फर्ग्युसनच्या ग्राऊंडवर पुस्तक महोत्सव सुरूय, १४ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२४ पर्यंत. फार म्हणजे फार म्हणजे फारच मोठं प्रकरण आहे. पुस्तकांचं मायाजाल वगैरे. एकदा आत शिरल्यावर माणूस चार-पाच तास शांतपणे हरवून जाईल, एवढं मोठं. तीन दालनं, त्यात सातशे स्टॉल्स. एका फेरीत एक दालनही नीट कव्हर होत नाही. पहिली धाड झाली, अजून दोन तीन वेळा तरी जावं लागेलसं दिसतंय. वर्षभराची लूट एकदमच करावी म्हणतो. विशेषतः राजकमल, राजपाल, हिन्द युग्म, वाणी, नॅशनल बुक ट्रस्ट वगैरेची गंगा वर्षातून एकदाच दाराशी येते, तर हात धुवून घ्यावेत. हे miss करणं सरळसरळ पापच होईल म्हणजे.
फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण काहीतरी स्पेसिफिक दोन चार गोष्टी शोधत असतो. किंवा शोधायला तिथं गेलेलो असतो. पण फिरत फिरत असेच एखाद्या स्टॉलमध्ये शिरतो आणि मग तिथे घुसूनच बसतो. किंवा मग चालता चालता काही ओळखीचे चेहरे दिसतात. ड्रग ॲडिक्ट लोकांना कसं शहरात नवीन माल आलाय याची कानोकान खबर लागते. तशी काही व्यसनी पुस्तकी किड्यांना खबर लागून ते हमखास तिथं प्रकट झालेले असतात. "अरेच्चा! मला वाटलंच होतं तू इथं भेटणार वगैरे!" मग कुठे चांगला माल आहे याची खबरबात, रिकंमडेशन्सचं आदानप्रदान वगैरे. आणि मग शोधायच्या यादीत आणखी भर.
आणि या मधल्या काळात आपण मघाशी कुठला स्टॉल, कुठली प्रकाशनं, कुठले लेखक शोधत होतो, ते विसरून गेलेलो असतो. आणि फिरत फिरत दहाव्यांदा वाट हरवून पुन्हा त्याच लेनमध्ये परत आलेलो दिसतो. हे असं करत करत संध्याकाळपर्यंत पाय पार कामातून जातात. तर पुढच्या वर्षी व्हील चेअर्सची वगैरे सोय केली तर बरं! किंवा पालखी वगैरे! ॲटलीस्ट ते चाकांचे शूज तरी!
बाकी हा पहिला राऊंड :

काल एका स्टॉलवर विज्ञानकथांचा
काल एका स्टॉलवर विज्ञानकथांचा विभाग दिसला. विभाग म्हणजे एका कोपर्यात विज्ञानकथा होत्या त्यात नारायण धारपांच्या कथा होत्या.
मला एक पुस्तक हवं होतं ज्यात अवकाशात यानात बिघाड होतो म्हणून ते एका ग्रहावर उतरवण्याचा निर्णय होतो पण यान धोक्याचा इशारा देत असतं. त्या ग्रहावर उतरल्यावर यान नादुरूस्त होते आणि त्या अवकाशयात्रीला त्या ग्रहावरच जन्म काढावा लागतो. या दरम्यान तो पृथ्वीप्रमाणे प्रगती करतो. तिथल्या आदिवासी मंडळींना विज्ञान शिकवतो. अशी कथा होती. तिचं नावच आठवत नव्हतं. तिथे सांगायला कुणीच नव्हतं. आज पुन्हा जाणार आहे.
