कशाला?

Submitted by स्वरुप on 9 October, 2024 - 02:10

भरजरी दिसाया कात्री खिशाला
असे सोहळे का करावे कशाला?
ख्याती कधीचीच गेली लयाला
अश्या या अवेळी उरावे कशाला?
लबाडी जो तो करी जिंकायाला
खुशीने उगा मी हरावे कशाला?
पिऊनि अमृता अमर कैक झाले
विषारी दंश मी पत्करावे कशाला?
गोडीत ज्यांनी जिव्हारी वार केले
त्यांनाच देऊ अता पुरावे कशाला?
अंधारात ज्यांनी ढकलले तळाला
उजेडात त्यांनी सावरावे कशाला?
मांडता मांडता कुणी डाव साधला
असे पसारे मी आवरावे कशाला?
असे प्रश्न सारे अन अशी उत्तरे ही
घोकलेले कधीचे स्मरावे कशाला?
नकोच घ्याया दिवास्वप्ने उशाला
नशिबात नाही ते वरावे कशाला?

स्वरुप कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझलेचे व्याकरण फारसे कळत नाही पण त्या फॉर्मच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे Happy
या फॉर्ममध्ये लिहण्याचा तसा पहिलाच प्रयत्न आहे.... चूकभूल द्यावी घ्यावी....... त्यामुळे गझल विभागात पोस्ट करण्याचे धाडस करत नाही!!
जाणकारांच्या सूचना/मार्गदर्शनाचे स्वागत आहे Happy