मातृत्वाचा शृंगाररस

Submitted by अभय आर्वीकर on 19 October, 2024 - 13:52

मातृत्वाचा शृंगाररस

चंदन चांदणं गोंदण ल्याली
नवथर कांती तनू सुकुमार
अर्ध मोकळ्या केसावरती
माळून गजरा चंद्राकार

कुठे निघाली चंचल रमणी
थबकत लचकत हरिणी समान
सरकत शेला सावरलेला
धरत रोखुनी नयन कमान

ठुमकत मुरडत गवळण राधा
जणू विहरत यमुनाकाठ
गोप बघुनी झाकू पाहते
पदराखाली भरला माठ

हिंदोळणाऱ्या पदरासंगे
डुचमळते बेचैन उभार
हृदय-चक्षूंना वेधून घेते
तन्मीलनाची नमनमिनार

अर्ध्या उघड्या पाठीवरती
भुरुभुरू केसांचे नर्तन
नाभी भवती करुनी रिंगण
पिंगा खेळतो द्वाड पवन

गुलाब जाई मोहित होई
रूप गोजिरे पद्मसमान
लपून आडून चोरून बघती
फुलामागुनी पिकले पान

कुणी म्हणाले शेंग चवळीची
कुणी म्हणाले पेवंदी आम
कुणी म्हणाले कामुक मैना
खुदुखुदू हसुनी रमताराम

कुण्या मुलखाची राजपरी ही
कुजबुज करती वल्लीशिवार
जशी घडविली, तशी मढवली
ही रंगीली नटवी नार

तव वदली ती प्रसन्नवदना
हो मी आहे नटवी नार
खळखळ वाहत असतो माझ्या
नसानसातुनी रस शृंगार

विरक्तीला लुब्ध कराया
करीत पीयुषाची पखरण
सजणेधजणे, लटक, मटकणे
प्रीत लालित्याची उधळण

जरी दिसतो तुम्हां दुरुनी
माझ्याठायी हा एकच रस
परी मी आहे सर्व रसांचा
जणू घुसळला अमृतरस

कधी असते मी झाशी, अहिल्या
मीच कालिकेचा अवतार
मी राधिका, मीच मीरेच्या
अद्वैत भक्तीचा एकतार

मीच कैकेयी, मी कौशल्या
मी वनवासी जनकाची लेक
मीच देवकी, मीच यशोदा
माझे स्वरूप, रूप अनेक

मीच भीमाई, मी जीजाऊ
मी क्रांतीची ज्योतमशाल
पंकामध्येही पंकजाची
पालनकर्ती मी मृणाल

आदी माया आदी शक्ती
सचेतनाची मी सृजक
जैवजिवांची उत्पत्ती अन
प्रणयरसाची मी पूजक

स्त्रित्वाची मी अभय स्वामींनी
सजीव सृष्टी माझं बाळ
ब्रह्मांडाला व्यापून उरली
माझ्या मातृत्वाची नाळ

- गंगाधर मुटे 'अभय'
==============
अठरा/दहा/चोवीस

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ऋन्मेऽऽष +११११११

लिहिणारा जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्या डोक्यात काही कल्पना विचार असतो पण लिहून काढताना प्रत्यक्षात डोकेतील विचार जसाच्या तसा व्यक्त करू शकतील अशा शब्दात उतरला की नाही हे फार महत्त्वाचे असते. बहुतांश वेळा लिहिणाऱ्याच्या डोक्यात एक असते आणि शब्दात जे उत्तर ते बरेचसे भिन्न असते.
म्हणून लिहिलेला लेख किंवा कविता वाचकांनी वाचल्यानंतर त्यांच्यापर्यंत अर्थ कसा पोचतो याचा पडताळा घेण्यासाठी वाचकाकडूनच जाणून घेणे लेखक कवीसाठी महत्त्वाचे असते.
लेखकांनी किंवा कवींनी जी लिहिले ते वाचून वाचकाला अर्थ उलगडत नसेल आणि वाचक लेखक किंवा कवीला अर्थ विचारत असेल तर त्याचा सरळ सरळ अर्थ कवीला जे म्हणायचे होते ते शब्दात उतरलेले नाही असा होतो.
म्हणून आधी पण मी लिहिले आहे की एकदा कविता प्रकाशित झाली की काय बोलायचे ते कविताच बोलली पाहिजे, कवीने कवितेबद्दल बोलणे उचित ठरत नाही.

कवितेला ५० पेक्ष जास्त प्रतिसाद!
रसिक वाचक कवितेवर चर्चा करताहेत आणि कविराज ही नम्रपणे त्यांचे शंका निरसन करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दृष्य विरळाच. कवीने कवितेचा अर्थ सांगू नये. कवितेची जितकी जास्त रुपे समोर येतील तितकी ती कविता यशस्वी म्हणावी.

