चाफा म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम आठवते ती लतादीदींनी गायलेली कवी "बी" यांची रचना "चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना". वर वर साधे वाटणारे हे काव्य जीवा-शिवाशी एकात्म साधणारे अद्वैत सांगून जाते.
तसे पाहता चाफा ह्या नावाने अनेक वनस्पती ओळखल्या जातात त्याची फुले सुद्धा वेगवेगळ्या रंगाची, आकाराची असतात पण सर्वात एक समानता आहे ती म्हणजे सर्व फुले अत्यंत सुवासिक असतात. त्यापैकी काही महत्वाच्या वनस्पतींचा घेतलेला हा एक आढावा.
पांढरा चाफा:
Plumeria acutifolia
आपल्याकडे सर्रास आढळणारा चाफा म्हणजे, पांढरा चाफा. याला अनेक नावे आहेत. फ्रँगीपनी ट्री (फ्रेंच अर्थ साकळलेले दूध, याच्या चिकासारखे) क्षीर चाफा याच्या खोडातून चीक पाझरतो म्हणून. खूर चाफा (क्षीर चाफ्याचा अपभ्रंश). देवचाफा किंवा "टेम्पल ट्री" यासाठी की मंदिराच्या आसपास याच एखाद तरी झाड असतंच. मंदिरचं नाही पण बौद्ध पॅगोडाच्या बाजूला पण याची झाडे असतात म्हणून हा "पॅगोडा ट्री" ह्या नावानेही ओळखला जातो. स्मशान आणि दफनभूमीत लावला जात असल्याने साहेबाने याच नाव "Dead Mans Flower" असं करून टाकलं. याच्या पांढऱ्या सोडून लाल व पिवळसर रंगाच्या देखील काही जाती आहेत. हा एक मध्यम उंचीचा वृक्ष असून याला मोठी पाने असतात. फुलांचा आकार देखील मोठा असतो फुले अत्यंत सुवासिक असतात. खडकाळ जमिनीत किंवा कमी पाण्याच्या ठिकाणी देखील हा वृक्ष चांगला वाढतो. आपल्याकडे सगळीकडे आढळत असला तरी याच मूळ आहे दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको. बऱ्याच वर्षांपूर्वी तो भारतात येऊन आता आपलासा झाला आहे. उद्यानात लावण्यासाठी याच्या बऱ्याच जाती विकसित केल्या आहेत. हा वन्य नसल्यामूळे याला आपल्याकडे फळे येत नाहीत. पण काही जातींना शेंगेसारखी जोडफळे येतात. याच्या फुलांपासून सुवासिक अत्तर बनवले जाते. या चाफ्याचे कुळ आहे Apocynaceae.
याचे शास्त्रीय नाव आहे Plumeria, फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञ चार्ल्स प्लुमेर याच्या स्मरणार्थ दिलेले नाव. याची सुवासिक जात P. acutifolia (पानाचे टोक निमुळते असल्याने), P. obtusa (पानाचे टोक बोथट असल्याने) व लाल रंगाची जात P. rubra (रुब्रा म्हणजे लाल). ह्याच चाफ्याची एक सुवास नसणारी पण पानांच्या वैशिष्ठयपूर्ण आकारामुळे हमखास बागेत लावली जाणारी एक जात म्हणजे P. pudica
Plumeria rubra
Plumeria obtusa
Plumeria pudica
प्रसिद्ध पत्रकार मृणाल पांडे यांच्या मातोश्री शिवानी यांच्या "स्मशान चंपा" या कांदंबरीत एक उल्लेख आहे:
चम्पा तुझमे तीन गुण - रूप रंग और बास.
अवगुण तुझमे एक है, भ्रमर ना आवें पास.
यावर काव्यात्म पद्धतीने दिलेले उत्तर:
चम्पा वर्णी राधिका, भ्रमर कृष्ण का दास.
यही कारण अवगुण भैय्या, भ्रमर ना आवें पास.
अर्थात ते काव्यात्म असलं तरी चाफ्याचं स्वपरागीभवन किंवा पतंगाद्वारे परागीभवन होत.
