Submitted by धनि on 27 October, 2024 - 21:00
सध्या माबोवर आणि सगळीकडेच दिवाळीची लगबग सुरू आहे. लोकांना पिटीएसडी देणे, आपल्या पाककौशल्याने जळवणे जोरात आहे. त्यावरून प्रेरणा घेऊन या कवितेचे विडंबन - मूळ कविता : https://www.maayboli.com/node/85886 .
ही कविता कुण्या एका कविताच्या नवर्याने केलेली आहे अशी कल्पना करून वाचा
धान्ये आणि मसाले, भाजून छान झाले
खमंग भाजणी ही, घेते दळून कविता
उंडे तयार झाले, सोर्या भरून झाला
चकल्याही खुसखुशीत, घेते तळून कविता
मेवा न् खोबर्याचे, सजले सुरेख सारण
मऊ पीठ करंज्यांचे, घेते मळून कविता
साजुक तुपावरी या भाजून बेसनाला
मिठ्ठास गोड लाडू, घेते वळून कविता
अलवार पाकळ्यांचे नाजुकसे चिरोटे
पाकात केशरी या, घेते घोळून कविता
घालून फोडणीही झाला तयार चिवडा
दाणे नि खोबरेही, घे मिसळून कविता
झाला फराळ सज्ज, दरवळे हा सुवास
खाण्या न देत मजला, घेते छळून कविता
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यावेळेस दिवाळी पहाट कार्यक्रम
यावेळेस दिवाळी पहाट कार्यक्रम करणार की काय ? Happy>>
धन्यवाद रुपाली, मेधा
धन्यवाद रुपाली, मेधा
कविन नुसती हसतीये
Pages