©वाईल्डलाईफ! - भाग २ नरक चतुर्दशी (II)

Submitted by अज्ञातवासी on 1 November, 2024 - 00:14

©सर्व हक्क लेखकास्वाधीन.

भाग - १

https://www.maayboli.com/node/85934

नऊ वर्षांचा एक गोंडस मुलगा त्याच्याजवळ बसलेला होता.
"राजा विक्रमादित्य. कसं चाललय बॅडमिंटन?"
"बोरिंग. मला बॉक्सिंग करायचीय."
"कर ना मग. नाही कोण म्हणतय?"
"जिममध्ये प्रॅक्टिस सुरू केलीय. राहुलअंकल शिकवणार आहेत."
"त्याने कधी हातात ग्लोव तरी घातला होता का?"
"मग तू शिकव ना. तू तर स्टेट लेव्हलला गेला होतास ना?" गायत्री म्हणाली.
"एक्झॅक्टली. मी फक्त स्टेट लेव्हलला गेलो होतो." तो म्हणाला.
"बाबा."
"बोल ना."
"खूप मोठी लढाई झाली?"
"हो रे."
"गन होत्या. बॉम्ब होते?"
"सगळं होतं."
"मग?"
"आपण जिंकलो राजा विक्रमादित्य."
"आय एम प्राऊड ऑफ यू बाबा."
"माझ्या आयुष्यात मला हेच हवय राजा. तू, तुझी आई, सगळ्यांनी म्हणावं. आय एम प्राऊड ऑफ यू."
"लव यू बाबा." तो म्हणाला.
"लव यू टू..."
थोडावेळ कुणीही काही बोललं नाही.
"विक्रम." तो म्हणाला.
"बोला ना बाबा."
"तुझी ममा टेन मीटर पिस्टल मध्ये नॅशनल चॅम्पियन होती." माहितीये ना?
"हो."
"अँड शी नोज इच अँड एवरी वेपन इन एक्सिस्टन्स. पुढचे वीस दिवस,आयुष्य एन्जॉय कर. कारण त्यानंतर तुला तुझ्या ममाकडून शिकायचंय. तुझ्यावर लक्ष ठेवायला ना तुझी ममा असेल, ना तुझे बाबा. आर्या मावशी आणि मिहिर अंकलसोबत धमाल कर. जितकी हवी तितकी मस्ती कर... सेलिब्रिटी लाईफ काय असते हे जाणून घे. बी लाईक अ प्रिन्स विक्रमादित्य, सो यू कॅन बीकम अ किंग विक्रमादित्य... ओके?"
"येस बाबा."
"लहान आहेस तू खूप विक्रम अजून, खूप गोष्टी तुला आता नाही समजणार. पण तुला त्या माहिती असायला हव्यात."
त्याने फक्त मान हलवली.
"जा आता. तुझं प्लेस्टेशन वाट बघत असेल तुझी..."
तो उठला, आणि त्याच्या बाबाला घट्ट बिलगला...
"माझा विक्रम." त्याने त्याच्या केसात हात फिरवला.
तो तिथून पळतच गेला.
"वीस दिवस मिहिर आणि आर्यासोबत?"
"हो."
"का? आय मीन तू मला विचारलं देखील नाहीस."
"कारण गायत्री, आपण हनिमूनला चाललो आहोत."
ती काहीही बोलली नाही. तिने फक्त भुवया वर केल्या.
"पॅरिस, बर्लिन, मिलान, लंडन, आणि शेवटी..."
".... रामेश्वरम..." ती उद्गारली.
"येस..."
"पंधरा दिवस. गायत्री फक्त तू आणि मी. मला कुणीही नकोय आपल्या दोघांमध्ये... तुझ्या सोबत आता एक एक क्षण त्याच उत्कटतेने जगायचाय, ज्या उत्कटतेने धनुष्कोडीच्या समुद्राच्या मध्ये आपण दहा वर्षांपूर्वी आपली पहिली रात्र घालवली होती."
"दहा तास तू ड्राईव्ह करत होतास."
"कारण मला माझी गायत्री गमवायची नव्हती."
"शेवटच्या क्षणी जिंकलास ना..."
"...नाही. मी अनेक लढाया हरलो, हरत राहिलो, काही लढाया स्वतःहून हरलो, आणि शेवटी युद्ध जिंकलो."
ती खळखळून हसली.
"गायत्री..."
"बोल ना."
"का? मीच का?"
"आय डोन्ट नो." ती बेफिकीरपणे म्हणाली.