शुभ प्रभात. महिलांना कृपया सन्मानानेसंबोधित करावि ही विनं ती. रुनम्या सांग की तेला बाईं चे क रतुत्व. नुसता मिनारा वर बसुन टुकून बघत आहे.

नमन मी मीनार मे स्टाण्ड्स फॉर मेल वीनर. जो बारका असला तरी पोर प्रप्थ करु घेण्यास उगीचच त्याचे कौतूक करावे लागते. हाच तो मीनार . नो बिग डील. आता आय व्ही एफ मुळे ह्हे जरा आटॉक्यात आले असाव. मीच तुझ्या जीवनाचा शिल्प कार हे आपल्याहून सुपिरिअर श्त्री ला सांग्नॅ मस्ट असले नर पुंगव खूप दिस्तत. अजून फु लवा दा ढी. अमित चे प्र तिसाद ब रो बर.

प्रणय ही पुरुषांची गरज आहे आणि ती पूर्ण करायचे स्त्री एक साधन आहे असा विचार केल्यास त्यात स्त्रियांचा सन्मान नाही म्हणता येईल..
प्रणय ही स्त्री पुरुष दोघांची गरज आहे या विचारात निसर्गाचा सन्मान आहे.

तुझ्या गळा माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा!!

किंवा,
अहो रुपम अहो ध्वनी!

एखादी सुंदर स्त्री रस्त्यावरुन जाताना चारचौघांनी वखवखल्या नजरांनी बघावं आणि त्या स्त्रीने "तुला आई-बहीण नाहीत का रे?" असं विचारावं... ह्या पलीकडे ह्या कवितेत काही आहे का?

@उपाशी बोका
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.
(प्रतिसाद उपरोधिक नसेलच. पण असेल तरीही)

@वीरु
<<< कवीने कवितेचा अर्थ सांगू नये. कवितेची जितकी जास्त रुपे समोर येतील तितकी ती कविता यशस्वी म्हणावी.>>>

अगदी तंतोतंत! आभार

@अश्विनीमामी,
तुम्हाला कविता कळली पण कवितेवरील प्रतिसाद मात्र मला कळला नाही. बहुदा कवितेला पॉझिटिव्ह असावा असे वाटते.

महिलांना कृपया सन्मानानेसंबोधित करावि... हे कुणाला उद्देशून आहे हे सुद्धा कळलेले नाही. बहुतेक कवितेला उद्देशून नसावे असे वाटते.
असो.
एका तपानंतर आपण प्रतिसाद दिलात याचा आनंद आहे. आभार आणि धन्यवाद.

@ऋन्मेऽऽष,
हा मुद्दा कवितेमध्ये वेगळ्या तऱ्हेने आलेला आहे असे मला वाटते.

प्रणय ही पुरुषांची गरज आहे की स्त्रीची गरज आहे की दोघांची गरज आहे... मला वाटतं उथळ विचार आहे. कारण आपण काय विचार करतो यापेक्षा याविषयी निसर्गाने काय विचार केलेला आहे आणि त्यावर उपाय शोधला आहे हे महत्त्वाचे ठरावे.

कवितेचा एक पैलू असाही आहे की, शृंगार हा मातृत्वाचा अविभाज्य भाग आहे. अगदी प्राणी, पशुपक्षी, किडे माकोडे, झाडे झुडपे, वेली वल्ली.... यांचा जरी विचार केला तरी जिथे मातृत्व आहे तिथे नैसर्गिक शृंगार आहे.

नैसर्गिक विचार केला तर लक्ष वेधून घेण्यासाठीच आणि आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीच शृगाराचे प्रयोजन आहे असे वाटते. (इथे शृंगार हा शब्द व्यापक अतिव्यापक अर्थाने घ्यावा)
फुले देखणी का असतात? फळे गोंडस असतात? झाड डोलदार का असते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण शोधायला गेलो की आपण शेवटी शृंगार आणि मातृत्व यावर जाऊन पोहोचतो.

रस्त्याच्या कडेला 25 माणसांचा घोळका उभा असेल तर लांबून पाहणाऱ्याला त्या घोळक्यात फार काही सौंदर्य दिसत नाही.
पण रस्त्याच्या कडेला 25 महिलांचा घोळका उभा असेल तर फार लांबून बघितले तरी तो घोळका सौंदर्यपूर्ण वाटतो.

असे का घडते? याचे उत्तर शोधत शोधत मी मातृत्व पर्यंत पोचलेलो आहे. भविष्यात कुणी सध्या मी जसा विचार करतोय त्यापेक्षा आणखी चांगला विचार सांगितला तर माझे विचार बदलू शकतील.

>>> म्हणून आधी पण मी लिहिले आहे की एकदा कविता प्रकाशित झाली की काय बोलायचे ते कविताच बोलली पाहिजे, कवीने कवितेबद्दल बोलणे उचित ठरत नाही

And yet, here we are!

