पैलतीर

Submitted by निमिष_सोनार on 5 June, 2024 - 00:26

गूढ आकाशात चंद्र हसला,
चांदण्या त्याच्या सोबतीला,
शांत नदी सावरे तिच्या नावेला,
ती निघाली प्रियकराला भेटायला ..

त्याची आठवण पुरेशी झाली,
तिचे सौंदर्य खुलवायला ...

ओठांची सुंदर कळी उमलते,
ओठातून प्रेमगीत पाझरते,
नेत्रांत साठले अश्रूंचे भरते,
हृदय तिचे त्याच्यासाठी झुरते ..

आठवून सुगंध तिच्या शरीराचा,
तन मन त्याचे व्याकुळ होते ..

पैलतीरावर अश्वारूढ तो राजकुमार,
इच्छा तिच्या सहवासची, त्याला अधीर करते ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users