सोनचाफा:
ज्ञानेश्वरांनी "तो कनकचंपकाचा कळा, की अमृताचा पुतळा." असा ज्याचा उल्लेख केला आहे तो वृक्षराज म्हणजे सोनचाफा.
Michelia champaka
याच्या फुलांचा आकर्षक पिवळा, केशरी, सुवर्णकांती रंग व मनमोहक सुगंध अक्षरशः वेड लावणारा आहे. रामायण, महाभारत आणि संस्कृत साहित्यात सोनचाफ्याचे अनेक संदर्भ येतात. सुंदर स्त्रीच्या हास्याने सोनचाफा फुलतो अशी एक कविकल्पना आहे.
सोनचाफा हा अस्सल भारतीय वंशाचा सदाहरित वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात व पावसाळ्यात बहर येतो पण आता वर्षभर फुलणाऱ्या चाफ्याच्या जाती उपलब्ध आहेत. याच्या फुलाच्या कळ्याच जास्त वापरात येतात. एकदा फुलले की त्याच्या पाकळ्या गळून पडतात. खरतर या पाकळ्या नसतातच. संदल व प्रदल यांची एकत्रित अशी ती रचना असते. चाफ्याचे पंचांग आयुर्वेदात वापरतात. सोनचाफ्याचे फुले अत्तर, सुगंधी तेल, धूप, साबण यांच्या उत्पादनात वापरतात. तसेच याची फुले तुरटीच्या द्रवांत भरून कायमस्वरूपी शोभेच्या बाटल्यात साठवून ठेवतात. सोनचाफा हा Magnoliaceae कुळातील आहे. याचे शास्त्रीय नाव Michelia champaka असे आहे. अँटोनियो मायकेली या इटालियन शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ प्रजातीनाम तर चंपक हे संस्कृत नावावरून जातीनाम ठेवलं आहे. Tailed Jay, Common Jay व Common Bluebottle या फुलपाखरांची मादी या सोनचाफ्यावर अंडी घालतात.
भुंगा कधीच चाफ्याच्या फुलावर बसत नाही या गोष्टीची कवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान करताना "... लेई रस ऐतिन को, बैठी न सकत है,अली नवरंगजेब चंपा शिवराय है " असे रसपूर्ण वर्णन केले आहे. भुंगा (अली) जसा इतर सगळ्या फुलांतून मकरंद गोळा करतो त्याप्रमाणे औरंजेब सगळ्या राजांकडून कर गोळा करतो परंतु सोनचाफ्याप्रमाणे असणाऱ्या शिवरायांच्या वाटेला मात्र तो जात नाही.
Magnolia alba
Magnolia nilagirica
Magnolia nilagirica हा दक्षिणेत निलगिरी पर्वतावर आढळणारा एक सदाहरित वृक्ष आहे. याची फुले पांढऱ्या रंगाची असून दिसायला सोनचाफ्याप्रमाणेच असतात, यालाही अप्रतिम सुगंध असतो. सोनचाफ्याचीच Magnolia alba नावाची एक पांढरी सुवासिक जात संकर करून विकसित केली असून आजकाल ती हमखास बागेत लावली जाते. याच्या पाकळ्या खूप नाजूक असतात. याच कुळातील मुखत्वे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशात आढळणारी एक जात म्हणजे महापुष्प चाफा Magnolia grandiflora याची पांढरी शुभ्र फुले अत्यंत सुवासिक असून याच्या फुलांचा आकार हाताच्या दोन्ही ओंजळीत मावणार नाही इतका मोठा असतो.
Magnolia grandiflora
कवटी चाफा:
मॅग्नोलिया कुळातील आणखी एक सर्वांच्या परिचयाचा चाफा म्हणजे कवठी चाफा Magnolia pumila (बुटका). याची पांढरी कवटासारखी - अंड्याप्रमाणे दिसणारी फुले खूपच सुवासिक असतात. याला हिमचंपा असेही एक नाव आहे
Magnolia pumila
भारताबाहेर मॅग्नोलियाच्या विविध रंगाच्या जाती पाहायला मिळतात.