@युवी२०१५
<<<<<< एखादी सुंदर स्त्री रस्त्यावरुन जाताना चारचौघांनी वखवखल्या नजरांनी बघावं आणि त्या स्त्रीने "तुला आई-बहीण नाहीत का रे?" असं विचारावं... ह्या पलीकडे ह्या कवितेत काही आहे का? >>>>>>

इतकं तरी ह्या कवितेत आहे का? मला तर नाही दिसलं.

@AI प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.

@स्वाती_आंबोळे
>>>>And yet, here we are!<<<

मी अजून मेलेलो नाही त्यामुळे yet here हांये Happy Lol

@रुन्मेष: माझी कविता मी आधी माझ्याच शृंगारिक चारोळ्या धाग्याच्या प्रतिक्रियेत लिहिली होती, पण टेक्निकल फरक असल्याने वेगळा धागा काढला..

बाकी तुम्ही चालू द्या

अहो ते मी सहज म्हटले.
आजवर जगात सर्वाधिक साहित्य शृंगारावरच प्रसवले गेले असेल. तुम्हा दोघांच्या आधीही करोडो लोकांनी लिहिले आहे आणि नंतरही कैक लेखक आपला हात आजमावतील. ते तर मायबोली अचानक कुछ कुछ होता है मधील अंजलीसारखी बदलली म्हणून सहज म्हटले.

अध्यक्ष महोदय, एखाद्या गोष्टीच्या शेंड्या-बुडख्याची अजिबात टोटल न लागणे, संभ्रमाच्या वादळात मेंदूतल्या चेतापेशी उलट्या पालट्या होऊन हेलकावे खायला लागणे, अशा अवस्थेसाठी "नमनमिनार" ह्या शब्दाची मराठी शब्दकोषात भर घालण्यात यावी ही नम्र विनंती.
उदाहरणार्थ: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत कुठल्या पक्षाला मत द्यायचे असा नमनमिनार मतदारांच्या मनात उभा राहिला आहे.
निवेदन संपले. धन्यवाद.

@अजबराव, छान अर्थ उलगडला. Lol त्यामुळे आपण उघड केलेल्या आपल्या नमनमिनाराला माझे नमन आहे. Happy

हृदय-चक्षूंना वेधून घेते
तन्मीलनाची नमनमिनार >> कुणाचे हृदय चक्षू. मिनाराचा अर्थ बदलतो. Happy

रस्त्याच्या कडेला 25 माणसांचा घोळका उभा असेल तर लांबून पाहणाऱ्याला त्या घोळक्यात फार काही सौंदर्य दिसत नाही.>> मातृदेवतेला विचारा. Happy

@विक्रमसिंह
मातृत्व सौंदर्यवान की पितृत्व सौंदर्यवान... तुमच्या मते याचे उत्तर पितृत्व असेल तर त्यावर कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. ते तुमचे मत आहे.

(मातृत्व आणि पितृत्व याला पर्यायी स्त्री आणि पुरुष असे मी शब्द वापरले नाहीत कारण हे शब्द फक्त मानवासाठी वापरले जातात. कवितेचा मध्यबिंदू एकंदरीत सजीव सृष्टी व त्यातील मातृत्व असा आहे. मेल फिमेल असा शब्द मी वापरू शकत नाही कारण हे दोन्ही शब्द वापरल्यास फार वेगळ्या अर्थाने घेतले जाण्याची शक्यता आहे. म्हणून मातृत्व आणि पितृत्व असे सन्माननीय शब्द वापरले आहेत.)

'न मन मी नार' असा अर्थ लावता येतोय का तेही बघा. काही बाकी रहायला नको.

Chatgpt नं हा नवा शब्द अंगीकारला आणि कविता केली बघा.

नमनमिनार, तुझ्या गजरात,
भव्यतेचा आवाज, येतो शिखरात.
शांततेचा स्पंदन, हृदयात जागतो,
इतिहासाच्या गूढतेत, मन तुझ्यात भासतो.

तू उंच शिखर, आकाशाशी झुंजत,
आठवणींचा संग, साठवताना हळूच.
काळाच्या पल्याड, तू दिलास जिव्हाळा,
संकटाच्या क्षणी, दिलास आधाराला.

दिवस उजळा, रात्रीचा शांती,
तू आहेस जिवंत, परंपरेची कांति.
नमनमिनार, तुज पाहता,
एक अद्भुत कथा, तुझ्यात लपली सदा.

प्रेमाचा गजर, तुझ्या शिखरात,
उत्सवाच्या क्षणी, तुज देतो नमनात.
संगीतात तुज, कवींच्या गाण्यात,
नमनमिनार, तुझा अभिमान, माझ्या भावना भासात.

@मामी, नमस्कार
कवितेच्या निमित्ताने भेट / संवाद झाला. Happy

Pages