Submitted by दीपांजली on 8 October, 2024 - 02:01

मराठी बिगबॉस वर चर्चा ही सुरु झाली म्हणून कन्टिन्यु करण्या साठी हा धागा !
यावेळी बरेच काँट्रोव्हर्शिअल लोकं आहेत , पॉलिटिकल डिस्कशन्स करायला पूर्वी मनाई होती, यावेळी खुल-ए-आम डिस्कस करत आहेत !
Btw यावेळी बिबीच्या अंगणात गाढव आणून बांधलय ते ऑडियन्सचे प्रतीक का 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी अजिबातच हा सिझन बघितला
मी अजिबातच हा सिझन बघितला नाहीये, शॉर्टसही नाही बघितले, पुढेही बघणार नाहीये, वाचेन इथेच पण गौरव खन्ना आवडतो, तो आणि यामी गौतमी एका हिंदी सिरीयलमधे होते फार पूर्वी, दोघेही आवडायचे. मलाही गौरव खन्ना जिंकला तर आवडेल. मास्टर शेफ काही सीन्स बघितलेले पण अगदीच क्वचित.
प्रणित मोरेला ओळखत नव्हते, इथेच नाव समजलं. कुनिका माहीतेय. मोरे इथपर्यंत आला म्हणजे मोरेचे काही युट्युब व्हिडीओज बघायला लागतील. काम बघायला लागेल त्याचं.
फरहाना जिंकेल
फरहाना जिंकेल
भांडाभांडी नव्हती ? फरहाना -
भांडाभांडी नव्हती ? फरहाना - नेहल या सुन्दर्यांना मिस केले वाटते
गौरव खन्ना मला इमेज कॉन्शस/ फेक वाटतो, आत्ता प्रेस कॉन्फरन्सला ‘मला मुलं हवी होती, पण बायकोला नको आहेत, म्हणून मी त्याग करायला तयार आहे वाल्या सिम्पथी मोनोलॉग्॑ला तर धडधडीत अॅक्टिंग करत होता , टाळ्याही मिळाल्याच त्याला.
मोरेने काही केले नाही कसे ? अन्डरडॉग आहे या सिझनचा, भर्॑पूर व्होकल होता आणि टु द पॉइन्ट.
अमाल, बसीर, फरहाना सगळ्या लाउड लोकांना भांडणांमधे गप्प केले आहे त्यानी त् बोल्॑ण्याच्या स्किल्स मुळे !
पॉझिटिव गृप मधे डिफरन्सेस होते तेंव्हा गौरव -मृदुल आणि अभिषेक -अशनूरला जोडणारा तोच एक्॑मेव दुवा होता त्यामुळे बरेच दिवस एकजूट होती त्यांच्यात !
त्याचा सेन्स ऑफ ह्युमर , प्रेझेन्स ऑफ माइन्ड आणि दर आठवड्य॑चा 'द प्रणीत मोरे शो ', तर या सिझनचा हाय्॑लाइट आहे.
मला प्रणीत -जीके किंवा प्रणीत - फरहाना आवडतील टॉप २ मधे .
शक्यता मात्रं जीके- फरहाना जास्तं वाटतेय !
मधले आठवडे मिस केलेच. ती
मधले आठवडे मिस केलेच. ती ब्युटी क्वीन हाडे दिसणारी बाई डोक्यात जायची... ती नेहल का? ती गेली पण ना लवकर. ती भोजपुरी चांगली होती पूजा पायल काजल टाईप नाव होतं काही. पण ती फारच निरागस होती. टिकणे शक्यच न्हवते.
डीजे प्रणित चांगला खेळला असेल
डीजे प्रणित चांगला खेळला असेल तर तो जिंकायला हवा, आवडेल मला जरी मी ओळखत नसले तरीही, मराठी हा angle आहेच.
भोजपुरी नीलम, टिकली कि ती
हो, मिस इन्डिया नेहल !
भोजपुरी नीलम, टिकली कि ती बरेच दिवस, आत्ता आत्ता अभिषेक बरोबर गेली ती डबल एव्हिक्शन मधे !
ऑफिशिअल मेड होती ती निगेटिव गृपची.. स्वयंपाक चांगला करायची, वेळी अवेळी तिच्या मित्रमंडळींना खायला देणे, चहाच्या अनेक राउंड्स, मसाज देणे वगैरे पडेल ती कामे करणे या स्ट्रॅटेजीने टिकली.
