याचा उपचार काहींकडे आता 'दिवसातून वेळ मिळेल तेंव्हा' पार पडतो. बहुसंख्य घरांमध्ये कुठल्या ना कुठल्या रूपात 'दैनंदिन देवपूजा' होते आणि ती करण्यासाठी नेमून दिलेले स्थान म्हणून 'देवघर' आपल्या घरांमधील एक महत्वाची जागा असते हे निश्चित .
देवघर / shrine घरात असणे ही एक छान कन्सेप्ट आहे. आस्तिक मनाला सुखावणारी, थोडे गुंतवणारी. That part of home as a sacred sanctuary, a fortress of calm and purity; where one retreats for solace and peace. देवघर वैयक्तिक आवडीप्रमाणे अनेकानेक प्रकारात दिसते. जुन्या मोठ्या घरांमधल्या प्रशस्त, शिसवी किंवा सागवानाच्या लाकडी देवघरांपासून ते संगमरवराची कोरीव, काचेची, कपाटासारखी बंदिस्त, भिंतीतच देवडीसारखी केलेली, पाट-चौरंगावर मांडलेली, भिंती-फडताळावरची No fuss साधी अशी देवघरे नजरेस पडतात. निरनिराळ्या उपकरणांनी, दिवे-समयांनी देवघर सजवणे अनेकांना आवडते.
आधी स्वतःच्या आणि प्रियजनांच्या घरातल्या देवघराबद्दल लिहितो थोडे.
♠️ सर्वसामान्य लहान मुलांप्रमाणे माझी देवघराची पहिली ओळख-स्मृती दोन्ही आजोळघरांची आहे. पैतृक कुटुंबात आजी शेतीवाडी स्वतः एकट्याने सांभाळणारी पूर्णवेळ वर्किंग वुमन असल्याने तिचे देवघर - देवपूजा साधे सुटसुटीत होते. भिंतीतल्या एका देवळीत आंब्याच्या लाकडी पाटावर ठेवलेले विग्रह आणि अंगणात असलेल्या मोठ्या तगराची चार-दोन फुले वाहून, दोनवेळा दिवा दाखवून संपन्न होणारी साधी नित्य देवपूजा. बाकी काम एके काम. नो-फस. तिची देवाबद्दलची श्रद्धा मात्र बावन्नकशी होती. विशेष आनंदाची घटना घडल्यास चटकन त्या देवघरातल्या देवापुढे दिवा लावण्याची तिची पद्धत was her way of saying ‘Thank You’ to the Almighty.
♠️ दुसरीकडे आईच्या माहेरी खूप धार्मिक वातावरण होते, त्यांचे देवघर म्हणजे मोठाच पसारा. घरात गायत्रीचे मंदिर, त्यात देवादिकांच्या भरपूर प्रतिमा, त्यांना रेशमी वस्त्रे, खऱ्या सोन्या-रुप्याचे दागिने, रोज व्याघ्रचर्मावर बसून दिवसातून अनेकवेळा आहुती अर्पिण्यासाठीचे तांब्याचे अग्निकुंड, मंत्रोचारात संपन्न होणारे, घरात धूर-धूर करणारे नित्यअग्निहोत्र वगैरे. पूजेची भांडी वेगळी होतीच पण हवनकुंडासाठी लागणाऱ्या वस्तूंचे एक निराळेच जग होते. त्यात आंबा, कडुलिंब, वड, पिंपळ आणि चंदनाच्या झाडांच्या 'आपोआप गळून पडलेल्या/ तुटलेल्या' फांद्यांचे एकाच सुबक आकारात कापलेले छोटे-छोटे तुकडे, हाताने तोडलेल्या उसापासून केलेला जुना गूळ, गाईच्या दुधापासून केलेले, मातीच्या कोऱ्या माठात साठवलेले जुने तूप (वासराने मनसोक्त पिऊन मग उरलेले दूधच यासाठी वापरावे असा कडक नियम), हातसडीचे तांदूळ आणि जव अशा वस्तूंची प्रचंड गुंतागुंतीची आणि overtly demanding सिस्टीम होती. लहानपणी त्या घरातला मुक्काम पंधरवाड्यापेक्षा जास्त नसे म्हणून ते देवघर आणि त्या समृद्ध पसाऱ्याचे कौतुक वाटत असे. त्याचा कुटुंबाला, विशेषतः लहान मुलांना, सेवेकऱ्यांना किती जाच होत असेल ते फार नंतर समजले.
