रोमहर्षक प्रसंग भाग 1
माझ्या कुंडलीतच बहुतेक अपघात, दंगली, नैसर्गिक आपत्ती, अशा गुणांचे जास्त प्रमाण असावे.
लहानपणीचे किरकोळ म्हणजे सायकलवरून पडणे, हातपाय मोडून घेणे असे अपघात सोडल्यास फारसे काही घडलेले नाही. परंतु स्कूटर ९ फुटी खड्यात पडून, खड्ड्यातूनच ४०-५० फूट जाणे किंवा ST ने कारला दिलेली धडक अथवा मी जात असलेली रेल्वे तीन चार वेळा रुळावरून घसरणे किंवा रेल्वे धरणांवरच अडकून बसने. विमानाच्या बाबतीत क्रॅश लँडिंग होणे. विमानाची चाके न उघडणे , विमानाच्या इंजिनने पेट घेणे, विमान बगळ्यासारखे लँड होणे किंवा विमानवर प्रचंड प्रमाणात विज पडणे असे प्रकार तर बरेच झाले आहेत. नाही म्हणायला बोटीचा काहीही अपघात झाला नाही. यातील काही रोमहर्षक प्रसंग सांगण्याचा मोह मला होत आहे.
१९६१ साली पानशेत आणि खडकवासला धरण फुटल्यामुळे पुण्याची प्रचंड वाताहत झाली. अलर्ट आला, शाळांना ११ वाजता सुट्टी दिली गेली. मी त्यावेळेला पेरुगेट भावे स्कूल मध्ये शिकत होतो . पूर आला म्हंटल्यावर मुले नदीकडे धावली. अर्थातच पोलिसांनी दंडुके मारून सर्वाना घरी हाकलले. आम्ही ७-८ कार्टी पर्वतीवर जाऊन पूर पाहू लागलो. ते पुराच्या पाण्याचे रौद्ररूप अजूनही आठवते. या पुराने असंख्य गावे, खेडी नष्ट झाली होती तर पुण्याचाही दोन तुकडे झाले होते. त्यावेळच्या सर्व हकीकती सांगायचे म्हंटले तर एक ग्रंथ तयार होईल.
परंतु त्यावेळी उध्वस्त झालेल्या वसाहती, पेठा, भक्कमपणे शनिवारवाडा उभा असल्यामुळे वाचलेल्या पेठा किंवा ३०-४० ट्रक मधून मृतदेह आणि अवयव अक्षरशः वाळूसारखे ढीग करून त्याच्यावर रॉकेल चे पिंप ओतून मित्रमंडळजवळ जाळण्यात आले . विठ्ठलवाडीच्या कळसाला अडकलेली झाडे किंवा इंदापूर पर्यंत वाहून गेलेले रोडरोलर्स आणि डंपर्स हे आजही विसरू शकत नाही.
१९६५ मध्ये पुण्यात हिंदू -मुस्लिम दंगल झाली. एका मुस्लिम तरुणाने मंडई गणपती समोर लघवी केली आणि पुणे पेटले . आंम्हीही १५-२० कॉलेजची पोरं टिळकरोडच्या आणि बाजीरावरोडच्या कॉर्नरवर असलेल्या दर्ग्याजवळ गेलो. पोरांनी तिथून दगड काढायला सुरवात केली. तिथे दोन पोलीस असूनही त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केल. माझ्या कुंडलीतच बहुतेक अपघात, दंगली, नैसर्गिक आपत्ती, अशा गुणांचे जास्त प्रमाण असावे.
लहानपणीचे किरकोळ म्हणजे सायकलवरून पडणे , हातपाय मोडून घेणे असे अपघात सोडल्यास फारसे काही घडलेले नाही. परंतु स्कूटर ९ फुटी खड्यात पडून , खड्ड्यातूनच ४०-५० फूट जाणे किंवा ST ने कारला दिलेली धडक अथवा मी जात असलेली रेल्वे तीन चार वेळा रुळावरून घसरणे किंवा रेल्वे धरणांवरच अडकून बसने. विमानाच्या बाबतीत क्रॅश लँडिंग होणे. विमानाची चाके न उघडणे , विमानाच्या इंजिनने पेट घेणे, विमान बगळ्यासारखे लँड होणे किंवा विमानवर प्रचंड प्रमाणात विज पडणे असे प्रकार तर बरेच झाले आहेत. नाही म्हणायला बोटीचा काहीही अपघात झाला नाही. यातील काही रोमहर्षक प्रसंग सांगण्याचा मोह मला होत आहे.
