विषयाला प्रस्तावना देण्याआधी व स्वतःचे किस्से सांगण्याआधी एका मित्राच्या किस्स्यावरुन सुरुवात करतो.
माझा एक कॉलेजचा मित्र आहे. त्याची स्वतःची पेंट बनवायची कंपनी आहे. त्याशिवाय ईतरही अनेक ऊद्योग आहेत. याचे महिन्याचे उत्पन्न तीन ते चार लाखाच्या घरात अगदी सहज असेल. हा मित्र स्वभावाने अतिशय चांगला व नम्र आहे. कंपनीत सर्वांसोबत मिळून काम करतो. ऑफिसमधे बसून फक्त ऑर्डर्स न सोडता स्वतः शॉप फ्लोअरवर काम पण करतो. तर असाच एके दिवशी कंपनीत काम करत असताना एका व्यक्तीला काही डॉक्यूमेंट्स द्यायची होती म्हणून घाईघाईत काम करत होता त्याच कपड्यांमधे कंपनीतून निघाला. त्या व्यक्तीला डॉक्यूमेंटस देऊन येताना एके ठिकाणी वडापाव खायला थांबला. दोन वडापाव घेतले आणि मग बाजूला येऊन खात उभा राहीला. थोड्यावेळाने त्या हातगाडीचा मालक जवळ आला आणि याला एक एक्स्ट्रा पाव द्यायला लागला. याला पाव नको होता म्हणून याने नकार दिला तर तो लगेच समोरून म्हणाला " घे रे पैसे नाही घेणार" याला कळलेच नाही की हा असे का म्हणत आहे. मग त्या मालकाने सहज पुढचा प्रश्न केला " कुठे काम चालू आहे?" या प्रश्नावर माझ्या मित्राची ट्यूब पेटली तो मालक त्याच्या कपड्यांवरून त्याला पेंटर समजला होता. माझ्या मित्राने हसत हसत त्याचा गैर समज दूर केला आणि त्याला सगळं सांगितलं.
माझ्या मित्राने हा किस्सा मला सांगितला तेव्हा मी फार हसलो आणि हळहळलो. माझ्या मित्राने असा फुल्टॉस आलेला बॉल सोडला होता. माझ्या साठी असे प्रसंग म्हणजे माझ्या आयुष्यातले सोनेरी क्षण आहेत. माझ्यावर असे प्रसंग आले तेव्हा मी या प्रसंगांचे सोने केले आहे.
विनोद सगळ्यांनाच आवडतात. प्रासंगिक विनोद, शाब्दिक कोट्या, अश्लिल विनोद, टॉयलेट ह्युमर, रोस्ट कॉमेडी, प्रँक्स असे विनोदाचे उपप्रकार करता येतील का? प्रत्येकाला एखादा उपप्रकार असतो जो जास्त रुचतो असे मला वाटते. मला सगळ्यात जास्त आवडणारा प्रकार म्हणजे pranks. बाकी विनोदांवर मी ते ऐकतो, हसतो, एंजॉय करतो व बर्याचदा विसरून जातो. पण मला वर्षानुवर्ष जे जोक्स लक्षात राहतात नी जे मी व माझे मित्र आठवून आठवून हसतो ते म्हणजे मी केलेले प्रँक्स....
टिनेज मधे आपल्याला काय आवडेल आणि आपण कशाने ईप्रेस होऊ याचा काही भरवसा नसतो. माझी दहावी झाल्यावर आमच्या घरी केबल आली. आणि त्यासोबत आले भरपुर असे चॅनल्स, त्यातलाच एक चॅनल एम टिव्ही आणि त्यावर यायचा तो शो एम टिव्ही बकरा. माझ्या आयुष्यात मी असले काही पहिल्यांदाच पहिले होते, आणि खळखळून हसलो होतो. मी तो शो आणि त्याचे रिपिट टेलिकास्ट जमेल तितक्या वेळा बघायचो. ते ईतक्या वेळा बघून बघून तसेच काही करायची फार ईच्छा व्हायची. पण त्यावेळेस फार डोके चालायचे नाही आणि थोडेफार झाले की मला किंवा कोणालातरी हसू फुटायचे.