"एक नॅशनल लेव्हल पावरलिफ्टर, एक नॅशनल लेव्हलला पोहोचलेली शूटर, दिवसाला पाच सर्जरी करणारी सक्सेसफुल डॉक्टर...जगातली सगळ्यात सुंदर मुलगी, तरीही का केलंस प्रेम माझ्यावर? दहा वर्षे झालीत तरीही मला हे कोडं सुटत नाही."
"मिस बेंगलोर विसरलास तू."
"हा हा, मिस बेंगलोर..."
"...माझं उत्तर तुला माहितीये मनू. जे कधीही बदलणार नाही."
"हो."
"सांग बघू."
"कारण तू माझ्यासाठी परफेक्ट आहेस म्हणून..."
तो हसला.
"गायत्री काही फ्रॅक्चर नाहीये ना?"
"नाही."
"उद्या आईसमोर असं लंगडत जायला नको."
"माझं ऐकशील तर नाही होणार असं."
"ओके डॉक."
"आई आणि बाबा संध्याकाळी येणार आहेत सो डोन्ट वरी. अप्पा आणि अम्मा सकाळीच येतायेत."
"त्यांना सांग, जास्त सिक्युरिटीची गरज नाही. आपली माणसे आहेत इथे."
"माझ्या अप्पांना सांगू शकते, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना कसं सांगू?" ती हसली.
"यू आर राईट. मिहिरला तर सांगशील."
"त्यांनी तर मला आधीच सांगितलं आहे, आम्ही फक्त आणि फक्त दोघे येणार आहोत."
"गुड."
"गायत्री कबीर कधी पोहोचणार आहे?"
"आता संध्याकाळी पोहोचेल."
"डिनरसाठी येणार आहे ना?"
"ऑफकोर्स..."
"गुड." तो शांत राहिला.
"मनू काय झालंय?"
"अग काही नाही."
"मनू..."
"अग खरच काही नाही."
"मनू... आयुष्यातलं सगळ्यात मोठं हलाहल मी पचवलं आहे. आता तू जे काही सांगशील, ते पचवायची ताकद आहे माझ्यात."
"गायत्री पुढचे दोन वर्ष, आपण परत आल्यावर, मी नाशिक सोडणार नाहीये. मी एक दिवसही नाशिकच्या बाहेर जाणार नाहीये."
"अरे हो, पण का?"
"...जर मी गेलो, तर हे नाशिक स्मशानभूमी बनेल. लष्कर - ए - जब्बार ची मुळे फार खोलवर रुजलेली आहेत. पुढची दोन वर्षे कबीरला शिकारी कुत्र्यासारखं त्यांना हंट करावं लागेल."
"मनू रशियन माफिया, इटालियन माफिया, ज्यू गँग, इवन रोथशिल्डस सगळे तुझे मित्र आहेत. या एका टेररिस्ट ग्रुपसाठी एवढा अट्टाहास? मला समजत नाहीये, आणि जी गोष्ट मला समजत नाहीये, ती तुझ्यासाठीसुद्धा डेंजरस आहे याची तू जाणीव ठेव. कारण जी गोष्ट मनू करू शकणार नाही, ती शेवटी गायत्रीच करेन, हा आपल्यातला थंबरुल आहे."
"गायत्री..."
"ऐकतेय मी."
"उद्या रात्री तू घट्ट माझ्या मिठीत असशील." "ओके. आय नो. पण याचा काय संबंध?"
"आणि तुला मिठीत घेऊन मी एक कथा सांगेन."
"अच्छा. आणि..."
"...आणि तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील."
"मी वाट बघेन, आणि हो. तू आज अजिबात स्विमिंग करायची नाहीये."
त्याने प्रश्नार्थक चेहरा केला.
"कारण मी करणार आहे." तिने दोन्ही ओठ घट्ट दाबून त्याच्याकडे खट्याळ नजरेने बघितले.
तो काहीही बोलला नाही.
"तू फक्त आणि फक्त माझा आहेस मनू... आणि तुला वेडं करण्याची एकही संधी मी सोडणार नाही. चल, आराम कर, आणि हो, डिनरसाठी रेडी रहा."
ती निघून गेली.
तो तिच्याकडे बघतच राहिला.
*****
वीस खुर्च्या असलेला डायनिंग टेबल.
पांढराशुभ्र... मखमली खुर्च्या असलेला...
खास इटलीहून मागवलेला.
गायत्रीची चॉईस...
अठरा खुर्च्या समोरासमोर.
एक हेड ऑफ द टेबल. होस्ट सिट.
