मी त्याला नेहमी पाहायचे, पण लक्ष द्यायचं नाही ठरवलं होतं. माझं आयुष्य वेगळं होतं, माझे स्वप्न वेगळे होते. साधीशी मी, काळीसावळी, पण स्वाभिमान माझ्या मनात होता. घरची परिस्थिती हलाखीची होती, बाप दारू पिऊन मरून पडलेला, आई आणि लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर होती. कॉलेजला सायकलने जाणं, वर्गात शिकणं, आणि घरी आल्यावर आईला मदत करणं – हेच माझं रोजचं जगणं.
पण त्या वर्गात तो होता. त्याचं आणि माझं काहीच कधी जुळलं नव्हतं. वर्गातल्या इतर मुलांसारखा तोही माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा. सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण मग त्याच्या बोलण्याची मर्यादा ओलांडली जाऊ लागली.
एक दिवस घरात आईसमोर रडत रडत सांगितलं की, “माझ्या मागे लागतोय तो.” माझ्या मनात विश्वास होता की बाबा माझं रक्षण करतील, त्याला थांबवतील. पण बाबांनी मला कॉलेज सोडायला लावलं. मला वाटलं होतं की मी शिक्षण पूर्ण करीन, नोकरीला लागीन, घराची जबाबदारी उचलू शकेन. पण एका अनोळखी मुलाशी लग्न लावून दिलं गेलं.
आता माझं आयुष्य एका झोपडीत बंदिस्त झालंय. नवरा गॅरेजमध्ये काम करतो, पण घरी येऊन दारूच्या नशेत मला मारतो. त्याच्या हातात लोखंडी पाइप असतो; मला वाटतं तो कधीतरी माझा जीव घेईल. मुलीसाठी सगळं सहन करत आहे, पण माझं मन आतून तुटलं आहे. माझ्या स्वप्नांसोबत माझ्या आत्म्याही मेलाय.
रोज तो रस्त्यावरून जातो. त्याची अंगावर सोनेरी दागिने मिरवणारी त्याची बायको माझ्या डोळ्यांसमोर असते. आमचं आयुष्य किती वेगळं आहे, पण माझ्या मनात एकच प्रश्न आहे – माझी काय चूक होती?
मी त्याच्याकडे पाहते, आणि त्याला प्रश्न विचारते, माझं आयुष्य असं का झालं? मी काय चुकीचं केलं होतं? माझ्या या प्रश्नांना कधीच उत्तर मिळणार नाही, आणि मी आयुष्यभर हेच प्रश्न विचारत राहणार.
चूक - २
Submitted by अमरेंद्र बाहुबली on 20 January, 2025 - 12:41
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
या दुसर्या
या दुसर्या पर्स्पेक्टिव्हमध्ये वेगळे काहीच गवसले नाही. त्यामुळे हा भाग मला अनावश्यक वाटला.
दारू पिऊन पडलेला बाप रक्षण
दारू पिऊन पडलेला बाप रक्षण करणार होता?