नागचाफा:
नागचाफा या नावाने ओळखला जाणारा छोटेखानी अस्सल भारतीय वंशाचा वृक्ष भारतात बऱ्याच ठिकाणी आढळतो. Mesua ferrea (दमास्कस येथील मेसु या अरेबियन पिता पुत्रांच्या स्मरणार्थ प्रजाती नाम व फेरुआ म्हणजे लोखंडी गंजाच्या रंगाप्रमाणे - याच्या पालवीचा रंग) या वृक्षाचा समावेश कॅलोफायलेसी या कुळात होतो. नागकेसर, नागवृक्ष, नागचंपा अशा नावांनी देखील हा वृक्ष ओळखला जातो. नागचाफा हा एक छोटेखानी वृक्ष आहे. याची नवीन पालवी लाल किरमिजी रंगाची असते. पाने लांबट टोकदार असतात. याची फुले मोठी, पांढरी व सुवासिक असतात. चार शुभ्र पाकळ्या व मध्यभागी पिवळाधम्मक पुंकेसरांचा गुच्छ असतो. याची फळे अंडाकार व टोकदार असतात. याच्या बियांपासून नवीन रोपे सहज तयार होतात.
Mesua ferrea
Mesua ferrea
नागचाफ्याची फुले औषधी असून फुलांतील पुंकेसरांना नागकेसर म्हणतात. त्याचाही उपयोग आयुर्वेदामध्ये अनेक आजारावर केला जातो.
हिरवा चाफा:
Artabotrys odoratissimus
"लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का?" या गदिमांच्या गीतातून प्रसिद्ध झालेला हिरवा चाफा ही आरोही झुडूप लता आहे. याचे शास्त्रीय नाव Artabotrys odoratissimus (लोम्बणारा सुगंधी फळांचा घड) असून ते Annonaceae कुळातील आहे. ही सदाहरित आधाराने वाढणारी वेल असून याची फुले हिरव्या रंगाची असतात. फुलात तीन आत आणि तीन बाहेर अशा सहा जाड हिरव्या, मांसल पाकळ्या असतात. या वेलीवर अनेक हुक सारखे भाग असतात त्याद्वारे ती आधार घेत वाढते. याची फुले सुरवातीला हिरवी असतात व नंतर ती "पिकून" पिवळी होतात आणि त्यांना गोड सुगंध येतो. नंतर त्याच जागी बोराएवढ्या हिरव्या फळांचा घोस येतो तोही पिकल्यावर पिवळा होऊन त्याला मंद गोड सुगंध येतो. याच्या फुलांपासून सुगंधी अर्क काढतात तसेच अत्तर सुगंधी तेल, धूप यातही याचा वापर करतात.
भुईचाफा:
Kaempferia rotunda
उन्हाळ्यात थेट जमिनीतून उमलणाऱ्या व् निळसर पांढऱ्या फुलपाखराच्या आकाराच्या पाकळ्या मिरवणारा भुईचाफा तसा दुर्मिळच. याचा सुगंध मंद, प्रसन्न करणारा, म्हणूनच आरती प्रभूंनी म्हटल आहे "गंधगर्भ भुईपोटी ठेवोनी वाळली, भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी". याचे कंद जमिनीत सुप्तावस्थेत राहतात. उन्हाळ्यानंतर याला सुगंधी आकर्षक फुले येतात. हा फुलोरा जमिनीतून उगवल्यासारखा असल्याने याला भुईचाफा असे म्हणतात. फुलल्यावर याला पावसाळ्यात पाने येतात पाने वरून हिरवी असून त्यावर नक्षी असते व खालचा भाग जांभळट असतो हा Zingiberaceae या कुळातील असून याचे शास्त्रीय नाव Kaempferia rotunda (शास्त्रज्ञ कम्फेरा यांच्या स्मरणार्थ, तर रोटुंडा म्हणजे भूमिगत कंद असणारा). याचे पंचांग औषधात वापरतात. यापासून तेल, मलम बनवितात.
