चित्रकला उपक्रम : आवडते कार्टून - ऋन्मेऽऽष - ऋन्मेष नाईक

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 September, 2024 - 15:48

गणपती बाप्पा गेले तरी गणेशोत्सव ग्रूप अजून उघडा आहे, स्पर्धांचा निकाल लागला नाहीये, आणि लेकीच्या चित्रांचे कौतुक बघून लेकाला सुद्धा ते करून घ्यायची इच्छा झाल्याने आणि त्यासाठी त्याने मेहनत घेऊन काही, किंवा बरीच काही चित्रे रेखाटल्याने हा धागा काढत आहे. तसेही आपलीच मायबोली आहे. थोडे नियम इकडचे तिकडे झाल्यास चालतंय Happy

सुरुवात गणपती बाप्पांपासून Happy
चित्र काढल्यावर कागद कापाकापी आयडिया त्याचीच. कुठेतरी बघितले असेल म्हणा, युट्यूब वगैरे..

IMG-20240925-WA0003.jpg

त्यांनतर आवडते कार्टून डोरेमॉन.
बघण्याचे नाही तर चित्र काढण्याचे आवडते.
बघायला आणि तसे वागायला आजही ऑगी नंबर वन!
पण चित्र काढायला हे डोरेमॉन सोपे वाटत असावे जे दोन दिवसात चार पाच काढून रंगवले.

IMG-20240925-WA0002.jpg

तो ही चित्रे न बघता काढतो. वरची गणपतीची चित्रे देखील त्याने मूळ चित्राकडे न बघता काढली. ही गोष्ट चांगली की वाईट माहीत नाही. पण परीसारखी बघून काढ अजून चांगली येतील असे सांगितले तरी ऐकत नाही.
हे मात्र त्याचे परीसारखेच आहे. दोन्ही पोरे बापाचे ऐकत नाही Happy पण प्रेमही तितकेच करतात म्हणून काही बोलूही शकत नाही Happy

त्यानंतर हा एक भालू द बेअर काढला. काळया रंगाने रंगवायला जात होता, पण हात धरून थांबवला आणि आधी फोटो काढून घेतला.
त्याच्या बाजूला जे मॉडर्न आर्ट चिन्ह आहे ते काय काढलेस विचारल्यावर त्याचे इतके सारे अर्थ सांगितले की त्याचा स्वतंत्र लेख लिहावा लागेल.

IMG-20240925-WA0004.jpg

आणि ही थोडीशी कलरींग!
एक हसरे कासव, परीने ज्याचे चित्र काढले तेच आहे बहुधा.
आणि चौथा जो उंट आहे तो गणपतीच्या आधी रंगवलेला आहे. पण चार फोटोंचा कोलाज करायला म्हणून त्यालाही आत घेतले Happy

IMG-20240925-WA0001.jpg

धन्यवाद,
सि. अँड ज्यु. ऋ Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋतुराज हो,
चौकशी चालू आहे जवळच्या ठिकाणी. त्यांच्याच शाळेतील एक ड्रॉइंग टीचर क्लास घेतात. दर शनिवारी दिड तासाचे 22 सेशन आणि फिज 14 हजार.. अर्थात हे पैश्याच्या हिशोबाने योग्य की कसे याची कल्पना नाही. पण त्या क्लास तिसरी पासूनच्या मुलांचे घेतात आणि हा आता दुसरीत जाणार आहे. अर्थात याची चित्रे त्यांना दाखवून याच्या डेडिकेशन बद्दल सांगितले तर घेतील कदाचित या वर्षीही. शाळेतल्याच बाई क्लास मध्ये काही वेगळे शिकवतात का हा देखील प्रश्न पडला आहे. पण एकूणच क्लासचा विचार चालू आहेच..

मस्तच
ते खूनखार वर्जन आणि त्यासाठी तोंड फाडून दात काढण्याची कल्पना भारी आहे.
अजूनही त्याला क्लासला घातले नसल्यास नक्की घाला.

आर्च धन्यवाद Happy
आणि ऋतुराज हो, अजून घातले नसले तरी पर्याय चाचपणे चालू आहे. क्लास लावणार हे नक्की.

स्थानिक चित्रकला वर्ग टाळा नाहीतर तो त्याची शैली विसरेल.

राजू, हो.. तेच जरा कन्फ्युजन आहे. याला इथून पुढे घेऊन जायचे असेल तर शिकवणारा सुद्धा तितकाच चांगला असला पाहिजे असे वाटते. पण मला यातले काही कळत नाही.

धन्यवाद सर्वांचे Happy

ऋतुराज नाही Proud
तूर्तास शोधकाम चार सहा महिने वर्षभरासाठी थांबवले आहे. कारण जवळपासचे पर्याय चाचपले त्यात तसेच कोणी दिसत नाहीये.
हौशी क्रॅश कोर्स समर कॅम्प टाईप होते पण या सुट्टीत ते काही लावले नाही.
स्कूल टीचर एक आहेत ज्या प्रायव्हेट क्लास घेतात पण त्या इतके लहान मुलांचे घेत नाहीत. पुढच्या वर्षीपर्यंत इतर कुठला अजून चांगला पर्याय न सापडल्यास हा आहेच.

योग्य शिक्षक मिळाल्याशिवाय अजिबात क्लास लावू नकोस. त्याला त्याच enjoy करु दे. मुलांची चित्रकला बिघडल्याची किंवा त्यांचा interest कमी झाल्याची उदाहरणे आहेत.

छान चित्रे काढलीत. शाबासकी द्या त्याला.

तुम्हाला क्लास मिळत नसेल तर मायबोलीकर नीलू ह्या ऑनलाइन क्लास घेत आहेत. तिथे जॉइन करून शकता. उत्तम अनुभव आहे

छोटा कृष्ण वॉव!
बाकीची चित्र त्याने काढलीत की तुम्ही?
त्याने काढलीत तर तोच क्लास घेईल की.

किट्टु हा हा Happy
माझी चित्रकला बकरीचे पाय आहेत. सगळे चित्रे त्याचीच आहेत.

म्हणूनच स्वस्ति यांनी म्हटले तसे एखादा चांगला शिक्षक मिळावा अशी इच्छा आहे. किंबहुना त्याची स्वतःची शैली आणि क्रिएटिव्हिटी हरवू नये हे डोक्यात आहेच.

@ जाई, हो मुलीच्या चित्रकलेच्या धाग्यावर सुद्धा मायबोलीकर नीलू यांच्या ऑनलाइन क्लासेस बद्दल सुचवण्यात आले होते. अजून एकदोन जणांनी हे उचलून सुद्धा धरले होते.
तेव्हा मुलीला विचारले होते. पण ती ऑनलाइन ठामपणे नको म्हणाली होती. मुलाला कोणी सापडले नाही तर त्याच्याबाबत हा पर्याय चाचपता येईल. सुचवल्याबद्दल धन्यवाद.

Pages