Submitted by कविन on 30 September, 2024 - 05:17
कठीण असतं सांत्वन करणं
आणि त्याहूनही कठीण असतं,
सांत्वन स्विकारणं
दु:खाचा तळ काठावरुन दिसत नाही
सांत्वन असलं सच्चं, तरी तेही तळ गाठत नाही
आणि दु:खाचा डोह शोषता येईल,
अशी जादू मलाही येत नाही
मी फक्त मिठी मारेन तुला
काठावर बसून राहीन तुझ्या बाजूला
दु:खाच्या डोहाची खोली तुला घाबरवेल
तेव्हा मी मूक सोबत करेन
पण अजिबात म्हणणार नाही
I can feel your pain
कारण कितीही सहवेदना म्हंटले
तरी त्या दु:खाचा प्रत्येक पापुद्रा
फक्त तुलाच समजणार
काठावरुन मला कितीसा उमजणार?
म्हणून सखे, मी तुझं सांत्वन करणारच नाही
आज नाही, उद्या नाही आणि कधीही नाही
कारण कठीण असतं सांत्वन करणं
आणि त्याहूनही कठीण असतं,
सांत्वन स्विकारणं
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशयाशी सहमत!
आशयाशी सहमत!
सांत्वन या कृतीचा आवश्यक तो पापुद्रा व्यवस्थित उलगडला आहेत
कवीन, खूप संवेदनशील कविता.
कवीन,
खूप संवेदनशील कविता.
खूप संवेदनशील कविता>>>+१
खूप संवेदनशील कविता>>>+१
वाह! तुझं नाव वाचूनच कविता
वाह! तुझं नाव वाचूनच कविता वाचायला घेतली. खूप हळवी आणि कातर!