त्या वेळी एका छोट्या पुस्तिकेत धारपांची कुणी तरी घेतलेली मुलाखत आढळली. त्यातल्या एका उतार्याचा फोटो घेतला होता. धारप म्हणतात ,
"वाचकांना सतत नवीन देण्याचा माझा प्रयत्न असतो. पुनरुक्ती, तोचतोचपणा टाळण्याकडे माझा प्रयत्न असतो आणि
होता. उदा. 'नेनचिम्' नावाची माझी विज्ञान कादंबरी. “चिम्' म्हणजे सूर्य, ‘नेन्’ म्हणजे पुत्र. सूर्यपुत्र म्हणजे चंद्र , सूर्यापासून इतर ग्रह, उपग्रह तयार झाले, ही एक जगन्मान्य थिअरी आहे. यांपैकी चंद्र लवकर थंड झाला आणि इतर ग्रह त्यामानाने उशिरा थंड झाले. आता हा जो मधला
अल्प अस्ट्रॉनॉमिकल पिरीयड आहे, तो मानवी दृष्टीने फार मोठा काळ असतो. जवळजवळ एक लाख वर्षे असाही असू शकतो. चंद्र सगळ्य़ात आधी थंड झाला हे मान्य केलं तर, या थंड होण्याच्या काळामध्ये चंद्रावर वातावरण निर्माण झालं. त्यात मानवासह सर्व सृष्टी निर्माण झाली. त्या सृष्टीने अफाट वैज्ञानिक प्रगती केली. त्यांनी याने निर्माण केली. इतर ग्रहांवर गेले, तर ते अजून जळतच होते. त्या वेळी त्यांच्या लक्षात आलं, आपण फारच लवकर या विश्वात जन्माला आलो आहोत. मग भविष्यात थंड होणाऱ्या या ग्रहांवर सृष्टी तयार होईल. तेव्हा
मानवांना आपला इतिहास कळावा म्हणून एका डोंगराच्या आत हे प्रगत चांद्रवासी आपला इतिहास कोरून ठेवतात. भविष्यात पृथ्वीवरचा प्रगत माणूस तेथे पोहोचल्यावर हा डोंगर आपोआप दुभंगतो आणि इतिहास समोर येतो.
अशी ही 'नेनचिम्'ची संकल्पना आहे. आता चांद्रसंस्कृतीतूनच D.N.A. spores theoryने पृथ्वीवर जीवसृष्टी, तुम्ही -आम्ही निर्माण झालो, असं मानलं जातं. म्हणून सजीवांचे D.N.A. spores त्यांनी विश्वात सोडले. जसजसे ग्रह थंड होत गेले, तसतसे हे spores संपर्कात आले, रुजले आणि सृष्टी निर्माण झाली. अर्थात हे फक्त पृथ्वीच्याच बाबतीत घडलं.
हे उदाहरण मी एवढ्यासाठी दिलं की, ‘नेनचिम्’मध्ये चांद्रवासीयांचं लोकजीवन, कालगणना, संकेत, हे सगळं Derivatives मी तयार केलं. त्यांची कोष्टकं, नियम तयार केळे आणि मग त्याचा आविष्कार पुस्तकात दिसून आला. असाच बारीकसारीक विचार करताना 'तस्मार-अर्चना'चा प्रयोग मला सुचला. "
तीपुगा खूप हसले पोस्टी वाचून
तीपुगा खूप हसले पोस्टी वाचून
पुस्तकांच्या स्टॉल्सचे विभाग केले असते तर बरं झालं असतं
>> हे मात्र १००% खरं. मला विषयानुरूप पुस्तकांचे विभाग असावेत असं मनापासून वाटत होतं.
अजून एक लिहू की नको असं वाटत होतं पण आता लिहूनच टाकते. स्वच्छतागृह म्हणून जी काही व्यवस्था केली होती त्यापेक्षा हॉरीबल काहीही मी कुठेही बघितले नाही आजवर. तिथले स्वच्छतागृह वापरण्याची वेळ माझ्या शत्रूवर सुद्धा न येवो
अजय, तीपुगा पोस्ट आवडल्या
अजय, तीपुगा पोस्ट आवडल्या
शेवटचा दिवस असल्यामुळे आज गर्दीचा उच्चांक बघायला मिळाला. पण कधी नव्हे ती गर्दी आवडली. अगदी पोलिस पोलिसीणीही मुलांना घेऊन खरेदी करताना दिसले.