‘नीलम बचाओ‘ आन्दोलन तिचा अख्खा गृप करायचा, नॉमिनेशन मधे येऊच द्यायचे नाहीत तिला !
बिबॉ यावरून टोमणे मारायचे त्या गृपला !
काही आठवडे नाही, काही दिवस ना
काही आठवडे नाही, काही दिवस ना? >>>दिवस लिहायचे होते झोपेत चुकून लिहिले.हो संडे ला फिनाले आहे.
युट्युब क्लिप्स वरच्या कॉमेंट्स वरून आता लक्षात आलं की फरहाना ला खूप सपोर्ट आहे मुलींकडून स्पेशली मुस्लिम कम्युनिटी कडून (ऑबीयसली).पण ती विनर होण्याच्या लायक नाही.फरहाना स्ट्रॉंग आहे पण तितकीच उद्धट आहे.उलट सलमान तिला हिंट देऊन कितीदा तरी सुचवत होता क्यू व्हीलनी ,व्हॅम्प बनना चाहती हो.सोशलमीडियामध्ये गौरवला मिडिया सपोर्ट आहे आणि फराहाना ला मुद्दाम ट्रोल केलंय ,पेड मीडिया असे आरोप फरहाना फॅन्स म्हणतायत . पण मिडियाचं काम आहे प्रश्न विचारणे .रिपोर्टर्स मीडिया जरी इमेज बनवू बिघडवू शकते परंतु मेन इमेज तर गेम मधूनच दिसते घरात तुम्ही काय करताय कसे वागताय ते लोकांना दिसतंच.
फरहाना पेक्षा तिची आई जाम आवडली उलट तीच गौरव खन्ना ची फॅन आहे जाम फिदा दिसली गौरववर .
गौरव मला फेक वाटत नाही उलट तो रडला नसता तर लोकं बोलली असती किती insensitive आहे .असू शकतात या बाबतीत लोकं इमोशनल .इथे तर तो प्रामाणिकपणे म्हणतोय मला मुलं हवी होती बायकोला सध्या नकोत तो तिला याबाबतीत सपोर्ट करतोय ,ही उलट चांगली गोष्ट आहे . हा त्यांचा मिळून घेतलेला डिसीजन आहे .नको असू शकतात काहींना मुलं तो त्यांचा डिसीजन ,चॉइस .सेलिब्रिटींनाही पर्सनल लाईफ असते. एका मर्यादेपर्यंत तेही सहन करत असावेत .
लोकांना जज करायला काय जातंय ते तर इतक्या वेळा सांगूनही प्रिया बापट आणि दोन्ही अमृता यांना तेच तेच मुलांविषयी प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारतातच. त्यांना कमेंट मध्ये लोकं ट्रोल करतातच तेही अतिशय वाईट भाषेत.मूल असावं की नसावं तो त्यांचा(कुणाचाही) पर्सनल प्रश्न आहे .काहींना नको असू शकतात मुलं म्हणून ते insensetive थोडीच असतात.
मी सुद्धा बघतेय आजकाल. मी
मी सुद्धा बघतेय आजकाल. मी प्रणित चे शोज आधीपासुन बघायचे त्यामुळे तो आवडतो. त्याला भरपुर एक्स्पोजर मिळाले बीबीमुळे. मला सुद्धा तो जिंकावा असे वाटते. पण चॅनेल जिके ला जिंकवेल असे वाटते. प्रणितला वोट देता येते का बघते मी. जिकेच्या सावलीतुन त्याने बाहेर यावे असे वाटते.
तान्या थापाडी वाटते.
मला नाही वाटत प्रणीत जीकेच्या
मला नाही वाटत प्रणीत जीकेच्या सावलीत खेळतो , बरेचदा वादही होतात त्यांचे, प्रणीत त्याच्या बॅकफुट नेचरवर टिकाही करतो कायम .
आजचा एपिसोड चांगला होता, सगळ्यांचे लाइफ ग्राफ्स !
प्रणीतचा लाइफ स्ट्रगल आणि नंतर मिळालेले सक्सेस हिरो सारखे वाटले !
साध्या बस कन्डकटरचा मुलगा , लोअर मिड्ल क्लास चाळीतले बालपण, घरच्या टिफिन सरव्हिसचे काम म्हणून शाळा सुटल्यावर डबा डिलिव्हरीला जाणे ते शिक्षण घेऊन कार सेल्समन, एम बी ए, रेडिओ जॉकी, स्टँडप, युट्युब चॅनल, स्वतःचे घर घेणे इ. भारी ग्राफ आहे !