Pterospermum acerifolium
आपल्याकडे मुचकुंद Pterospermum acerifolium नावाने माहीत असलेल्या फुलांना उत्तरेकडे "कनकचंपा" म्हणतात. तर आणखी एका पिवळ्या रंगाच्या सुवासिक Ochna squarrosa या फुलांच्या वृक्षाला "रामधनचंपा" असे म्हणतात.
Ochna squarrosa
तर असा हा चाफा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींचा आढावा
(लेखातील सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार)
लेख पूर्वप्रकाशित
अहाहा - लेख, प्रतिसाद, चर्चा.
अहाहा - लेख, प्रतिसाद, चर्चा.
“चाफेकळी” रेखिवपणासाठी आणि “सुवर्ण-चंपक” सुंदर कांतीसाठी सर्वथा योग्य !
चंपकमंथन, “चंपकपट न्याय" आणि व्हिएतनामचे “चंपा राज्य” ही नवीन माहिती ! ❤
@ ऋतुराज.
… पांढऱ्या चाफ्याला मध्ये हळदीची चिमूट सोडल्यासारखा पिवळा रंग, मंद सुवास असतो…
होय. तो स्वर्गतुल्य दरवळ मुक्तहस्ते वाटणारा देवदूत माझ्या अंगणात आहे - तुम्हांला ही चित्रभेट. सुगंध पाठवता आला असता तर ….
सुंदर लेख, प्रचि पण अहाहा
सुंदर लेख, प्रचि पण अहाहा आहेत.
शिवरायांचा संदर्भ वाचून आज मायबोली उघडल्याचे सार्थक झाले.
वावे ने दिलेला संपिगे चा गंधभारीत रस्ता आठवला.
हिरवा चाफा लहाणपणी साता-याच्या घरी अगदी दारात होता. मंदमंद सुगंध येत रहायचा पण फूल सापडायचे नाही. असं म्हणतात की हिरव्या चाफ्याच्या गंधाने सर्प आकृष्ट होतात. त्यामुळे अगदी घराजवळ हे झाड लावत नसावेत.
या thanksgiving च्या सुट्टी मध्ये CA च्या Disneyland मध्ये सोनचाफ्याची ओळीने लावलेली फुलांनी बहरलेली झाडे दिसली.
ऋतुराज, सुंदर लेख आहे. लिहीत रहा. खूप शुभेच्छा.
सुंदर कविता ऋतुराज.
सुंदर कविता ऋतुराज.
अजून त्या झुडुपांच्या मागे
अजून त्या झुडुपांच्या मागे रेडिओवर ऐकल्याचं आठवतं.
शेवटच्या ओळी (गरळ - बरळत) रसभंग करतात मात्र!)आज गॅलरीत जुने फोटो चाळत
आज गॅलरीत जुने फोटो चाळत असताना हा अचानक दिसला. आमच्याकडे कुंडीत फुललेला भुई चाफा. फोटो एवढं छान नाहीये तरी दाखवते आहे.

Exactly स्वाती! माझापण रसभंग
Exactly स्वाती! माझापण रसभंग झाला त्या शेवटच्या दोन ओळींनी. बाकी कविता काय सुंदर आहे!
Strike out का केलंस? रसभंग झाला पण नंतर काही वेगळा अर्थ लागला का?
>>> Strike out का केलंस?
>>> Strike out का केलंस?
अवांतर आणि बहुधा अस्थानी मतपिंक होती म्हणून. पण मत अजूनही तेच आहे.
काय एक से एक बढकर रेफरन्सेस
काय एक से एक बढकर रेफरन्सेस दिले आहेत ऋतुराज. शिवरायांचा संदर्भ तर फारच सुरेख आहे.
>>>>>सुंदर स्त्रीच्या हास्याने सोनचाफा फुलतो अशी एक कविकल्पना आहे.
क्या बात!!! अहाहा. शक्य आहे की ही फक्त कविकल्पना नसावी
अप्रतिम झाला आहे लेख ऋतुराज.
