माझे स्थित्यंतर- { रसिक मन हरवले आहे. कुठे पाहीले का? कृपया, येथे संपर्क साधा. } - सामो

Submitted by सामो on 7 September, 2024 - 09:00

एखादी एपिफनी मोमेन्ट असते जेव्हा आपल्याला कोणाच्या तरी डोळ्यात, पूर्वीचे, अगदी पूर्वीचे आपण गवसतो. अचानक आपल्याही विस्मृतीत गेलेले आपण कोणाच्या तरी शब्दांत, नजरेत आठवुन जातो. काय मस्त वाटतं तेव्हा. आणि ते कोणी म्हणजे अगदी नेहमी १००% नेहमी आपली लाडकी मैत्रिण असते जिला आपण भारतात गेल्यावरती आवर्जुन भेटत असतो. कारण मध्ये पूलाखालून कितीही पाणी गेलं असलं तरी तिच्या डोक्यात आपला तोच स्नॅपशॉट असतो. तेच कॅरेक्टर फ्रीझ झालेलं असतं मग ते पूर्वी लिहीलेली तोडकी मोडकी कविता असेल, पूर्वीच्या काही व्हल्नरेबिलिटीज असतील किंवा काही आवडीनिवडी असतील.

हे असेच झाले जेव्हा प्रज्ञाने मला 'मुखवटे' नावाची माझी नूमवि - इयत्ता ११-१२ Happy मधली कविता पाठवली. अर्रे मी पार विसरले होते की मीच ती कविता लिहीलेली किंबहुना आपल्याला कविता आवडतात, आवडायच्या हेही माझ्या विस्मरणात गेलेले होते. माझ्या टिनेजचा, तरुण्याच्या नव्हाळीचा एक अविभाज्य भाग होती कवितेची आवड. आणि हा मुद्दा जपला होता प्रज्ञाने. तिने ते आमचे वार्षिक मासिकही जपून ठेवलेले होते जिच्यात ही कविता पब्लिश झालेली होती.

आणि माझे मन पार भूतकाळात गेले. शांता शेळके, गदिमा, इंदिरा संत, गडकरी यांच्या कवितांनी माझी जर्नल्स भरुन असत. शेरो शायरी, इंग्रजी कोटेशन्स यांची तर गणतीच नसे. केवढी आवड होती, आदर्शवाद होता, स्वप्ने आणि जिद्द होती. पुढे पुढे मला संसार झाला, जबाबदार्‍या झाल्या, करीअर झालं आणि कविता मागे मागे पडली. तरी कवितेने तग धरायचा प्रयत्न केला. खूपदा, कैकदा बॉर्डर्स आणि बार्न & नोबल्स ना दिलेल्या भेटीतून ती मला भेटत राहीली. मेरी ऑलिव्हर, निक्की जिओव्हिनी, आणिही कित्येक कविंच्या अंतरंगात डोकावता आले खरे. पण तरीही ती अशी हरवत गेली, स्वप्ने अशी विरत गेली जशी शेवटची घरघर लागलेल्या माणसाची शुद्ध हरपत जाते - हळूहळू पण नक्की, नियमित वेगाने. यात दोष कोणाचाही नसून माझाच होता. काहीतरी मौल्यवान, जीवनावश्यक आपल्या जाणिवेतून, प्राणशक्तीमधून गहाळ होतय हे कळायलाच बराच अवधी लागला. कळलं तोपर्यंत उशीर झालेला होता. डॉक्टरांचे, मूड फ्लॅट करुन टाकण्याचे उपाय झालेले होते, मूड, चैतन्यमय प्राणशक्ती फ्लॅट, नीरस होउन गेलेली होती.
'ती पाहताच बाला,
कलिजा खलास झाला,
छातीत इष्कभाला,
की आरपार गेला'

