हाडं गोठवणारा गार वारा
वर वांझोट्या ढगांची गर्दी
कधी ऊन कधी सावली
तिच ती अंग जाळणारी सावली
पाऊस पेरणी करून गेला
परत फिरकलाच नाही
भुईतला आशेचा कोंब
गर्भातच मेला
आता उरलेत
दुष्काळाचे पायरव
आढं मोडकी कणाहीन घरं
मुकाट सुन्या सुन्या वाटा,पार
तहानलेले पाणवठे , विहिरी
मूक हंबरणारे
शेणामुताच्या वासाला आसुसलेले गोठे
आ वासलेल्या रिकाम्या गव्हाणी
गोठ्याकडं डोळे लावलेल्या चारा छावण्या
लढता लढता शहीद झालेले
वा-यावर भुरभुरते करपलेले कोंब
रापलेले निस्तेज चेहरे, अन्
त्यावर दुकाळाच्या सुरकुत्या
पिचलेली मनगटं, निर्जीव डोळे
अन् घोंगावणा-या माशा
दारिद्रयाचा ठेवाच त्या
टंचाई, कष्टाचे डोंगर
अन् काळाची भेसूर चाहूल
वडिलोपार्जित वाट्याला आलेले
© दत्तात्रय साळुंके
बाप रे
बाप रे
+१ वास्तव . . .
+१
वास्तव . . .
वास्तववादी कविता ...!
वास्तववादी कविता ...!
वास्तव!
वास्तव!
सर्व रसिकांचे अनेकानेक
सर्व रसिकांचे अनेकानेक धन्यवाद...
दसा
दसा
ह्यावर्षी तरी नाही होणार पायरव.
धन्यवाद केकू...
धन्यवाद केकू...
काही ठिकाणी आडसाली अथवा दर दोनतीन वर्षात दुष्काळ असतो.
वाचताना वाईट वाटले तरी कविता
वाचताना वाईट वाटले तरी कविता चांगली आहे. त्या स्थितीचे वर्णन फार चपखल आहे.
वाचताना वाईट वाटले तरी कविता
वाचताना वाईट वाटले तरी कविता चांगली आहे >> +१.
@हपा
@हपा
@ फारएंड
अनेकानेक धन्यवाद...हे सगळं अनुभवलंय...
ओह....
ओह....