आज फार वसवस केली नाही. आधी सर्व्हे करून झाला होता, तर जिथं जायचं तिथंच गेलो, आणि शेवटचा दिस गोड करून बाहेर पडलो.
आज पुणे पुस्तक महोत्सव संपला
आज पुणे पुस्तक महोत्सव संपला .
खूप लिहायचं आहे पण वेळ नाही . क्षमा असावी.
-----
संप्रती
खूप छान धागा होता .
तुमच्याकडून वाचनाच्या टिप्स घ्याव्या लागतील .
खरं तर तुम्हीच लिहीत चला . विशेषतः हिंदी पुस्तकांबद्दल .
माझ्यासाठी तर हे पूर्ण नवीनच दालन असेल .
पाठय पुस्तकं अन प्रेमचंद इथे आमचा प्रवास संपतो .
-----
काही निरीक्षणे मांडायची होती , ती आपल्या लोकांनी आधीच मांडली आहेत .
पुन्हा
पोलीस बंदोबस्त बराच होता
त्यात - अनेक महिला पोलीस पुस्तके पाहताना , खरेदी करताना दिसल्या . मुख्यत्वे तरुण . हे चित्र आश्वासक वाटलं
--
वॉश रूम ची अवस्था अवघड होती . मित्राचा स्टॉल होता . तो म्हणाला महिलान्साठी जरा अवघड आहे . ...
मी स्वतः एके दिवशी रात्री गेलो - तेव्हा ते रेडिमेड प्रकारचे होते उभे केलेले
पण - ते बाहेर मैदानावर आणि त्या बंदिस्त खोकड्यात . आतमध्ये दिवे नव्हते . लोक जाणार कसे रात्री ?
पुस्तके वाचून दृष्टिकोन सुधारतो , अंधारात पाहायला दृष्टी नाही !...
--
संगीताचे कार्यक्रम धमाल होते .
एके संध्या काळी तिथे फ्युजन प्रकारची भजनं होती . एक मित्र जो अनेक वर्षं
भजन संगीत शिकवायचा - त्याची ते ऐकूम काय प्रतिक्रिया असेल ?
पूर्ण निगेटिव्ह ? ... तर नाही . तो म्हणाला . धमाल प्रकार होता . मला आवडला . तरुण पोरं एन्जॉय करत होती . पोरं भजन म्हणत होती , नाचत होती . कालमहिमा ! पण त्यांचा सहभाग होता , हे विशेष !
सवाई ला नाही का - अदनान सामीने सादरीकरण केले .
--
मुलांचे सिनेमे पाहायचे होते - फक्त नामफलक पाहू शकलो .
हा तोटा
--
आणि सांस्कृतिक पुणे
इकडे पुस्तक महोत्सव
तिकडे
बालरंगभूमी संमेलन
भीमथडी जत्रा
शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन
सवाई गंधर्व
आणि काही काही
बापरे !
सगळे एकाच वेळेस !
नागीण मालिकेतील इच्छाधारी नागीण होता आलं पाहिजे होतं - पक्षी - एकाच वेळेस अनेक देह धरण करता येत हवेत ! असं म्हणायचं आहे .
एवढं सगळे मिस करायचं म्हणजे ? ...
अतरंगी
अतरंगी
मी तुमची भेट मिस केली .
तुम्ही थांबला असता तर भेट झाली असती .
गप्पा झाल्या असत्या . चहा घेतला असता .
लेखकांशी ओळख करून दिली असती .
या वेळी मला अनेक लेखकांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली .
सगळे मोठे लोक होते . पण ठीक आहे . उगा रिक्षा फिरवायला नको .