♠️ माझ्या १-२ बालमित्रांच्या घरी भरपूर देवप्रतिमा असलेले मोठे देव्हारे होते. सरसकट सर्व स्त्रिया-मुलींना शिवण्याची मनाई असणे आणि आम्हा मुलांनाही जवळ न जाता / न शिवता नमस्कार करण्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा आग्रह आवडत नसे. देवघरे मात्र सुंदर कोरीवकामांमुळे आणि त्या चमचमत्या लाकडी फिनिश मुळे फार आवडायची.
♠️ शेजारी पद्माबाईंच्या देवघरात सुंदर गाद्या-गिरद्यांवर पहुडलेला बालकृष्ण असलेले देवघर होते. त्याला पडदा सरकवून छोट्या छोट्या भांड्यांतून जेवण-पाणी, दुपारी वामकुक्षी अशी नित्यसेवा अकाली वैधव्य आलेल्या पद्माबाई करत. घरात कुणीही नवीन कपडा आणला की त्यातला एक धागा काढून त्यांच्या देवाला वाहत. “मेरे लड्डूगोपाल को भोजन कौन करायेगा” या विवंचनेत त्या कुठेच परगावी जात नसत. ते देवघर खूप सुंदर होते आणि बाईंचे वागणे गमतीशीर.
♠️ दिल्लीतल्या प्रदीर्घ वास्तव्यात एकदा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींचे १ सफदरजंग रोडवरचे राहते घर आणि त्यातले देवघर बघायचा योग आला. तेसुद्धा एक विशेष लक्षात राहण्यासारखे देवघर. शिव परिवार, सूर्य, देवी इत्यादी हिंदू देवादिकांच्या प्रतिमांसोबतच रुद्राक्ष, शंख, तुळशीमाळ, मुखपृष्ठावर नाजूक कश्मिरी कलाकुसर असलेली कुराणाची प्रत, Holy Cross , गुरुग्रंथ साहिब ची प्रत, गुरुमुखीतले जपजी साहिब, पारशी धर्मग्रंथ आणि झरतृष्ट, अहुरा माझदाच्या प्रतिमा असे सर्वसमावेशक देवघर त्यांच्या बहुआयामी आणि धर्मश्रद्ध व्यक्तिमत्वाचे extension वाटले होते मला.
♠️ साधारण १२ वर्षांपूर्वी पाहिलेले एका चेन्नईकर मित्राच्या घरातले देवघर निराळ्या कारणासाठी लक्षात राहिले आहे. सदैव कुलूपबंद, बाहेरचा दरवाजा बंद केल्यास कोठीघर वाटावे असे. आत मात्र सुंदर द्राविडी कोरीवकाम, भरगच्च सोनेरी फिनिश असलेले लाकडी खांब, भिंतीवर तंजावूर पद्धतीची चित्रे, दक्षिणी घाटाची पितळी भांडी-उपकरणी असलेले मोठे देवघर. फुले-धूप- मंगल कलश असे सजलेले. पण शापित, अस्पृश्य. ते मला एकदाच आणि निव्वळ अपघातानेच बघायला मिळाले कारण असा भाग त्याच्या घरात आहे हेसुद्धा कुणाला माहिती नव्हते-नाही. हे कुटुंब द्रमुक पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी, ईश्वराचे अस्तित्व कठोर शब्दात नाकारणारे, पूजा अर्चा आणि कर्मकांडाला जाहीररीत्या तिलांजली दिलेले. सर्व मित्र-नातेवाईक पक्षाचे खंदे कार्यकर्ते आणि पक्षप्रमुखांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातले. त्यात हा माणूस घनघोर आस्तिक असल्याचे कुणालाही सांगू धजत नव्हता. मूर्तिपूजा भयंकर पाप असल्याचे संस्कार त्याच्यावर लहान असल्यापासून झाले होते. रोज कामावरून घरी आल्यावर गुपचूप घरातले हे चोर-देवघर उघडून स्वतःला त्यात कोंडून पूजा करायचा आणि त्यातल्या मूर्ती-तसबिरींशी बोलायचा. ढसाढसा रडायचा. त्याच्या जीवनाचे अँकर असलेले हे देवघर मला आणि त्याच्या पत्नीला सोडून कुणालाच माहित नाही.