पण ते म्हणतात की अगर कोई चिझ आप शिद्द्तचे चाहो वगैरे वगैरे तसे माझे झाले. हळूहळू माझा आवाजावर व हसण्यावर बराच ताबा आला. त्यानंतर मी प्रचंड मजा केली. नंतर नंतर मला लक्षात आले की ठरवून प्रँक न करता एखादा प्रसंग समोर आला की त्यातून पुढे ते exploit करत त्यातून पुढे जे प्रँक्स करता येतात ते फार मजेदार होतात, वर्षानुवर्ष त्यावर हसता येते.
तर हे सगळे माझे किस्से....
१. हा माझा व माझ्या मित्रांचा सगळ्यात आवडता.....
मी व माझे मित्र एकदा माझ्या नविन गाडीतून शिर्डीला गेलो होतो. मी कामावरून सरळ आलो आणि आम्ही लगेच निघालो. पूर्ण रस्ता गाडी मीच चालवली, शिवाय परत जाताना पण मलाच चालवायची होती. त्यामुळे नाष्टा करून आल्यावर मी मित्रांना म्हणालो "तुम्ही दर्शन घेऊन या. मी जरा गाडीत झोपतो." मी गाडीचे सिट वगैरे अॅडजस्ट करुन झोपायच्या तयारीतच होतो तेवढ्यात एक जण समोरून आला आणि म्हणाला "पुडी हाय का?" मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही म्हणालो. त्याने लगेच पुढचा प्रश्न केला " काय साहेब लोक दर्शनाला गेल्यात का?" त्याक्षणी माझी ट्यूब पेटली की हा मला ड्रायव्हर समजत आहे. मी हो ना म्हणत पटकन दरवाजा उघडून बाहेर आलो. झोप गेली उडत, हे जास्त महत्वाचे होते. तो माणूस मुंबईवरुन आला होता. श्रीमंत घरात ड्रायव्हर होता. त्याला त्यावेळेस चांगला १२ कि १३ हजार पगार होता. मी ट्रेनी म्हणून काम करत होतो आणि एवढे शिकून मला पण तेवढाच होता :हाहा:. मग त्याने मला विचारलं कि तू काय करतोस. मी त्याला म्हणालो की मी एका सुमोवर कामाला जातो. मग मला घरच्या कशा जबाबदार्या आहेत, ट्रिप नसतील, सिझन नसेल तर काम मिळत नाही, मालक कसा हरामी आहे, वेळेत पैसे देत नाही, ते पुरत नाहीत म्हणून मग मी अशा बदली ट्रिप्स मारुन पैसे काढायला बघतो वगैरे माझी दुखभरी कहाणी त्याला सांगितली. त्यानंतर कुठे चांगला जॉब मिळेल, अशा श्रीमंत लोकांच्या घरी काम करताना कसे वागायचे, काय काळजी घ्यायची वगैरे विचारत बसलो. मी त्या माणसाशी जवळ जवळ तीन तास ड्रायव्हर म्हणून गप्पा मारत होतो...
आणि अचानक माझा मोबाईल वाजला.. मी झोप्लो असेन म्हणून मित्रांनी दर्शन घेऊन, थोडावेळ टाईमपास करून फोन केला होता. मी पटकन फोन उचलून "हो सर बोला ना" असे म्हणून कुठे आहेत विचारून मी पटकन झपझप चालत मोबाईलचा विषय निघू न देता गाडीत बसून स्टार्टर मारला.