अप्रतिम झाला आहे लेख ऋतुराज. ठिकठिकाणी आलेले शास्त्रीय संदर्भ, वेगवेगळ्या देशातील चाफ्यांची माहिती व साहित्यिक संदर्भ अतिशय आवडले. सोप्या आणि चांगल्या भाषेत लिहिलेय. चित्रेही सुरेख. >>> टोटली!
काय अप्रतिम लेख (आणि धागाही) आहे! कितीतरी दिवसांपासून वाचायचा होता. ऐतिहासिक संदर्भ, कवितांचे दाखले, शास्त्रीय नावे कशी आली त्याबद्दलची माहिती यामुळे लेख एकदम समृद्ध झालेला आहे. त्यातले फोटो, इतरांनी टाकलेले फोटो व इतर माहितीही मस्त.
आमच्या भागातही आर्च च्या पोस्टमधल्या फोटोसारखी मॅग्नोलियाची झाडे खूप आहेत. प्रचंड मोठी फुले येतात त्याला. वास घेउन कधी पाहिला नाही. तो चाफाच आहे हे माहीत नव्हते. हे झाड पूर्ण वाढले की चांगले २-३ मजली इमारतीएवढे उंच होते असे दिसते पण ही झाडे जेथे नव्याने लावली आहेत तेथे ८-१० फूट उंच झाली तरी लगेच त्याला फुले येतात.
या लेखातील संदर्भाने "पंचांग" म्हणजे काय? झाडाचे किंवा फुलाचे पाच विविध भाग का?
आवडतील असे लेख अजून वाचायला.
धन्यवाद सामो.
धन्यवाद सामो.
धन्यवाद फारएण्ड.
इथे पंचांग म्हणजे मूळ, खोड, पान, फूल,फळ.
खूप माहितीपूर्ण लेख.चाफ्याचे
खूप माहितीपूर्ण लेख.चाफ्याचे फोटोही सुंदर.
सुरेख लेख.
सुरेख लेख.
सिमरन, गंधकुटी...धन्यवाद
सिमरन, गंधकुटी...धन्यवाद
हा सगळा उन्हाळा आळसात घालवून
हा सगळा उन्हाळा आळसात घालवून आता थंडीत अचानक जाग आलेला आमचा पांढरा चाफा:

लेख आवडला.
लेख आवडला.
स्वाती,
स्वाती,
सुंदर आहेत कळ्या. सुगंध जाणवला.
धन्यवाद छंदीफंदी
किती सुंदर! वैभव आहे.
किती सुंदर! वैभव आहे.
स्वाती अशक्य! सहीच!
स्वाती अशक्य!
सहीच!
झूम आऊट मोठा म्हणजे झाड किती मोठं आहे वगैरे कधी फोटो काढलास तर तो पण टाक.
चाफयाचे फोटो काढलेच आहेत
चाफयाचे फोटो काढलेच आहेत तर चाफयाच्या धाग्यावर पाहीजेतच म्हणून इथेही डकवतेय .




.
.
.
सुंदर!
सुंदर!
सिमरन, सुंदर फोटो
सिमरन, सुंदर फोटो
पाकळ्यांचा आकार आवडला.
चाफ्याप्पमाणेच सदाबहार धागा.
चाफ्या प्रमाणेच सदाबहार धागा.
सर्व नवीन फोटोज् = 👌
@हेमाताई, भुईचाफा अप्रतिम.
@हेमाताई, भुईचाफा अप्रतिम.
@सिमरन, देवचाफ्याचा आकार वेगळा आणि सुरेख आहे.
@स्वाती, पांढरा चाफा मस्तच.
माझ्याकडील काही चाफ्याचे फोटो
माझ्याकडील काही चाफ्याचे फोटो
---
---

छन्दिफन्दि चाफा फोटोज्
छन्दिफन्दि
चाफा फोटोज् = 👌
* चाफा फोटोज् >>अप्रतिम !
* चाफा फोटोज् >>अप्रतिम !
छन्दिफन्दि चाफा फोटोज्, सुंदर
छन्दिफन्दि
चाफा फोटोज्, सुंदर
छन्दिफन्दि चाफा फोटोज्, सुंदर
छन्दिफन्दि
चाफा फोटोज्, सुंदर
Pages