Submitted by मनोजकुमार देशमुख on 13 September, 2024 - 10:55
पाहिले तुला असे कुणास ना उमजले
रुप भाबडे तुझे मनास या भावले
जायचे कुठे मला विसरलो ते आता
मागुती तुझ्याच ही चालतात पावले
बोललीस मधुर ते हळुवार बोल चार
काळजात सप्तसूर तार तार वाजले
माळलास वेणीत तोडुनी गुलाब एक
भाग्य केव्हढे पहा त्या फुलास लाभले
आस घेऊनी उभा वाट पाहतो किती
भेटशील तू कधी युग सरून चालले
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फार सुंदर.
फार सुंदर.
सुंदर...
सुंदर...
धन्यवाद !!! सामो , दत्तात्रय
धन्यवाद !!! सामो , दत्तात्रय साळुंके
धन्यवाद !!! सामो , दत्तात्रय
धन्यवाद !!! सामो , दत्तात्रय साळुंके