एक होस्टेस सिट.
हेडच्या डाव्या बाजूला तरन बसलेला.
अमितसर त्याच्या शेजारी.
उजवी खुर्ची मात्र रिकामी होती.
इकडे अपोजिट साइडला होस्टेस चेयरच्या शेजारी रोशनी बसलेली होती.
होस्टेस चेयरवर गायत्री होती.
एक रंगाने सावळा, पाणीदार डोळ्यांचा, कुरळ्या केसांचा माणूस आत आला.
...आणि सरळ होस्टच्या उजव्या खुर्चीवर बसला.
थोड्याच वेळात तो सावकाश चालत आला. आता तो लंगडत नव्हता, पण त्याची चाल मंद होती.
तो बसला.
"गायत्री विक्रमादित्यच जेवण झालं?"
"हो."
"गुड. सगळे जमलेत."
"...येस...काँकरर..."
त्याच्या उजव्या बाजूला बसलेला कबीर म्हणाला.
...आणि क्षणार्धात वातावरण पालटलं...
...कारण कबीर तिथे होता, आणि त्याने त्याला काँकरर हा शब्द वापरला होता...
काहीतरी खूप मोठं घडणार होतं.
"वेलकम कमांडर... त्याने सुरुवात केली.
आपण आताच एक युद्ध जिंकून आलो आहोत. क्रेडिट गोज टू ऑल ऑफ अस. कबीरला मी मुद्दाम या युद्धात सहभागी करून घेतलं नव्हतं. कारण जर मला काही झालं असतं, तर गायत्रीला युद्धासाठी एक कमांडर आवश्यक होता.
दुसरी गोष्ट. करानोव्ह ग्रुप रशियन सैन्याला प्रायव्हेट सैनिक पुरवतो, त्याने हेड अमिलो करानोव्ह याने बंड करण्याची तयारी केली होती. ही निड्स टू बी टेकन डाऊन... अँड... कबीर डीड इट..."
...कबीरची छाती अभिमानाने फुलली.
"रशिया इज अवर नॅच्युरल फ्रेंड. आपला बिजनेस सगळ्यात जास्त बहरला आहे, तो रशियामध्येच आणि रशियन प्रेसिडेंटची रिक्वेस्ट मी अमान्य करू शकत नव्हतो. गुड जॉब कबीर.
सॉरी टू से, पण आपण युद्ध नाही, पण निर्णायक लढाई जिंकलो. हुमायून अहमद इज डेड. पण आता दोन व्यक्ती त्याची जागा घेतील...
...जलालुद्दिन अहमद...
...मुमताज अहमद..."
शांतता पसरली.
"ही दोन नावे कबीर जमलं तर डोक्यात कोरून ठेव. यापैकी कुठल्याही परिस्थितीत, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जलालुद्दिन अहमद असेल, त्याला शोध, आणि त्याला दिसताक्षणी संपव. तो पाकिस्तान, इराण, सीरिया, लिबिया, येमेन, इराक, लेबनॉन कुठेही लपला असेल आपली माणसे त्याच्या मागावर पाठव... आणि संपव त्याला...
...ही माझी शेवटची ऑर्डर समज..."
"अण्णा, टेंशन नही लेना. मैं करता. बहोत विक होना अभी तब्बर. खतम करता सबको."
तो हसला, आणि पुढच्याच क्षणी त्याचा आवाज कठोर झाला...
"... जोपर्यंत तिथे मुमताज आहे, ते कधीही वीक होणार नाहीत...
...कारण हा बदला आजचा नाही, पस्तीस वर्षापूर्वीचा आहे..."
...आज तो वेगळ्याच जगात होता. कुणालाही तो काय बोलतोय हे कळत नव्हतं आणि त्याला विचारायची ताकदही नव्हती.
"...गायत्री." त्याने शांतता भंग केली.
"बोल ना."
"ड्राईव्ह करशील?"
"येस."
"जाऊयात."
"तो उठला..."
"...आधार दे मला..."
तिच्या खांद्यावर हात ठेवून तो हळूहळू निघाला.
"कबीर भाई. क्या चल रहा है ये." तरन तो जाताच म्हणाला.
"नो आयडिया."
"फिर?"
"अण्णाने जो बोला वो करेगा. चंदीगड से मानसेरा तक जायेगा, उस जलाल को खतम करके चोडेगा."
"...मेरी भी गँग केले जाओ भाई, अकेले मत जाओ." तरन म्हणाला.
"मतलब अण्णाको अकेला रखेगा?"
तरनकडे उत्तर नव्हतं.