२. मी व माझा मित्र कम बिझनेस पार्टनर एका नविन शाखेसाठी भांडी घ्यायला मंडईतल्या नेहमीच्या दुकानात गेलो होतो. या दुकानातले सगळे कामगार आम्हाला चेहर्याने ओळखतात व आम्ही त्यांना नावाने. माझा मित्र आत काही तरी घेत होता व मी पाय दुखत आहेत म्हणून दुकानाच्या बाहेर एका स्टूल वर टेकलो होतो. तेवढ्यात समोरुन एक मध्यमवयीन कपल, लोअर मिडलक्लास कपल आलं नी मला विचारलं "तुमच्या कडे कढई आहे का? " मी लगेच तत्परतेने पुढे झालो नी म्हणलो हो आहे ना. मग त्यांना विचारलं की "तुम्हाला किती नंबरची कढई हवी आहे नी कशाला हवी आहे?" त्यांना बटाटेवडे तळायला कढई हवी होती. त्यांना कढईचा साईझ सांगता येईना, मला म्हणाले की तुम्ही कढई दाखवा मग आम्ही सांगतो. त्यांना आहे ती कढई कमी पडत होती, म्हणून ते नविन पहायला आले होते. मग मी त्यांना तुम्ही तासाला किती वडे सोडता वगैरे विचारुन घेतलं. त्यांना कढईचा साईज वाढला की तेल कसे वाढते, मग कोणत्या कढईत किती वडे निघतात हे सगळे समजावले. मग मी हिशोब करुन दुकानात आवाज दिला " निरंजन यांना २६ नंबरची कढई दाखव" त्या निरंजनला पण दोन मिनिटे कळले नाही की एवढ्या अधिकारवाणीने त्याला कोणी ऑर्डर सोडली. आणि मग मी अगदी नम्रपणे वाकून त्या काका काकूंना आत जायची खूण केली, नी लगेच मित्राला त्याच दुकानात सोडून तिथून पसार झालो.
३. मी मधे मुंबईच्या क्राईम वर्ल्डवरची बरीच पुस्तके वाचली होती. त्याच दरम्यान गावातल्या मित्रांसोबत कोकणात ट्रिपला गेलो होतो व एका होम स्टेमधे थांबलो होतो. जायच्या जस्ट काही दिवस आधीच 'डोंगरी ते दुबई" वाचून झाले होते. तिथे पिऊन गप्पा मारता मारता कसे काय माहित नाही गुन्हेगारी जगताचा विषय निघाला की मी बळेच स्वतःकडे असलेली माहिती शो ऑफ करायला तो तिकडे वळवला. मी आणि माझा एक मित्र त्यावर बराच वेळ बोलत होतो. बाकी जण अधून मधून कमेंटस टाकत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथला मालक आला सहज गप्पा मारत बसला. मारता मारता त्याने हळूच विचारले “तुम्ही सगळे क्राईम ब्रांचला आहात का?” मी फटकन सांगितले “सगळे नाही.” मग एका मित्राकडे बोट दाखवलं नी म्हणलं “ फक्त तो आणि मी”. दुसऱ्या एकाकडे बोट दाखवलं नी म्हणलं तो ब्लॅक कॅट कमांडो आहे( हा खरेच होता), दुसऱ्याकडे बोट दाखवून म्हणालो की तो मिलिटरी मधे आहे (हा मिलिटरी मधे आहे पण ॲाफिस स्टाफ आहे). अजून बाकी असेच ईतर डिपार्टमेंट सांगितले….. मग त्यांना मी त्या पुस्तकांमधून मिळालेली वेग वेगळ्या गँग्स, त्याचे एक्मेकांशी संबंध, कोणाचे वैर कोणाशी कसे तयार झाले ही आणि अशी अनेक माहिती सांगितली. नंतर तो मालक गेल्यावर आधी सगळ्यांना गोळा केलं आणि जे झाले ते सांगितले. सगळ्यांना सांगितलं की आता दोन दिवस कॅरेक्टर मधे रहा. बेअरिंग सोडू नका. दोन दिवस आम्हाला अतिशय चांगली सर्व्हिस मिळाली. आजही आमच्या अनेक ट्रिप्स ला या किश्श्याची आठवण निघते.