त्याचे हिन्दीही किती फ्लुएन्ट आहे, कुठेही मराठी अॅक्सेन्ट नाही, म्हणजे एकदम बोलीभाषेतले हिन्दी आहे !
अमाल आणि फरहानाची लाइफ स्टोरीही इंटरेस्टिंग होती !
किती बदलत जातात इक्वेशन्स १०० दिवसात.. प्रणीत आणि अमालचे खूप वाद झाले पूर्ण सिझन , अमालने सर्वात जास्ती रेसिस्ट रिमार्क्स केले प्रणीतवर, सतत टिका, सतत नॉमिनेट केले त्याला, दर वेळी म्हणायचा कि यावेळी प्रणीत (जाझु) जाणार , मग हळुहळु समजत गेले अमालला प्रणीतचे फॅन फॉलॉइंग ! अकरा वेळा नॉमिनेट होऊन टिकून राहिला प्रणीत , अमालचे मात्रं सगळे मित्रं प्रणीत बरोबर नॉमिनेट असताना एक एक करून एलिमिनेट झाले !
आज बिबॉने शेवटची असेम्ब्ली बैठक घेऊन प्रत्येकाला पॉसिबल विनर विचारले तेंव्हा अमालने चक्क प्रणीतचे नाव घेतले आणि त्याच्या जर्नीचे कौतुकही केले ! दॅट्स बिगबॉस !
प्रणीतचा लाइफ स्ट्रगल आणि
प्रणीतचा लाइफ स्ट्रगल आणि नंतर मिळालेले सक्सेस हिरो सारखे वाटले >>> अरे वा बघायला हवं, जर्नी बघेन. असं असेल तर हाच जिंकेल. मी आत्ता काही शॉर्टस बघतेय याचे. सलमानवर टीका केलेली ते रील बघितलं.
गौरव पहिल्या दिवसापासून
गौरव पहिल्या दिवसापासून नावडता झाला तो त्याच्या जाड , हाय पिच आवाजामुळे. त्याने कधी वादावादी केलीच तर आवाज मोठा करून तीच तीच वाक्ये पुन्हा पुन्हा बोलणे किंवा समोरच्याला उपरोधाने दुजोरा देणे एवढेच केले. परवा तान्याशी ड्युटी वरून झालेल्या वादावादीत हे पुन्हा दिसलं. त्याने सुरुवातच भसड नको असं म्हणून तिला चिथावून केली. सहा जण असताना अशी कॅप्टनशिप. मग जास्त लोक असताना कसं मॅनेज केलं असतं त्याने ?
हा फिजिकल टास्क्सपासून दूर राहतो हे उघड झाल्यावर तसे टास्क बंदच झाले, असं ट्विटरवर बोललं गेलं.
ओपन माइकमध्ये त्याच्यावर केलेला हा कधी डायरेक्ट फ्लाइट घेत नाही , नेहमी कनेक्टिंग फ्लाइट घेतो हा त्याच्यावरचा जोक चपखल होता.
तो सेलेब्रिटी मास्टरशेफ जिंकला होता, तरी कुकिंगपासून दूर राहिला.
परवा तिन्ही मुलींनी त्याला mean म्हटलं हेही पटलं. रेशन सरेंडर करून आणि सगळ्यांना नॉमिनेट करून कॅप्टनसी मिळवावी लागली याचं त्याला वाईट वाटलं नाही. तान्याला प्रेस कॉन्फरन्समध्ये ऑफेन्सिव्ह कमेंट्स मिळाल्या. यावरून त्याने तिला छेडले, की हे लोक तर खूप प्रेमाने बोलत होते. मला तर पत्रकारांनाही पढवून पाठवल्यासारखे वाटले.
सगळ्या कलाकार मंडळींना त्यांच्या लबाड मित्रांमुळेच आर्थिक नुकसान होतं. त्यांचे पैसे बुडतात, पार कफल्लक होतात वर्षानुवर्षे चालत आलेलं अजून तसंच आहे?
प्रणितची लाइफ जर्नी आवडली. पण तो काही आवडत नाही. वाक्चातुर्य , समोरच्याला शब्दांत पकडणे, मुद्दे भरकटवणे हे त्याचे कौशल्य. त्यात लॉजिक मला तरी दिसत नाही. शिवाय वाक्यावाक्यात अपमान करणे म्हणजे विनोद असे त्याने ठरवले आहे. मालती त्याच्या का जवळ आली ते मला कळलं नाही. कदाचित तो एकटाच शांतपणे बोलतो हे कारण असेल. तिला त्याच्याकडून लाथ बसली ती सिंबॉलिकही होती.