♠️ चेन्नई वास्तव्यात एक प्रतिथयश मेंदूतज्ञ डॉक्टर, चेन्नई महापालिकेत काम करणारा एक सामान्य कारकून आणि स्वतः च्या अय्यंगार वारश्याचा प्रचंड दर्प असलेल्या एक आर्किटेक्ट बाई अशा वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीतल्या तमिळ मित्रांकडून त्यांच्याकडे शैव, वैष्णव, स्मार्त, उर्ध्वपुंड-त्रिपुंडधारी, देवीपंचायतनी, सूर्यपंचायतनी वगैरे कुटुंबांची देवघरे एकमेकांपेक्षा वेगळी असतात आणि त्यांच्या दैनंदिन देवपूजेत फरक असतो हे समजले. म्हणजे त्यांनीच साभिमान सांगितले, मी न विचारता. उदा. देवालयाला “मनुष्यालय” म्हणणे, शैव घरात पतीने देवाची आरती करतांना पत्नीने उभे राहून घंटानाद करणे तर वैष्णव स्त्रियांनी आसनस्थ होऊन प्रार्थना-आरती म्हणणे; सायंकाळी शंखनाद करणे-न करणे, स्मार्तांकडे शिव, देवी, गणपती, सूर्य, विष्णु असे सर्वच देव फक्त पाच शालिग्रामांच्या रूपात असणे वगैरे. Very deeply enshrined rituals !

♠️ जापान आणि थायलंडमधील परिचितांकडे घर आणि ऑफिस दोन्हीकडे सुंदर सजवलेली देवघरे, त्यातल्या बुद्ध- बोधिसत्वाच्या देखण्या मूर्ती, समोर फुलाफळांची, जलपात्रांची अभिरुचीसंपन्न आरास असे दृश्य हमखास दिसायचे. बाहेर जातांना नमस्कार करुन जाण्याची आणि विशेषतः “येतो रे मी जरा जाऊन“ असे त्या देवाला मोठ्याने सांगायची पद्धत आणि झोपण्याच्या आधी घरातल्या देवघराचे दरवाज़े बंद करणे मस्ट! गंमत नुसती.

♠️ विराट कोहली,दीपिका पादुकोण सारखे सेलेब्रिटीज़ आपल्या प्रवासात स्वतःचे “मोबाइल” देवघर घेऊन जातात हे एक निरीक्षण. अनेक धर्मगुरुसुद्धा असेच करतात. सुपरस्टार रजनीकांत चेन्नईतील पोए’ज गार्डनच्या तर अमिताभ बच्चन मुंबईतल्या जलसातल्या देवघरात नित्यपूजा करत असतांनाचे फोटो-रील्स भरपूर प्रसिद्धी पावतात. अंबानींच्या एंटेलियातले देवघर इज सुपर व्हिजिबल थिंगी. It’s everywhere on visual media ! याबाबतीत सामान्य-असामान्य व्यक्तींमध्ये भेद असलाच तर तो देवघराचा पसारा किती मोठा,वैभवशाली किंवा किती साधा एवढाच.