मायबोलीकरांना पण मी याचा प्रसाद दोन वेळा दिला आहे. २०२३ च्या वविला हर्पेनदा व योकुला टि शर्ट्स साठी. त्याचा किस्सा हर्पेनदाने त्या वविच्या धाग्यावर लिहिलाच आहे. हा त्याच्याच शब्दात.... "मी माझ्या स्टॉप वर पोचलो तेव्हा योकु त्याच्या लेकाला घेऊन आधीच हजर होता. मागोमाग अतरंगी सकुसप आलाच. त्याचे येणे माझ्याकरता अगदी महत्वाचे होते. संयोजक म्हणून नव्हे तो तर योकु आलाच होता. पण माझा आणि योकुचाही माबो टी शर्ट त्याच्याकडे होता. मला खात्री होती की तो टी शर्ट आणेलच पण योकुला नव्हती त्यामुळे त्याने लगेच्च विचारले तू आलास ठीक आहे पण टी-शर्ट आणलेस का अर्थातच लगेच हो म्हणून सांगीतले तर तो अतरंगी कसा! त्याने साभिनय, अर्रे आणायचे म्हणून वर काढून ठेवले आणि नेमके विसरलो बघ असे सांगीतले. मला खरे वाटले यात नवल नाही पण योकुलाही ते खरे वाटले. त्यामुळे याठिकाणी अभिनयाचा सर्वोच्च पुरस्कार त्याला देण्यात यावा म्हणून मी शिफारस करत आहे. (टंकताना शिफारसचा तीन वेळा शिफार्स झाला. काव्यगत न्याय म्हणतात तो हाच काय) तितक्यात लगेचच गाडी आल्याने अतरंगीला जास्त वेळ अभिनय करता आला नाही. "
२०२४च्या वविला सगळ्यांना पूल मधे खेळायला बॉल हवा होता तेव्हा मी सगळ्यांना सांगत होतो कि बॉल अमॅझॉन वरुन ऑर्डर केला आहे. डिलीव्हरी टाईम १२.३० दाखवत आहे. अनेकांना ते खरे वाटले. पण रिनाला पण तेच उत्तर दिले तेव्हा कविन तिच्या शेजारी उभी होती, मी उत्तर दिल्यावर ती माझ्याकडे रोखत बघून म्हणाली "नाही गं चेष्टा करतोय हा" आधीच्या वविमुळे तिला कळले असावे की मी किती आगाऊ आहे ते.
अजूनही मी माझ्या दैनंदिन आयुष्यात असे अनेक प्रँक्स करत असतो. बायको व मुले तर हक्काचे बकरे आहेत. लग्नाला १४ वर्षे झाली पण अजूनही काही काही वेळेस बायकोला फसविण्यात यश येते व एक वेगळाच असुरी आनंद मिळतो....
अजून एक दोन किस्से आहेत ते ऊद्या परवा वेळ मिळाल्यास टंकतो...
भारी किस्से
भारी किस्से
अतरंगी पासून सावध राहावे लागणार
प्रत्यक्ष भेटीत अतिशय शांत असणारा मनुक्ष इतका डांबिसगिरी करू शकतो हे इतर कोणी सांगितले असते तर पटले नसते
किल्लीच्या बोटीत मी देखील.
कंडक्टर अर्र बिचारा तुमचा
कंडक्टर
अर्र बिचारा तुमचा मित्र.
मेसीज मध्ये एलिझाबेथ आर्डेन,
मेसीज मध्ये एलिझाबेथ आर्डेन, क्लिनिक, एस्टी लॉडर वगैरे बरेच सेक्शन्स आहेत. तिथे परवा विशेष कोणी सेल्स्गर्ल्स नव्हत्या. मी एक 'टेस्टर' फेस सिरम लावत होते आरशासमोर तर मागे एक जोडपं माझी वाट पहात थांबले होते. त्यांना वाटले मी तिथली सेल्स गर्ल आहे. म्हटलं "मी इथे काम करत नाही."
त्यावर ती बाई म्हणाली 'यु लुक्ड सो कम्फर्टेबल."
