Submitted by अनन्त्_यात्री on 6 August, 2024 - 11:51
कवितेत भेटती डोह कधी
कधी कोडे सहज न सुटणारे
कधी आभासी जगतामधले
अस्पर्श्य, अलख, मोहविणारे
कधी लाट विप्लवी, विकराळ,
फेसाळ, किनारी फुटणारी,
शोषून उषेचे सर्व रंग,
नि:संग निळीशी उरणारी
कधी व्याधविद्ध मृगशीर्षा सम
मिथकांशी पाऊल अडखळते
अन् चंद्रधगीच्या वणव्यातून
नक्षत्र वितळणारे दिसते
कधी ओळींच्या मधली जागा
ऊर्जेने अस्फुट लवथवते
शब्दातून अवचित ओथंबत
अलगद काही हाती येते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
क्या बात है !!!
क्या बात है !!!
मस्त!
मस्त!
वाह
वाह
शशांक, rmd, अवल
शशांक, rmd, अवल प्रतिसादाबद्दल आभार!