♠️ Back to my own story: वयाच्या पंधरा वर्षांपर्यंत भाड्याच्या रहात असू, तिथे घरात साधे फळीवरचे देवघर होते, आईचा कोपरा. तिने मातृगृहातून आणलेली गायत्रीची छबी आणि चार-दोन अन्य पितळी मूर्ती. यातील गणपतीचे रूप तुंदिलतनु नसून six pack ab वाले आहे. आपल्या घरचा गणपती इतरांकडच्या गणपतीसारखा ढेरपोट्या नाही हे माझे लहानपणीचे एक दु:ख
आई पहाटे स्नान, देवपूजा, मंत्रपठण झाल्याशिवाय पाणीसुद्धा पीत नसे. याउलट बाबा देव मानत नाहीत. आईनी देवघरात देवापुढे दिवा लावला की ते त्या वातीनी सिगरेट पेटवत. वर्षानुवर्षे, दररोज ! दोघे आपापल्या भूमिकेवर ठाम, पण या मुद्दयावरून कधी त्यांच्यात वाद झालेला बघितला नाही. आम्ही भावंडे लहान होतो तेव्हां देवघराशी आमचा संबंध फक्त जो काही प्रसाद वगैरे ठेवला असेल तो सर्वप्रथम लंपास करण्यापुरता. पूजा-प्रार्थना करण्याची सक्ती, त्यासाठीचे प्रोत्साहन आम्हाला नव्हते.
♠️ पुढे शिक्षण, नोकरी-उद्योगानिमित्त बाहेर पडलो, अनेक घरा-शहरांतून वास्तव्य घडले पण माझे म्हणून देवघर- shrine कधी नव्हते. Devotional music विशेषत: हिन्दी मराठी भजनं आणि गुरुबानी शबद कीर्तन ऐकणे, काही स्तोत्रांना आणि भजनांना स्वतः चाली लावणे आणि हा पसारा ठेवलाय तो कोपरा पवित्र समजणे एव्हढाच माझा धर्मकर्माशी संबंध.

♠️ अकाली आई गेली आणि तिचे देवघर अनेक वर्ष ओसाड-उजाड पडले. पुढे अनेक वर्षांनी सौ आणि कन्या दोघींना एकाचवेळी दैनंदिन देवपूजेची इच्छा आणि पुढे सवय निर्माण झाली आणि घरातले देवघर पुन्हा सजीव झाले. आता त्यात आजी आणि आई दोघींचे देव आहेत, “अहो” आईंचेही काही. तस्मात् सगळेच विग्रह खूप जुने आहेत. सर्वात तरुण ३० ते सर्वात सिनियर १२६ वर्ष अशा वयाचे. माझा bend of mind Deeply religious yet non-ritualistic असा आहे. माझा देव माझ्या मनात. माझा मित्र. सखा, माझे प्रेयस. त्यामुळे देवपूजा, नित्य प्रार्थना माझ्यासाठी नाही. जमेल, मूड असेल तर कधीतरी दिवा दाखवतो, खूप ताजी फुले असतील तर सजावट करतो. देवघर आणि त्यातली भांडी-दिवे वगैरे घरातल्या इतर जागा-वस्तूंसारखेच स्वच्छ आणि टापटिप रहावे याकडे लक्ष देतो.

मनाच्या कंडीशनिंग मुळेही असेल पण सुस्नात,सुगंधी तुपा-तेलाचे दिवे, रंगीत फुले अशा आराशीत विराजमान झालेल्या, मंद प्रकाशात चमकणाऱ्या, कधीकाळी आई-आजीचा स्पर्श झालेल्या देवमूर्ती बघून फार आश्वस्त आणि प्रसन्न वाटते. पत्नी-कन्येच्या देवापुढे नत झालेल्या कपाळाचे आणि विग्रहांना स्पर्शून आलेल्या हातांचे चुंबन घेणे ही माझी देवपूजा !
आणि हो, सांगायचे राहिलेच, बाबांना सिगरेट सोडून आता खूप वर्ष झालीत
* * *
घरातल्या पूजास्थानाचा-देवघराचा धागा असावा अशी चर्चा माझ्या एका अन्य लेखावर झाली होती. एका गणेशोत्सवात देवघराचे फोटो शेयर करण्याचा धागा आला होता, तिथे काही चित्रे-आठवणी होत्या. :
(https://www.maayboli.com/node/85612)
त्यावरून आपल्यापैकी अनेकांना याविषयीचे विचार, आठवणी, अनुभव, फोटो, चिंतन शेयर करायला आवडेल असे वाटते. तसे जरूर करा हा आग्रह.