१९६१ साली पानशेत आणि खडकवासला धरण फुटल्यामुळे पुण्याची प्रचंड वाताहत झाली. अलर्ट आला, शाळांना ११ वाजता सुट्टी दिली गेली. मी त्यावेळेला पेरुगेट भावे स्कूल मध्ये शिकत होतो . पूर आला म्हंटल्यावर मुले नदीकडे धावली. अर्थातच पोलिसांनी दंडुके मारून सर्वाना घरी हाकलले. आम्ही ७-८ कार्टी पर्वतीवर जाऊन पूर पाहू लागलो. ते पुराच्या पाण्याचे रौद्ररूप अजूनही आठवते. या पुराने असंख्य गावे, खेडी नष्ट झाली होती तर पुण्याचाही दोन तुकडे झाले होते. त्यावेळच्या सर्व हकीकती सांगायचे म्हंटले तर एक ग्रंथ तयार होईल.
परंतु त्यावेळी उध्वस्त झालेल्या वसाहती, पेठा, भक्कमपणे शनिवारवाडा उभा असल्यामुळे वाचलेल्या पेठा किंवा ३०-४० ट्रक मधून मृतदेह आणि अवयव अक्षरशः वाळूसारखे ढीग करून त्याच्यावर रॉकेल चे पिंप ओतून मित्रमंडळजवळ जाळण्यात आले . विठ्ठलवाडीच्या कळसाला अडकलेली झाडे किंवा इंदापूर पर्यंत वाहून गेलेले रोडरोलर्स आणि डंपर्स हे आजही विसरू शकत नाही.
१९६५ मध्ये पुण्यात हिंदू -मुस्लिम दंगल झाली. एका मुस्लिम तरुणाने मंडई गणपती समोर लघवी केली आणि पुणे पेटले . आंम्हीही १५-२० कॉलेजची पोरं टिळकरोडच्या आणि बाजीरावरोडच्या कॉर्नरवर असलेल्या दर्ग्याजवळ गेलो. पोरांनी तिथून दगड काढायला सुरवात केली. तिथे दोन पोलीस असूनही त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केल. थोड्या वेळाने एक इन्स्पेक्टर तिथे आला आणि त्याने पोलिसांना आणि पोरांना दम भरला. सर्व पोरांना तिथेच रस्त्यावर बसायचा हुकूम सोडला.
तो गेल्यानंतर त्या दोन पोलिसांनी पोरांना चक्क बटाटेवडे आणि चहा आणून दिला.
१९६८ साली श्रीनगर ते जम्मू विमान प्रवास डिसेंबर मध्ये होता. ५-६ दिवस तर उड्डाणे रद्द होत होती. जम्मू वरून वाईट हवामानामुळे येऊ न शकल्यामुळे परतीचा प्रवास रद्द होत होता. शेवटी एकदा जम्मूचे विमान आले. त्यावेळी या प्रवासासाठी ' डाकोटा' विमान वापरले जायचे. डाकोटा विमान बनिहाल वरून जाऊ शकत नसल्यामुळे ते दऱ्याखोऱ्यातून जायचे. वाईट हवामानामुळे खवळलेल्या समुद्रातील छोट्या होडीप्रमाणे विमान नाचत होते. विमानाच्या दोन्ही बाजूस विमानाहूनही उंच असलेले भव्य पर्वत होते. विमान कुठल्याही पर्वताला कधी स्पर्श करेल याची खात्री नव्हती. त्यातून वेडीवाकडी वळणे. पायलटच्या कौशल्यामुळे जवळ जवळ दीड तासानंतर विमान जम्मूला सुखरूप पोहचले. डाकोटा विमान सेवेतून काढल्यानंतर खास भारतीय बनावटीची Avro विमाने वापरणे सुरु झाले. मुंबई -पुणे प्रवासात निदान दोनदा तरी पायलट चुकीमुळे नाशिकला उतरत होता. याचे कारण म्हणजे विमानाचे अत्यंत वाईट असलेले इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंमुनिकेशन. तसेच एकदा दिल्ली - चंदीगढ ऐवजी विमान चक्क कानपूरला उतरले.