अभिषेक ऐवजी अशनूरला वाचवताना त्याने सांगितलेलं व्हॅल्युज हे कारण ऐकून फार हसू आलं. स्विमिंग पूल प्रकरणात व्हॅल्युज कुठे होत्या?
गौरवचा ग्रुप मला पॉझिटिव्ह वाटत नाही. आधी हा ग्रुप गावात सोडलेल्या वळूसारख्या अभिषेकभोवती फिरत होता. नगमा, आवेश, अशनूर दिसतच नव्हते. गौरव अभिषेकच्या मागे लपून खेळत होता. त्याने या ग्रुपमधल्या लोकांना वापरलं. यांचा ग्रुप आपल्या चुका मान्य करीत नाही, हे अनेकदा दिसले. तान्या आणि कुनिकाही हेच करत आल्या. कुनिका तिलाही नकळत तर तान्या ठरवून.
दुसरा ग्रुप विस्कळीत होता. त्यांचे आपापसात सब ग्रुप्स बनत राहायचे. गौरवच्या ग्रुपसारखे ते कोणाची चूक झाली तरी ठामपणे पाठीशी उभे राहत नसत. त्यात थापाडी तान्या, नसलेल्या सुद्धा राईचा पर्वत करणारी नेहल आणि फरहाना यांना त्यांनी जवळ केलं. पुढे त्यात जोकर शहबाजची भर पडली. अन्यथा बसीर, अमाल आणि झीशान मला एकेकटे प्लेअर म्हणून चांगले वाटले. बसीर आणखी टिकता तर मजा आली असती.
फरहानाची जर्नी बघून बिबॉने
फरहानाची जर्नी बघून बिबॉने तिला विनर ठरवून टाकलय असे दिसतय, कित्ती मन लाऊन कित्ती एक्सायटिंग बनवली होती, खूप अप्स अॅन्ड डाउन्स , एक्स्ट्रिम इमोशन्स , डॉयलॉगबाजी केलीच होती तिने , निगेटिव असली तरी १०० % बिबॉ मटेरिअल !
जर्नी मधे मात्रं तिला व्हिलन कमी वेळ आणि हिरॉइनच जास्तं वेळ दाखवले !
किती स्तुतिसुमने, शेर - ओ -शायरी केली स्वतः बिबॉची तिच्यासाठी. गाणी पण “मै हिरॉइन हूं‘, ‘हंगामा होगया‘ सारखी ! वर धुरन्धरचे बॅकग्राउन्ड म्युझिक !
तसेही फिमेल विनर झाली नाही गेले ४ वर्षं आणि तिचा पी आर स्वतः एन्डेमॉल शाइनचा डिरेक्टर जो एक्स बॉफ्रे आहे, सर्वेश सिंग.
फक्तं तिला जिंकलेले बघून इथून पुढे बर्याच कॉन्टेस्टन्ट्स तोडफोड , भांडाभांडी अजुनच जोमाने करतील नक्की !
कालचा एपिसोड मध्ये सगळ्यांची
कालचा एपिसोड मध्ये सगळ्यांची Journey चांगली दाखवली .पण सर्वात भारी प्रणित ची होती.गौरव आवडतो पण प्रणित विनर होणार म्हणजे व्हावा असं वाटतंय journey बघून.प्रत्येक सीजन मध्ये एक चांगला ग्रुप बनतो यावेळी तो गौरव आणि कंपनी चा होता. बाकी त्यांच्या फ्रेंडशिपची journey मस्त होती.बाकी विनर कोण होणार हे दोन तासात कळेलच. फिनाले स्टार्ट झालाय.
तान्या जिंकली. सोशल मीडियावर
तान्या जिंकली. सोशल मीडियावर न्यूज़ येते.
बोकलत
बोकलत

ट्रॉफी गोज टू गौरव खन्ना
अभिनंदन गौरवचं.
अभिनंदन गौरवचं.
प्रणित कितवा आला.
प्रणित तिसरा आला . फरहाना
प्रणित तिसरा आला . फरहाना सेकंड .पण सलमान म्हणाला देखील वोटिंग कट टू कट होते दुसऱ्या आणि तिसऱ्या रनर अप साठी.