@ ऋतुराज,
@ ऋतुराज,
चाफ्याच्या सुगंधी फुलांनी नटलेला तुमचा देव्हारा आला डोळ्यासमोर ! तुमच्या आमच्या कॉमन पसंतीचे फूल आणि सुगंध.
नर्मदेच्या वरच्या उत्तर भारतात मात्र चाफा, कण्हेर ही फुले देवपूजेला वर्ज्य आहेत. वाराणसीत एका पुरोहिताने “क्षिरोद पुष्प देवता को कैसे चढ़ा रहें हैं मान्यवर?” असे कड़क आवाजात हटकले होते तेव्हा समजले
देठातून दुधासारखा चीक निघतो म्हणून नको म्हणे !
तुमचे चांदीचे टाक किमान ६०-७० वर्ष जुने असतील असा माझा क़यास. नवीन सहसा कुणी घडवत नाहीत.
पूर्वी खूप कुटुंबे कामकाज/ दुष्काळ / विपत्ती किंवा अन्य कारणाने दूरदेशी migrate होत. वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक कुलस्मृती नष्ट होवू नये म्हणून हे टाक घडवले जात आणि जिवापाड जपले-सांभाळले जात असत. माझ्याघरी तीन आहेत.
… सासवांचे बाळकृष्ण दणदणीत मोठे, तर सुनांचे लहान नाजूक… what an astute observation ! पितळी मूर्ती- भांडी आता खरेच तशी दणदणीत मिळत नाहीत.
@ अल्पना,
@ अल्पना,
गणपती + क्रॉसवरचा जिझस माझ्या एका मैत्रिणीकडेही आहे. एकांकडे लेनिनच्या मूर्तीला दुर्गेसोबत देव्हाऱ्यात ठेवून कुंकू- फुले वाहिलेली बघितली आहेत. टोकाचे नास्तिक लोक देवपूजेला लागलेले आणि याच्या उलटे झालेले अशी दोन्ही उदाहरणे बघण्यात आहेत. World is far more strange than we think
@ मनिम्याऊ
.. आजी नास्तिक तर आजोबा आस्तिक…
हे कॉंबो फार छान. स्त्रिया कर्मकांडात जास्त रमतात या लोकप्रिय perception ला छेद देणारे
@ Nidhii
… देवांसोबत सचिन तेंडुलकरचा फोटोही…
धमाल. God of Cricket has good company for sure
@ अमितव,
… तुमच्या घरचं देवघर आवडलं…. थँक्यू. योग्य कानावर घालतो तुमचे कॉम्प्लिमेंट.
अनिंद्य, छान लेख आणि
अनिंद्य, छान लेख आणि सर्वांच्या आठवणीही सुंदर.
माझे आईवडील प्रचंड देव देव करणारे होते त्यामुळे घर बांधलं तेव्हा त्यांनी त्यात एक देवघर पण बांधलं अगदी कळसासकट.
परिस्थिती कायम ओढधस्तीचीच असायची.. कुणीतरी सांगितलं त्यांना की घरात कळस बांधल्यामुळे इतक्या अडचणी संकट येतात. मग देवघरावरचा कळस काढून तिथे कमळ तयार केलं अन त्यात गजानन महाराजांची मूर्ती बसवली.
सासरी सासू /सासरे जेमतेम पूजा करायचे (उरकायचे ). आता मी कधीतरी करते.
छान आहे लेख आणि सगळे प्रतिसाद
छान आहे लेख आणि सगळे प्रतिसाद ही.