अत्रे यांच्या या ओळी ऐकून मनाने, एखाद्या लवलवत्या पोपटी पात्यासारखं तरतरुन उठणं हे हरवले आहे.
ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा |.
जया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ।।

या श्लोकाचे समर्थ सौंदर्य जाणवणारे मन नंतर एलेव्हेटेड मूड उद्दिपितच करु शकत नाही. औषधांमुळे, सगळं फ्लॅट, सपक झालेले आहे. क्वचित मूड स्विंगज होतात आणि हवेहवेसे वाटतात. तक्रार नाही त्याबद्दल कारण बदल हाच जीवनाचा स्थायीभाव आहे हे मी जाणते. आणि तसेही अजुन निदान २० वर्षे तरी हातात आहेतच. परत एकदा नव्याने कविता आणि मुख्य म्हणजे, लवलवत्या गवती पात्यासारखे रसिक मन आणि मूड पुन्हा गवसेलही.
.
सर्व वाचकांचे खूप खूप आभार. ऋतु बदलताना, क्वचित मूड स्विंग्ज होता आणि इतका सुरेख मूड स्ट्राइक होतो कधीकधी अटमोस्ट डिव्होशनल, टोटली फिलॉसॉफिकल आणि खूप रोमॅन्टिक. इतकं मस्त वाटतं ना. मी फक्त गाणी ऐकते. गाण्यांवर तरंगते तेव्हा. ढगांवर असते. संपूर्ण जग फार फार सुंदर वाटतं.
.
आणि हे काहीतरी जीवघेणे, आनंददायी मिस करते मी. कारण जर दरी नाही तर त्या मूडला उंचीही नाही असा काहीतरी औषधांचा प्रभाव असतो.

आज हे साधे गाणे - एरिक क्लॅप्टनचे - यु लुक वंडरफुल टुनाईट - इतका असीम आनंद देउन गेले का तर सध्या ऋतु बदलतोय आणि मूडएलेव्हेट (उंच) होतोय सखल होतोय. असो हे गाणे ऐका -

https://www.youtube.com/watch?v=UprwkbzUX6g

..... It's late in the evening
She's wondering what clothes to wear
She puts on her make up
And brushes her long blonde hair
… And then she asks me, "Do I look alright?"
And I say, "Yes, you look wonderful tonight"

… We go to a party
And everyone turns to see
This beautiful lady
That's walking around with me
… And then she asks me, "Do you feel alright?"
And I say, "Yes, I feel wonderful tonight"
… I feel wonderful

Because I see the love light in your eyes
And the wonder of it all
Is that you just don't realize how much I love you
… It's time to go home now
And I've got an aching head
So I give her the car keys
She helps me to bed
… And then I tell her, as I turn out the light
I say, "My darling, you are wonderful tonight"
Oh my darling, you are wonderful tonight

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे सामो..
मूड पुन्हा गवसेलही >>>> ही आशा, हा विश्वास महत्वाचा.. तो मूड नाहीच पुन्हा गवसला तरी काही हरकत नाही. पण आता नाहीच गवसनार हा विचार येता कामा नये..
बाकी प्रो पिक मधील मूड छान आहे Happy

छान लिहिलंय!
कविमनाने लिहिलय असच जाणवत.

मुख्य म्हणजे, लवलवत्या गवती पात्यासारखे रसिक मन आणि मूड पुन्हा गवसेलही.>> नक्कीच.. खूप शुभेच्छा

छान लिहिलंय!
कविमनाने लिहिलय असच जाणवत.

मुख्य म्हणजे, लवलवत्या गवती पात्यासारखे रसिक मन आणि मूड पुन्हा गवसेलही.>> नक्कीच.. खूप शुभेच्छा

मीच ती कविता लिहीलेली किंबहुना आपल्याला कविता आवडतात, आवडायच्या हेही माझ्या विस्मरणात गेलेले होते.>>अगदी अगदी झाले.
औषधांमुळे, सगळं फ्लॅट, सपक झालेले आहे.>>घट्ट मिठी सामो. समजू शकते.
परत एकदा नव्याने कविता आणि मुख्य म्हणजे, लवलवत्या गवती पात्यासारखे रसिक मन आणि मूड पुन्हा गवसेलही.>> नक्की नक्की गवसणार.