मस्त, तिसरा आला, वोटिंग
मस्त, तिसरा आला, वोटिंग चांगलं होतं हे बरं झालं. थँक्स सिमरन.
प्रणीत दुसराच होता टेक्निकली
प्रणीत दुसराच होता टेक्निकली पण टॉप २ मधे एक हिरो एक व्हिलन दाखवायचे होते बिबॉला म्हणून फरहानाला आणले !
त्यात गौरवने डॉयलॉगबाजीही केली होती फरहानाशी भांडताना “हूं मै टिव्ही का सुपरस्टार, तू पहचानी जाएगी कि मेरे सिझनमे आयी थी, ट्रॉफी भी मै जीतूंगा, तू खडे रहके तालीया बजाएगी “
मग बिबॉने संधी साधलीच !
तसेही फरहानाला पहिल्याच दिवशी हाउसमेट्स व्होट्सने बाहेर काढले होते आणि सिक्रेटरुममधे टाकले .
गौरव खन्नाला पॉवर मिळायमुळे त्यानेच तिला परत आणले शो मधे.. नंतर फरहानाने अख्खा सिझन व्हिलन म्हणून राडा करत गाजवला आणि गौरव खन्ना सकट सगळ्यांना तिच्या परत येण्याचा त्रास झाला.
आज फिनालेला तिला हरवून ट्रॉफी घेतली एकदाची, पोएटिक जस्टिस !
गौरव म्हणलाही ट्रॉफी घेताना, फरहाना, तालीया बजा !
https://youtube.com/shorts/jofMlUOzdvg?si=HiyhSt0aOhHJRK1F
गौरवचे अभिनंदन. त्याची ओळख
गौरवचे अभिनंदन. त्याची ओळख सुपरस्टार अशीच करून दिली. बिग बॉसमध्ये यायच्या आधी जे कमावलं ते इथे टिकवून ठेवलं आणि त्यावरच जिंकला. थोडा दिखो पर ठीक दिखो असं काहीतरी म्हणायचा ना!
ट्विटरवर कोणीतरी लिहिलंय की इतर कोणाच्या , अगदी प्रणीतच्याही एव्ही मध्ये गौरव फारसा दिसला नाही.
तो जिंकला ते बरं झालं. प्रत्येक वेळी कॅप्टनसी न मिळाल्यावर आणि एकदा त्या च्याकडून काढून शाहबाजला दिल्यावर त्याच्या रिअॅक्शन्स पाहता फायनलिस्ट होऊन जिंकला नसता तर फार वाईट दिसला असता.
यावेळी कोणाला बॅग ऑफर केली नाही. तसंच विनर सोडला तर बाकीचे रँक्स सरप्राइजिंग होते.
प्रणीतची लाइफ जर्नी आवडली. त्याची एव्ही पाहताना त्याला बरंच टारगेट केलं गेलं होतं हे पुन्हा आठवलं.
एव्ही ही एखाद्या फिल्म सारखी बनवतात असं वाटलं. म्हणजे नक्की कसं प्रोजेक्ट करायचं हे ठरवून तसे शॉट्स निवडतात. प्रणीत अंडरडॉग. अमाल सुधरलेला व्हिलन. तान्या misunderstood. इतर दोघांच्या मी पळवत पाहिल्या.
प्रणित मोरे पुन्हा चर्चेत
प्रणित मोरे पुन्हा चर्चेत आहे. त्याच्या शोमध्ये ऑडियन्समधल्या एका तरुणाने त्याच्या डेटचा अनुभव सांगितला. म्हणजे मोरेने त्याच्याकडून काढून घेतला. ३७० रुपयांची बिर्याणी खिलवली आणि मग ते पैसे कसे "वसूल" केले, त्याचं ग्राफिक वर्णन. मोरे अर्थातच ते एंजॉय करत होता, आणि ऑडियन्सला त्यातले बारकावे दाखवत होता.
हे मोरेने आपल्या इन्स्टा ग्राम वर अपलोड केलं. मग लोक चिड ल्यावर माझं जजमेंट चुकलं म्हणून माफी मागून डिलीट केलं.
त्या तरुणाला आपली नोकरी गमवावी लागली.
मी याला फक्त बिग बॉसमध्येच पाहिलं होतं आणि इथेही कधी आवडला नाही, रादर कायम नावडताच राहिला, याचं बरं वाटतंय.
पाच सहा महिन्यांनी त्यानेही स्टिल अलाइव्ह टाइप शो करावा. त्याला खांद्यावर नाचवायला लोक तयार असतील.
Pages