अर्रे यार फ्री 'टेस्टर' क्रीम लावत होते. चोरी करत नव्हते. त्यात 'कंफर्टेबल' काय कंफर्टेबल.
-
एस्टी लॉडरएलिझाबेथ आर्डेन ची लाल डब्यातली 'रेड डोअर डस्टिंग पावडर' - काय डिव्हाईन , स्वर्गिय सुगंध आहे. ओह माय गॉड! मला जॉब मिळाल्यानंतर पहील्या पगारातून ती पावडर घेणार आहे.तुम्ही युट्यूबवर प्रँकचा चॅनल
तुम्ही युट्यूबवर प्रँकचा चॅनल सुरू करा.>>>>
कढईचा नंबर कसा सांगितला ? चुट्पुट लागली ना.>>>
मला ते सगळे माझ्या मित्रासोबत फिरून फिरून माहीत झाले आहे.
धन्यवाद टिप्स साठी पण घरातल्या लोकांसाठी चेहरा निर्विकार एवढंच पुरेसं पडेल? थोडंसं इमोशनल व्हायला लागेल.>>>
इमोशनल अॅक्टिंग करायला जमत असेल तर मस्तच... नाहीतर चेहरा कोरा ठेऊन प्रयत्न करा नाहीतर सुरुवातीला फक्त फोन वर प्रँक्स करायला सुरुवात करा. यावरुन माझा एक आवडता प्रँक आठवला पुढच्या पोस्ट मधे टाकतो.
कोणीतरी तुझ्या वर प्रॅंक केली म्हणजे नहले पे देहला झालं की >>>
माझ्यावर पण अनेक प्रँक झाले आहेत. एवढ्या सगळ्यांना मी छळलं आहे, ते कधी ना कधी वचपा काढतातच. पण मी जो वर लिहिला आहे तो मी फार एंजॉय केला:हाहा:
फा, वावे, योगी
'गजानन डबलघोडा काढ'....
किल्ली, प्रयत्न करुन पहा. जमेलच.
झकासराव, मी खरेच फार शांत आणि स्वभावाने गरीब आहे हो....
तर ही गोष्ट आहे जेव्हा
तर ही गोष्ट आहे जेव्हा अनेकांकडे मोबाईल आले होते. पण फार कॉमन झाले नव्हते. बटन वाले मोबाईल फोन असण्याचा काळ. मोबाईल स्मार्ट व्हायचे होते...
हा प्रँकचा प्रकार मी कुठेतरी वाचला होता. बहुतेक माबोवरच.
तर आम्ही काही टाळकी विकांताला ट्रिपला निघालो होतो. त्यात एक मित्र नव्हता. तो जॉबसाठी दुसर्या राज्यात होता. आपण त्याला राज म्हणू या. तर आम्ही रस्त्यात जिथे जिथे गाव दिसेल तिथून STD बूथ वरुन त्याच्या मोबाईल वर कॉल करत होतो आणि विचारत होतो की " केदार ऑटो का?" तो प्रत्येक वेळेस नम्रपणे राँग नंबर म्हणून कॉल कट करत होता. सगळे फोन लँडलाईन वरुन नको म्हणून माझ्या चुलत बहिण आत्तेभावाला पण एक एक कॉल करायला सांगितला. मग संध्याकाळी त्याला मी नविन सिम वरुन कॉल केला आणि विचारलं की
"मी केदार ऑटो मधून बोलतोय. माझ्यासाठी काही कॉल आले होते का?"
माझा मित्र थोडासा वैतागून "अहो काय तुमचे सकाळपासून किती कॉल...."
मी त्याला उचकवायला डायरेक्ट अरे तुरे वर " अरे हो ने, आमची आज पेपर मधे अॅड दिली होती त्यात कसं काय माहित चु़कून तुझा नंबर छापला"
"बरं बरं ठिक आहे" आवाजात थोडासा वैताग.
" कोणाकोणाचे फोन आले होते सांगतोस का?"