देव पूजा म्हटलं की मला आईची आईच आठवते. आमच्या कडे एका कोनाड्यातच देव ठेवलेले असत कारण आईचा काही फार विश्वास होतं असा वाटत नाहीये. पण आजी खूप देव देव करणारी होती. जिथे जाईल तिथे तिचे देव बरोबर असत. त्यात पितळ्याच राम पंचायतन आणि विठ्ठल रखुमाई च्या उभ्या मूर्ती होत्या. ती तरुणपणीच सोवळी झाली होती आणि जीवनातल्या छोटयातला छोट्या गोष्टीचा आनंद घेण्याची ही तिला परवानगी नव्हती. तेव्हा कळत नव्हतं पण आता ह्याच खूप वाईट वाटत. पहाटे उठून गार पाण्याने अंघोळ करून तिची पूजेला सुरवात होई. रोज गंध उगाळणे, फुलं गोळा करणे, एवढे देव नीट धुवून पुसून ठेवणे हे करताना ती अखंड हळू आवाजात श्लोक , स्त्रोत्र म्हणत असे, अर्धवट झोपेत ही ते तेव्हा ही फार आवडत असे. दुपारी देवदर्शन, पुराण, सप्ता ऐकणे, ह्यात वेळ जाई तिचा. कोणाला फार त्रास न देता किंवा फार खर्चात न टाकता देव देव करणे हाच तिचा विरंगुळा होता पण त्यानेच तिचं आयुष्य निभावून नेलं असं मला वाटतं.
सासरी ही लोकं फार देवभोळे नाहीयेत पण तरी कोकणातल्या घरात एक स्वतंत्र देवघर आहे. त्यात अडीच तीन फूट रुंद आणि सहा इंच उंचीचा एक ओटा आहे त्यावर दीडशे वर्षा पूर्वीचा शिसवी देव्हारा आहे त्यात कुटुंबाचे देव आहेत. त्यात नेहमीचे देव तर आहेतच पण छत्र चामर असणारी चांदीची देवीची उभी मूर्ती ही आहे. देवापुढे रोज रांगोळी काढली जाते. रोज घरची फुलं भरपूर असतात. सोवळ्याने रोज साग्र संगीत पूजा होते, पूजा झाली की नमस्कार करताना फार आश्वासक वाटत वाटत. आमच्या कडे पूजा मात्र सकाळी लवकर होत नाही. साडे अकरा बाराच्या सुमारासच होतें. पुजा झाली की जेवणाचा नैवैद्य दाखवता येतो पुन्हा सोवळ नेसावं लागत नाही. गणपती, नवरात्र वगैरे ही साजरे होतातच कोकणात.
आमच्या कडची एक कुठे न पाहिलेली पद्धत म्हणजे घरातली स्त्री स्वर्गवासी झाली की दहनाच्या वेळी तिच्या बरोबर तिची अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण ही दिले जातात. ह्याचा एक फायदा असा की मूर्तींची संख्या फार वाढलेली नाही. एका चांदीच्या मोठया तबकात नीट बसतील एवढेच देव राहतात.
शंभर टक्के आस्तिक किंवा शंभर टक्के नास्तिक अस कोणीच नसतं असं मला वाटत. प्रत्येक जणं ह्याच कॉम्बो असत. ठाण्याला रोजची पूजा मीच करते. देव आणि देवाची फळी कायम स्वच्छ असावी ह्या कडे माझा कटाक्ष असतो. पूजा करून निरांजन लावल की मला बरं ही वाटतच. पण निरांजन तेवत असताना मी कधी ही कुलूप लावून जात नाही. जायचं असेल तर भांड उपड घालून निरांजन शांत करते आणि मगच जाते. निरांजन झालं तरी आगीची भीती वाटते मला. असो.
महेश्र्वरला राणी अहिल्या देवींच देवघर दाखवतात. ते फार आवडलं होत.
… महेश्र्वरला राणी अहिल्या
… महेश्र्वरला राणी अहिल्या देवींच देवघर दाखवतात…
लेखात लिहिणार होतो, महेश्वर आणि राघोगढ किल्ल्यातल्या देवघरांबद्दल.
