तिन्हीसांज होता दिवेलागण झाली,
तुझ्या आठवणींचे तेव्हा हळूच येणे झाले ।
दबक्या पावलांनी आले चंद्र तारे ,
श्वास अडकायला सखे हेच बहाणे झाले ।
गुंतला जिव उंबऱ्यात ,
पण ना तुझे येणे झाले ।
मी लावली सांजवात ,
पण ना मला गाणे आले।
दूर कुठूनसा आला आवाज कानी ।
वाटले मला जणू तुझी चाहूल आली ।
पायातल्या पैंजनांचे तेव्हा कानी पडसाद आले ।
श्वास अडकायला सखे हेच बहाणे झाले ।
चंद्र खिडकीतून पार डोईवर आला ।
बघता बघताच अचानक ढगांआड गेला ।
वारा आला आंगचटीला पडद्याचे उडणे झाले ।
खरच सांगतो सखे श्वास अडकायला हेच बहाणे झाले ।
पडलो बिछान्यावर बघत वाट ।
वाटत होते त्यातच सरेल माझी सारी रात ।
कूस बदलत पालथा घातला बिछाना सारा ।
सोबतीला माझ्या गार गार वारा ।
आम्हा दोघांचे ही घोंगावणे एकमेकांना सवयीचे झाले ।
श्वास अडकायला सखे हेच बहाणे झाले ।
प्रहर उलटताना खिडकीशी मी उभा झालो ।
चांदण्यांना बघत तिथेच रमून गेलो ।
इतक्यात नाकाशी मोगऱ्याच्या सुवासाचे येणे झाले ।
खरच सांगतो सखे असे खूप जीवघेणे वार झाले ।
तिन्हीसांज
Submitted by मन मानस on 8 November, 2024 - 02:12
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान कविता..!
छान कविता..!