तसेच एकदा कलकत्ता - गुहाहत्ती विमान प्रवासात विमानाचे कंमुनिकेशन बंद पडले. पायलटला अर्थात माहित होते कि ब्रह्मपुत्रा नदीवर गेल्यास त्याला गुहाहत्ती सापडेल म्हणून तो नदीवरून जाऊ लागला. अर्ध्या-पाऊण तासाने त्याच्या लक्षात आले की ती नदी ब्रम्हपुत्रा नसून दुसरीच आहे. त्याने ब्रह्मपुत्रा नदी शोधून तीन - साडेतीन तासांनी गुहाहत्ती विमान उतरवले. या प्रवासात दहा-बारा वेळातरी मोठ्ठाली एअरपॉकेट्स लागली. एअरपॉकेट्सचा अनुभव पोटात गोळा उठवणारा असतो. विमान २००-३०० फूट खाली येते . गुहाहत्ती एअरपोर्टवर चिंतेचे वातावरण पसरले होते. विमान प्रवास फक्त एक तास दहा मिनिटांचा होता. विमानाच्या शोधाचे कार्य हाती घेण्यात आले होते. हा प्रवास बांगलादेश वरून होत असल्यामुळे , बांगलादेश एअरफोर्सला हि शोध मोहीम हाती घेण्याची विनंती केली गेली होती. एवढ्या त्रूटी असूनही Avro चे विमान पाडण्याचे प्रमाण जवळ जवळ शून्यच होते.
कोरबा येथे भारतातील सर्वात मोठा ऍल्युमिनिअम प्लांट होता. केवळ त्या प्लांटकरिता उभारलेले सुपर थर्मल स्टेशनही तेथे होते. दोघांनी मिळून कित्येक हजार एकर परिसर व्यापला होता. त्यातच कामगार आणि अधिकाऱ्यांच्या वसाहती होत्या. त्यांचे गेस्ट हाऊस पण ते अजून जंगलात होते आणि गेस्ट हाऊस च्या बाहेर अजगर मी पाहिलेले होते . त्यामुळे तेथे थांबणे शक्यच नव्हते . प्लांट जवळच १२-१३ किलोमीटरवर कोरबा नावाचे छोटे खेडे होते. त्या खेड्यात त्या काळी चंद्रलोक नावाचे एकच हॉटेल होते. मी तेथे कामासाठी गेल्यावर , तेथेच थांबत असे. प्लांटवर करंबळेकर नावाचे चीफ इंजिनियर होते. त्यांच्या हाताखाली ५००-६०० इंजिनियरचा भला मोठा ताफा होता. मी चंद्रलोकमध्ये फक्त झोपण्याकरिता जायचो. बाकीचे रात्रीचे जेवण करंबळेकरांसोबत व्हायचे. खाणे-पिणे, गप्पा यामध्ये रात्रीचे बारा - साडेबारा कधी वाजायचे कळायचे नाही. एका अशाच रात्री कार मधून परत येताना प्रचंड पाऊस सुरु झाला . थांबा म्हणत असतानाही मी हट्टाने चंद्रलोकडे निघालो . कार ने फार तर अर्धा तास लागायचा. वाटेत एक २०-२५ फूट रुंदीचा ओढा होता. नेहमीच त्याच्यात अत्यल्प पाणी असायचे. त्यादिवशी मात्र ओढ्याला प्रचंड पूर आला होता. गाडी दहा फूट जाताच अडकून बसली. बराच प्रयत्न करूनही गाडी पुढे किंवा मागे जात नव्हती. हळू हळू गाडीत पाणी शिरू लागले. ड्राइवर आणि मी कसरती करून गाडीचे टॉप गाठले. त्याच्यावर कॅरिअर असल्यामुळे त्याला धरून आम्ही बसून होतो . पाणी वाढतच होते आणि बॉनेट ही पाण्यात बुडून गाडी गदगदा हलायला लागली. भर पावसात, निबिड अरण्यात आणि केव्हांही वाहून जाईल अशा अवस्थेत गाडीच्या टॉपवर आम्ही दोघे कसल्याही गप्पा मारत बसलो होतो. पहाटे पाच साडेपाच ला प्रोजेक्ट चा एक अजस्त्र डंपर आला आणि त्याने आम्हाला साखळी लावून पलीकडल्या बाजूला पोहचवले. आमची कार सुरु होणे अशक्यच होते. मी करंबळेकरांचा पाहुणा आहे म्हंटल्यावर त्यांनी मला व ड्राव्हर ला गाडीत बसवले आणि त्याच्या राक्षसी हाताने गाडीला उचलून डंपर मध्ये कोंबले. अखेर सकाळी साडे -सहाला चंद्रलोकवर पोहचलो .
..... अपूर्ण ...
घडू शकतात तेवढे प्रसंग घडलेले
घडू शकतात तेवढे प्रसंग घडलेले दिसताहेत तुमच्याबाबतीत.
वरचे काही पॅराग्राफ दोनदा कॉपी पेस्ट झालेले आहेत.
छान लिहिलंय, अजून येऊ द्या
छान लिहिलंय, अजून येऊ द्या लेख.
छानचं लिहिलंय. शर्मिला र ने
छानचं लिहिलंय. शर्मिला र ने सांगितल्याप्रमाणे ते डबल कॉपी झालेलं संपादीत करा प्लिज.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.