आग लागण्याची भीती +१
@ स्मिता श्रीपाद
@ स्मिता श्रीपाद
… लिखाण करताना हे गाळलं असतं तर चाललं असतं असं वाटतंय…
तसे नाही केले कारण those childhood incidences shaped my views as an adult. टोकाच्या भूमिका असतांनाही कोणताही क्लेश, विवाद आणि विसंवाद न होता आनंदी घर कसे राखावे याचा वस्तुपाठ आईबाबांनी घालून दिला. उपदेशाच्या शब्दविना. आम्ही भावंडे याबाबतीत मध्यममार्गी झालो. न अती देवदेव करणारे ना अश्रध्द. Best of both worlds ❤️
अनिंद्य,छान लेख आहे आणि
अनिंद्य,छान लेख आहे आणि प्रतिसादही .
माझ्या देवघराच्या आठवणी म्हणजे मन बालपणात जातं गावाला, आजी आजोबा माळकरी ,मातीच्या घरात दिवळीत ठेवलेला सुंदर नाजूक देव्हारा त्यात असणारे जुने टाक मोजक्या मुर्त्या आणि भिंतीवर लावलेले काही फोटो त्याखाली बसलेले दोघे आजी आणि आजोबा . पूजा करताना बघायची वेळ यायची नाही कारण जाग "आरती ज्ञानराजा" विशिष्ट लयीत बोललेल्या बापूंच्या आवाजाने आणि आजीच्या हातातल्या घंटीच्या आवाजाने व्हायची दोन खोल्यांचं घर त्यात बाहेरच्या खोलीत देव्हारा बाजुलाच आम्ही लहानगे झोपलेलो डायरेक्ट उठून मी आजीच्या मांडीवर आरतीत गुंग व्हायची ओवळे सोवळे फार नसायचे आजीही हात जोडा विठ्ठल विठ्ठल करा म्हणायची खरंतर यीठाल यिठाल
मग आरती संपली की आम्ही तोंड धुवायला पळायचो. देव आठवत नाहीत पण देवापुढंच निरंजन आणि त्याच्या प्रकाशात कपाळावर कुंकवासोबत भस्म ओढलेली सुंदर आजी पार्वती सारखीच भासायची.आजोळचे देवघर आठवत नाही आजीआजोबा(आईचे आईवडील) लवकरच म्हणजे मी खूपच लहान असताना गेले पण तेही देवभोळे असावेत आईवरून वाटतं कारण आजोबांचं नावही मारुती होतं .
इथे शहरात देवघर म्हणजे आमच्या घरात एक सुबक नक्षीदार लाकडी स्टँड होत ज्याला ओपन असा कप्पा होता त्यावर देव आई सगळं आवरून पूजा करायची. ती करताना आई खूप प्रसन्न वाटायची आणि घरही प्रसन्न वाटायचं.घरात फार धार्मिक वातावरण नव्हतं वडील नास्तिक नव्हते पण त्यांना पूजा करताना कधीच पाहिलं नाही पायाही पडताना सणासुदीला किंवा एखाद्या विशिष्ट दिवशीच पाहिलं रोज नाही .त्यांचा कर्मावर विश्वास मंदिराच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा मनात देवाचा भाव ठेवून चार कामं केली तरी तितकंच पुण्य भेटतं या विचारांचे. आई मात्र याला नवस करू का त्याला इतकी देवभोळी, पप्पांचा नवसाला विरोध म्हणायचे हे म्हणजे देवाला वेठीला धरल्यासारखे होते आणि तो फेडायलाही जावं लागतं असं असल्यामुळे आई घरच्या देवालाच नैवैद्य दाखवेन असे नवस बोलायची.मी मात्र देवभोळी नसले तरी आस्तिक आहे लहानपणी संस्कारांचा भाग म्हणून किंवा आईला पाहून देवांशी ओळख झाली .पुढे मोठं झाल्यावर शिंग फुटली हे का ते असं का या प्रश्नांची आई बाबा वेगवेगळी उत्तरं द्यायचे आई तिच्या देवभोळ्या दृष्टिकोनाने वडील वैज्ञानिक दृष्टिकोनाने मग पुढे जाऊन मी नास्तिक होते की काय असं वडिलांना वाटले होते थोडीफार त्याच वाटेने जात होते पण ते फक्त अंधश्रद्धेपुरतं राहिलं. आईने नास्तिक बनू दिलं नाही आणि पुढे आयुष्यात घटनाही अशा घडल्या की देवावर विश्वास ठेवावासा वाटला.तसाही बाप्पा लहानपणीपासून आवडायचाच.