जी वेळ तुम्ही सांगत आहात , त्यावेळी दोन लेखक असावेत -
योगायोग असा की दोन्ही वकील . आणि त्या दोघांची एक वेळ निश्चित केलेली नव्हती , ती जुळून आली
ऍड संतोष मळीवकर
गोवा विमान तळावर हमाली कामापासून सुरुवात केली आणि आता वकील आहेत . एवढंच नाही , तर अनेक सामाजिक प्रश्नांवर ते काम करतात
हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे - पुस्तक - - संत्या कुली
ऍड रवींद्रनाथ पाटील
आधी पोलीस अधिकारी - मग स्वतःला तुरुंगवास , आणि आता ते वकील आहेत
या अनुभवांवर त्यांनी लिहिलेलं आहे- पुस्तक - तुरुंगरंग
कृपया प्रतिसाद द्यावा
जी वेळ तुम्ही सांगत आहात ,
जी वेळ तुम्ही सांगत आहात , त्यावेळी दोन लेखक असावेत -
योगायोग असा की दोन्ही वकील . आणि त्या दोघांची एक वेळ निश्चित केलेली नव्हती , ती जुळून आली
ऍड संतोष मळीवकर>>>
नाही.
RAW वर जे पुस्तक होतं त्याचे लेखक.
मला बराच उशीर झाला होता व तुमची चर्चा चालू होती त्यामुळे डिस्टर्ब नाही केलं. शिवाय आपण एकदाच भेटलो असल्याने तुम्ही मला कितपत ओळखाल याची शाश्वती नव्हती. म्हणून मग निघालो.
पुढच्या पुस्तक महोत्सवात
पुढच्या पुस्तक महोत्सवात पुस्तक प्रेमींचं एक माबो गटग करू या.
महोत्सवला पण जाता येईल व सगळ्यांची भेट पण होईल.
पुढच्या पुस्तक महोत्सवात
पुढच्या पुस्तक महोत्सवात पुस्तक प्रेमींचं एक माबो गटग करू या.
महोत्सवला पण जाता येईल व सगळ्यांची भेट पण होईल.
>>> १०००+++
ती पुन्हा गाईल
ती पुन्हा गाईल
अघोर विद्या परिच्छेद वाचताना फिस्सकन हसलो
अतरंगी
अतरंगी
सगळ्यात आधी - उशीरा प्रतिसाद त्यासाठी क्षमस्व .
तुम्ही माझ्या लक्षात आहात .मी तुम्हाला लगेच ओळखलं असतं
आता आलं लक्षात . त्यादिवशी - तुम्ही म्हणता ते लेखक होते - ज्येष्ठ पत्रकार - रवी आमले .
त्यांची RAW आणि आता हे नवीन आलेलं पुस्तक - वरूण ते बहिर्जी - शोध प्राचीन हेरगिरीचा ही पुस्तके आहेत . अभ्यासपूर्ण आहेत .
दुसऱ्या लेखिका होत्या - नीलांबरी जोशी
त्यांचं AI - स्वीकार नकार सहकार - हे पुस्तक आलेलं आहे - नवीन . पुस्तक मोठं आणि अभ्यासपूर्ण आहे
त्यांनीही विपुल लेखन केलेलं आहे .
त्यादिवशी त्यांच्या मुलाखती होत्या .
धन्यवाद
प्रतिसाद द्यावा
भेऊं या कधीतरी
सहकार नगर गटग ला वर्ष होईल आता
पुढच्या पुस्तक महोत्सवात
पुढच्या पुस्तक महोत्सवात पुस्तक प्रेमींचं एक माबो गटग करू या.
महोत्सवला पण जाता येईल व सगळ्यांची भेट पण होईल.
++१
मत्त आयदीया !!
मत्त आयदीया !!
शेवटच्या दिवशी गेल्याने
शेवटच्या दिवशी गेल्याने गर्दीचा त्रास झाला. राजा गायकवाड म्हणून एक मार्मिक लेखक आहेत.
त्यांचा स्टॉल शोधला पण सापडलाच नाही. त्यांनी दिलेला पत्ता नेट न चालल्याने सापडला नाही. राहून गेली भेट.
एकूणच घनचक्कर झालं हे पुस्तक
एकूणच घनचक्कर झालं हे पुस्तक प्रदर्शन.. मुद्दामहून जाईन पुढल्या वर्षी.
वर्षाविहारपेक्षा बरं पडेल. जो मायबोलीकर भेटेल तो भेटेल.
Pages