"...देख तरन. अण्णा बहोत टुटा हूवा लग रहा. समझ जरा."
"समझ रहा हुं मैं."
"चलो गुड नाईट, और कोई क्वेशन मत पूछना, अँग्री हो जायेगा अण्णा."
"ओके. गुड नाईट."
कबीरही तिथून निघाला.
*****
नाशिकच्या रस्त्यावर एक गाडी धावत होती. वेगात.
अजिबात आवाज न करता.
रात्रीचे दहा वाजले होते...
...इकडे कपड्यांचं एक मॉल पूर्णपणे बंद झालं.
सिग्नलला गाडी थांबली... १२० सेकंदाचा सिग्नल.
...एक क्रेटा बाजूला येऊन उभी राहिली. तिचं सनरूफ उघडून एक मुलगी उभी राहून हूटिंग करू लागली.
...त्याने न राहवून गनकडे हात ठेवला.
"शू." गायत्रीने त्याला दरडावले.
आणि पुढच्याच क्षणी त्याच्या गाडीचं रुफ फोल्ड झालं.
"...वूहू..." तिची आरोळी घुमली.
तोही हसला.
जगातील सगळ्यात सुंदर मुलगी, त्या काळची सगळ्यात सुंदर गाडी चालवत होती...
...२०२४ बेंटली कॉन्टिनेन्टल जिटी कन्वर्टीबल...
एकशे वीस सेकंदात हे घडलं, आणि पुढच्या दहा सेकंदात ती दिसेनाशी झाली.
पूर्ण मॉल बंद होतं, तिने सरळ गाडी आत घेतली.
एक शोरुम मात्र उघडं होतं.
...तिथला मॅनेजर त्यांची वाटच बघत होता.
"वेलकम सर." तो एवढंच म्हणू शकला.
ब्लॅक शर्ट, शायनिंग सिल्क, एक्सएल...
... क्रीम कलरची पँट, एक्सएल, थर्टी एट.
ब्राऊन लेदरचे शूज.
बस एवढंच.
पुढच्या दहा मिनिटात कपडे घेऊन ते निघाले.
...पावणे अकरा वाजता ते बंगल्यावर पोहोचले. विक्रम झोपून गेलेला होता.
...त्याच्या चालीत आता सुधारणा झाली होती.
"मी दहा मिनिटात येते." गायत्रीने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले.
...एका छोट्याशा लिफ्टपर्यंत तो आला, लिफ्ट वर निघाली...
सरळ रुफटॉपवर.
दरवाजा उघडला. समोरच २० बाय ४० फुटाचा मोठा स्विमिंग पुल होता.
आकाशात चंद्र नव्हता. त्याने त्याचा शर्ट काढला.
...केस विस्कटले, आणि तिथल्याच एका चेयरवर तो पहुडला.
...लिफ्ट खाली जाण्याचा आणि वर येण्याचा आवाज आला.
ती लिफ्टमधून बाहेर आली.
एक पांढरं विंडचिटर, आणि खाली एक व्हाईट टॉवेल.
तो उठून बसला.
"डोन्ट..." अजिबात हालचाल करायची नाही.
तिने विंडचीटर काढलं, टॉवेल काढला...
"...गायत्री..." तो अधीर झाला.
पुढच्याच क्षणी तिने स्विमिंग पुलमध्ये उडी मारली.
...तिच्या लयबध्द शरीराची होणारी हालचाल निरखत होता.
थोड्या वेळाने ती बाहेर आली.
काळ्या बिकिनीमध्ये चंद्रप्रकाशात दवबिंदू चमकावेत तशी तिची नितळ गोरी काया चमकत होती...
...तिचे ओले केस सरळ तिच्या कंबरेपर्यंत येत होते...
तिची नजर त्याच्यावर रोखली गेली...
...पस्तिशीतील गायत्री, पंचविशीला लाजवणाऱ्या सौंदर्याची व्याख्या होती.
'...मी सुंदर आहे मनू, पण मी तुला देखील सुंदर बनवेन, मी पळून जाणार नाही.'
कित्येक वर्षांपूर्वीचे तिचे शब्द त्याला आठवत होते.
ती त्याच्या जवळ आली, ओलीच...
"गायत्री, आय वॉन्ट टू टेल यू समथिंग," तो म्हणाला.
"फ*, डोन्ट स्पॉइल माय मूड." तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले, आणि त्याच्या मांड्यांवर बसली...
...आणि दोघेही ताऱ्यांच्या प्रकाशात आकंठ बुडाले...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users