हृद्य लेखन.

जे जे मौल्यवान त्याला विस्मृत होण्याचा, हरवण्याचा, सुप्तावस्थेचा शाप असतोच. Trivia stays with us while things of value are lost or stolen Happy

तुम्हाला कविता, रसिकता आणि जीवनरसाचा खळखळता निर्झर पुन्हा सापडण्यासाठी शुभेच्छा.

जॉन एलिया बघा काय म्हणतो तुमच्या साठी :

फ़िक्र-ए-ईजाद में गुम हूँ मुझे ग़ाफ़िल न समझ
अपने अंदाज़ पर ईजाद करूँगा तुझ को

*फ़िक्र-ए-ईजाद = thought of invention

सर्व वाचकांचे खूप खूप आभार. ऋतु बदलताना, क्वचित मूड स्विंग्ज होता आणि इतका सुरेख मूड स्ट्राइक होतो कधीकधी अटमोस्ट डिव्होशनल, टोटली फिलॉसॉफिकल आणि खूप रोमॅन्टिक. इतकं मस्त वाटतं ना. मी फक्त गाणी ऐकते. गाण्यांवर तरंगते तेव्हा. ढगांवर असते. संपूर्ण जग फार फार सुंदर वाटतं.
.
.
आणि हे काहीतरी जीवघेणे, आनंददायी मिस करते मी. कारण जर दरी नाही तर त्या मूडला उंचीही नाही असा काहीतरी औषधांचा प्रभाव असतो.

आज हे साधे गाणे - एरिक क्लॅप्टनचे - यु लुक वंडरफुल टुनाईट - इतका असीम आनंद देउन गेले का तर सध्या ऋतु बदलतोय आणि मूडएलेव्हेट (उंच) होतोय सखल होतोय. असो हे गाणे ऐका -

https://www.youtube.com/watch?v=UprwkbzUX6g

..... It's late in the evening
She's wondering what clothes to wear
She puts on her make up
And brushes her long blonde hair
… And then she asks me, "Do I look alright?"
And I say, "Yes, you look wonderful tonight"

… We go to a party
And everyone turns to see
This beautiful lady
That's walking around with me
… And then she asks me, "Do you feel alright?"
And I say, "Yes, I feel wonderful tonight"
… I feel wonderful

Because I see the love light in your eyes
And the wonder of it all
Is that you just don't realize how much I love you
… It's time to go home now
And I've got an aching head
So I give her the car keys
She helps me to bed
… And then I tell her, as I turn out the light
I say, "My darling, you are wonderful tonight"
Oh my darling, you are wonderful tonight

नेहमीप्रमाणेच उत्तम लेखन. मी फारशी कविता प्रेमी नाही पण तरीही खूप आवडले. कारण रिलेट झाले. आपण स्वतःला ओळखू शकणार नाही इतके बदल स्वतःत घडत असतात, आवडीनिवडीत, विचार्/मते इ. मध्ये.

छान लिहीले आहे.

तुम्हाला कविता, रसिकता आणि जीवनरसाचा खळखळता निर्झर पुन्हा सापडण्यासाठी शुभेच्छा. >>> +१

छान लिहिले आहे, लिहत रहा.
तुम्हाला कविता, रसिकता आणि जीवनरसाचा खळखळता निर्झर पुन्हा सापडण्यासाठी शुभेच्छा>>> +११

सामो, काय लिहितेस गं.

तुला ते हरवलेले, जाणवलेले आणि हवेसे वाटणारे पुन्हा गवसावे आणि ती अनुभूती पुन्हा यावी अशी सदिच्छा.