मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला!

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 October, 2024 - 12:25

केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी या भाषांना आज अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे.
याआधी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत आणि उडिया या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता.

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीचे निकष -

1) भाषेचे साहित्य हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.
2) भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने होणारे फायदे -

1) अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
3) अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

थोडक्यात सांगायचे झाल्यास मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरसुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठी भाषेचा अभिमान असलेल्या प्रत्येकाला ही बातमी आणि या घटनेचे महत्त्व समजायला हवे असे वाटल्याने वरील माहिती गुगल करून शोधली आहे.

सर्वांचेच अभिनंदन Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरामात लिहा.
मराठी भाषा गेली दोन हजार वर्षे तुमच्यासाठी थांबली आहे. अजून दोन चार दिवसांनी फरक पडणार नाही.

मराठी भाषा गेली दोन हजार वर्षे तुमच्यासाठी थांबली आहे. अजून दोन चार दिवसांनी फरक पडणार नाही. << Biggrin

केकू Lol

कपिल शर्मासारखं, त्या मराठी भाषेलाच इथं बोलावून विचारलं पाहिजे- 'राज्यभाषा होशील, महान भाषा होशील, अभिजात भाषा होशील असा विचार केला असशील नक्कीच. पण हा माणूस तुझ्यावर धागा काढेल असं तुला कधी वाटलं होतं का?' Proud

केशव कूल आणि साजिरा Lol

इथले प्रतिसाद मी टाईम मॅनेजमेंट करून देतो. यावर मी वेगळ्या धागा काढतो लवकरच...

वॉशरूम मध्ये बसलेले असताना, ट्रेनच्या दारावर लटकले असताना, रस्त्याने चालताना पण रस्ता क्रॉस न करताना, डाव्या हाताने जेवताना, दुपारी जेवल्यावर फेरफटका मारायला जाताना, झोपण्याआधी अलार्म लावताना... छोटे छोटे प्रतिसाद जमून जातात. व्हॉईस टायपिंगने काम खूप सोपे केले आहे.
पण लेख लिहायला सलग वेळ हवा. तो वीकेंडला मिळेल.

माबोवर ऋन्मेशला भरीला घालून धागा काढायला लावत आहेत, आणि तो धागा का काढता आला नाही याची कारणे देत तारिख पे तारिख करतोय. मुमकिनावताराने अच्छे दिन देऊनही का कुर्‍हाडीवर पाय मारुन घेताय मित्रांनो? Proud

<रविवार राखून ठेवला आहे
पुरेल>
सर , मराठी भाषा तुमचे हे उपकार जगाच्या अंतापर्यंत विसरणार नाही.

छावाचा रिव्हुव नाही लिहिणार का सर?

माबोवर ऋन्मेशला भरीला घालून धागा काढायला लावत आहेत, आणि तो धागा का काढता आला नाही याची कारणे देत तारिख पे तारिख करतोय.
>>>>

आपली मुले रोज दिवसभर घरात डोके खातात..
पण जेव्हा ती नसतात तेव्हा घर खायला उठते..
असेच नाते आहे हे
म्हणून मी मायबोलीला माझे मायबाप समजतो

<<.सोमवारी माझे दोन धागे येतील.
एक मराठी एक छावा>>

------- ही चर्चा मराठी धाग्यावरच आहे ना?

मराठी धागा आधीच आहे. आता गरज आहे- वाचकांना तुमच्या बहुमोल मार्गदर्शनची.

छावासाठी एकच धागा आहे मायबोलीवर हे दुर्दैव..
सैराट वेळी किमान दहा धागे निघाले होते.. इतक्या जणांनी परीक्षण लिहिले होते.
असो, हि चर्चा आता त्या त्या दोन धाग्यावर पुढे नेऊ.. सर्वांचा विकांत सुखाचा जाओ.

सर, रविवारी भारत पाक सामना आहे. तुम्हांला त्याची तयारी करायची आहे.
तुम्ही त्यासाठी वेगळा धागा काढा आणि तिथे धावते समालोचन, तुमच्या विशेष टिप्पण्या आणि भाकिते लिहा. छावा आणि मराठी भाषेपेक्षा हे जास्त महत्त्वाचे आहे.

परफॉर्मंस अँक्झायटी वर वेगळ्या धाग्यावर चर्चा करा. Happy
ऋन्मेSSष तुमचा अभ्यास झाल्यावर ( परफॉर्मंस अँक्झायटी ) धागा काढाच म्हणजे अभ्यास करण्याच्या टप्प्यातून जातांनाचे तुमचे अनुभव इतरां साठी मार्गदर्शक ठरतील.