कित्येक वर्षे देव्हारा घ्यायचा म्हणून आई मागे लागलेली इथे घेतलाही पण तो साधा लाकडाचा पण जेव्हा गावाला नवीन सेकंड होम घेतलं तेव्हा त्यातल्या पूजेसाठी मात्र हौसेने सागवानी लाकडी देव्हारा घेतला .
हा तो देव्हारा मोजकेच पाच देव ठेवायचे आणि पंचायतन पद्धतीने मांडून रोज शोडोपचार नसली तरी जमेल तशी किंवा पंचोपचार पूजा करायची असं ठरलं त्याप्रमाणे गणपती लक्ष्मी फुलांमागे लपलेला बाळ कृष्ण आणि अन्नपूर्णा समर्थांचा फोटो असे विराजमान झाले कुलदैवत असणाऱ्या शंकराचा फोटो ठेवावा की पिंड हे डीसाइड न झाल्यामुळे तो नाहीये पण पिंड आणायची असं ठरलं. या देवांची पूजा मीच केलीय नैवेद्याचे मोदक
आणि रांगोळीही . गावाला रोज नचूकता पूजा करण्याचा मानस आहे इथे रोज साग्रसंगीत पूजा करायला वेळ मिळत नाही पण कमीत कमी देवघर पुसून दिवा लावला जातो धुळीने माखलेलं देवघर मला आवडत नाही. सणासुदीला पूजा होतेच पण गणेश चतुर्थी आणि माघी जयंतीला स्पेशल पूजा असते जशी आज आहे.
मोबाईल देव घेऊन फिरणार्यापैकी मीही एक आहे हा माझ्याबरोबर ट्रॅव्हल करणारा बाप्पा
हा मी आठवीत असताना शाळेच्या ट्रिप ला पॉकेटमनीतून घेतलेला छोटुस्सा गणपती बाप्पा . फुलांच्या आणि त्याच्या आकारावरून कळतच असेल साईज .हा कायम जवळ असतो जिथे मी जाते तिथे आणि पर्समध्ये सिद्धिविनायका चा फोटो. ये जवानी है दिवानी मधला दीपिकाचा सीन ढापलाय खरंतर ,पिक्चर येण्याच्या कितीतरी वर्ष आधीपासून मी बाप्पाला घेऊन फिरतेय.
देव असतो की नाही याप्रश्नाचं उत्तर मी शोधायचे आता शोधत बसत नाही कारण एकमात्र खरंय अशी कोणतीतरी शक्ती आहे जी माणसाला प्रत्येक अडचणीतून दुःखातून मार्ग काढण्यासाठी मदत करते. तसही बाप्पा बुद्धीची देवता आपल्याला चांगले वागण्याची बुद्धी देतो यावर माझा ठाम विश्वास आहे.
सर्वांना माघी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.
मोबाईल देव घेऊन
मोबाईल देव घेऊन फिरणाऱ्यांपैकी एक
सुंदर आठवणी सिमरन !
सुंदर आठवणी सिमरन !..........
सुंदर आठवणी सिमरन !..........+१.
लेख व प्रतिसाद दोन्ही आवडले.
लेख व प्रतिसाद दोन्ही आवडले.
धन्यवाद अनिंद्य देवकी.
धन्यवाद अनिंद्य देवकी.
गुडलक म्हणा किंवा देवावरचा विश्वास जसं पूर्वी बिल्डींगची नावं नद्या देवांची ठेवायचे तसेच आता ऍप्स, प्रकल्पाची नावं देवांची किंवा धार्मिक ठेवली जातायत.
मजा म्हणजे मी घरात सिक्युरिटी सिस्टिम घेतली तेव्हा माझ्या मुलाने त्या हब, कॅमेरा, सेन्सर्सची त्या अॅपमधली नावं 'अंबिका, गणपती, मारुती' वगैरे ठेवली. आमचे हे देव खरोखरीच आमचं संरक्षण करतात! Lol>>>>
Pages