"अहो मी कशाला ते लक्षात ठेऊ"
" अरे मित्रा चिडू नको, काये आपला गाड्यांचा बिझनेसए ना. ते सगळे कष्ट्मरचे कॉल असतील, दे ना जरा, मी वाटल्यात परत कॉल करतो."
"नाही हो मला आत्ता वेळ नाही."
" अरे यार बास का? जास्त वेळ नाही लागणार. मी परत फोन करतो. जरा तेवढे दे नक्की."
एवढं बोले पर्यंत मी हसून फुटायचा बाकी होतो. मला त्याला अजून पिळायचं होतं पण हसणं आवरत नव्हतं. त्याला ना माझा आवाज ओळखू आला ना ही शंका आली की या माणसाचा आणि माझा नंबर टोटली वेगळा असताना असा कसा कोण छापेल.
मी परत थोड्या वेळाने त्याला कॉल केल्यावर त्याने दोन तीन नंबर सांगितले. मी तो कॉल कट करताना परत सांगितलं की यार ऊद्या वगैरे कॉल आले तर जरा नंबर लिहून ठेव मी कॉल करेन. आम्ही हा प्रँक ईथेच बास करणार होतो आणि त्याला परत फोन करुन सांगणार होतो की आम्हीच तुला त्रास देत होतो. पण काही कारणाने राहिलं.
दुसर्या दिवशी आम्हाला परत त्याला पिळायची हुक्की आली.
परत दोन चार बुथ्स वरून त्याला कॉल केले. मग दोन चार तासांनी मी परत कॉल केला. आवाजात सुरुवातीपासूनच जरा अधिकार गाजवत.
" हां केदार ऑटो मधून बोलतोय. कोणाचे कॉल आले होते का?"
" एक दोन आले होते."
" हं, पटकन नंबर सांग"
"नंबर?"
"अरे तुला काल म्हणालो होतो ना नंबर लिहून ठेव."
" अहो मला काय तेच काम आहे का?" मी एवढा चिडवून हा बिचारा मात्र अगदी शांत.
" अरे काय आज असाही रविवार आहे! काय काम असणार तुला. निदान माझं तरी काम करायचं ना!"
आता मात्र त्याचा पेशन्स संपला.
"अहो तुम्हाला मी काय रिकामा बसलेलो वाटलो का? मी एका मल्टी नॅशनल कंपनी मधे डेप्युटी मॅनेजर आहे. ते सगळं सोडून तुमचे हे निरोप घेत बसू का? तुम्हाला तुमची अॅड बघून छापता येत नव्हती का? एक तर चुका स्वतः करायच्या आणि वर दुसर्याला ऑर्डर सोडायच्या?"
मी एवढा चिडवून पण हे पठ्ठ्या न शिव्या घालता, अरे तुरे न करता लॉजिक ने भांडत होता...
मी शेवटी हार मानली " अरे राज, मनोज बोलतोय.... आम्ही सगळे ट्रिपला निघालोय नी उगीच तुला पिळत होतो....."
नंतर सगळे यावर प्रचंड हसलो... आताही तो मित्रच अधे मधे या किस्स्याची आठवण करुन देतो....
हा प्रकार भारी आहे
हा प्रकार भारी आहे
हे भारी आहे
हे भारी आहे
मस्त
मस्त
भारीच रे
भारीच रे
देवा
देवा
केदार ऑटो भारी...
केदार ऑटो भारी...
परेश रावलचा सिनेमा आठवला.
छान...आता हा प्रॅंक जसाच्या
छान...आता हा प्रॅंक जसाच्या तसा नाही होऊ शकत....ऑप्टिमाझेशन करावं लागेल....एक तर अननोन उचलले जात नाहीत आणि उचलले गेलेच आणि आपल्या ओळखिचे अथवा कामाचे नसतील तर समोरुन आलेलं पहिल्या वाक्यं संपायच्या आत कट होतात.
(No subject)
भारी आहेत किस्से आणि धागा!
भारी आहेत किस्से आणि धागा!
Pages