सर, छावा साठी वेगळा धागा काढताय ना? कितीचा खेळ, कोणतं चित्रपटगृह, कितवी रांग ही माहिती दिली तर तुमचे चाहते तुमच्या सोबत स्वछायाचित्र काढायला येतील. तेच त्या धाग्यावरही टाका. वातावरण निर्मिती करा.
जेवढा वेळ चित्रपट चालतो, त्यापेक्षा जास्त वेळ तुमचा रिव्हिव वाचायला लागला पाहिजे.
अख्खी मायबोली तुमच्याकडे डोळे लावून बसली आहे.

गल्ली चुकली.
संपादित

https://youtu.be/Y6YJifBggM0?si=a24YAg3GyP5yBbHm

हे तारा भवाळकरांचे भाषण ऐकलं तर त्यामध्ये वर बरेच प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या आहेत , अभिजात दर्जा म्हणजे काय त्यातूनं काय होणारे किंवा संस्कृत भाषेला एवढं अनुदान करायचं वगैरे तर याचे संदर्भ तुम्हाला बरेच सगळे या भाषणात आणि
अजून त्यांचे व्हिडिओ आहेत त्यात मिळतील.

<त्यामुळे अगदी उद्याच नाही पण या आठवड्यात लिहितो > असं सरांनी ४ फेब्रुवारीला लिहिलं.
मग ते म्हणाले ऑफिसचं काम आल्याने लिहिता आलं नाही. पण बीअर बायसेप्सचे अश्लील व्हिडियोज शोधून शोधून इथे द्यायला आणि सगळ्यांनी ते बघा म्हणून आग्रह करायला त्यांना वेळ मिळाला. हेच तर ऑफिसचं काम नव्हतं ना?

मग मराठी भाषा दिन , त्याबद्दलचा मायबोलीवरचा उपक्रम हे सुद्धा येऊन गेले.

शर्मा जींबद्दल तर दिवसाला दहा दहा पोस्ट्स आल्या.
तरीही अभिजात मराठी भाषा आपल्यावर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं ते सर सांगतील म्हणून डोळे लावून बसली आहे. पण सरांना आतूनच तसं येत नाही. मराठी भाषा म्हणजे काय शाहरुख, स्वप्नील, सई, शर्माजी आहे का? त्यामुळे तिला अजूनही असंच वाट बघत बसावं लागणार. बिच्चारी!

अरेरे! सरांना मराठी भाषेवर प्रेम कसं करावं याबद्दल लिहायचं होतं. पण मराठी दिवस मध्ये आला. त्या लेखाच्या शीर्षकातच सरांनी मराठीला तिची जागा दाखवून दिली आहे.

मराठी दिवस आला त्याला सर दोष देतात. पण अख्खी चँपियन कप स्पर्धा होऊन गेली, तिच्यामुळे मराठी भाषेसाठी लिहिता आलं नाही, असं म्हणत नाहीत.

मराठी भाषा अभिजात असल्याचं केंद्रशासनाने ठरवलं, त्यादिवशी त्या वेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे ट्वीट केलं.
माझा मराठाचि बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके।" या ओळींचा संदर्भ देत मुख्यमंत्री
@mieknathshinde
यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले असून, आजचा दिवस मराठी भाषा आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा, असा ऐतिहासिक क्षण असल्याचे नमूद केले आहे. जगभरात, सातासमुद्रापार मराठी भाषा, सण आणि उत्सव जोपासणाऱ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी प्रेमी, साहित्यिक, आणि संशोधकांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले आणि यापुढे हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.

सर ज्याला मराठी दिवस म्हणत आहेत , तो २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा मराठी भाषा गौरव दिन. फडणवीस.३ सरकारने शिंदें सरकारचे अनेक निर्णय मोडीत काढले किंवा गुपचूप बासनात ठेवले. जर ३ ऑक्टोबर हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय गुंडाळला नाही, तर मराठी भाषा गौरव दिन वर्षातून दोनदा साजरा केला जाईल. आता त्यांना ३ ऑक्टोबर म्हणायचं होतं की घटस्थापनेचा दिवस म्हणायचं होतं, ते स्पष्ट नाही. पण काहीही असो. सरांना मराठी भाषे बद्दल लिहिण्यासाठी आणखी एका चांगल्या दिवसाचा मुहूर्त आहे. त्याला अजून सहासात महिने अवकाश आहे.

सरांनी मराठी भाषेबद्दल लिहिलं की तो दिवस मायबोली संकेत स्थळावर मराठी भाषा प्रेम दिन म्हणून साजरा करावा अशी मी वेबमास्तरांना विनंती करेन.

Pages