शीर्षक :- तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं गं
तुझ्या हसण्याला,तुझ्या बोलण्याला
कसं वेगळंच रूप आलंय गं
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं गं ||धृ||
भाताच्या बीजाला मातीत रुजवलं
उपटूनी रोप ते मातीत उगवलं
माप ओलांडून सोन्याचं झालंय गं
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं गं ||१||
भाकरीचा सोबतीला चटणीची जोड गं
कष्टाच्या घामात लागतीया गोड गं
कष्टाला सुखाचा वलय आलंय गं
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं गं ||२||
खेळतीया अंगणी तुझे माझे द्वाड गं
आकाशाच्या पार गं पुरविले लाड गं
तुझा घरादाराला लळा लागलायं गं
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं गं ||३||
जळतीया वातही अंधाराच्या रातीला
तशी तुझी साथही संसाराच्या वाटेला
झोपडीला माझ्या या उजेड दिलंय गं
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं गं ||४||
नभाच्या चांदणीला चंद्राची साथ गं
लग्नाच्या मंडपात घे हातात हात गं
सप्तपदी फेऱ्यात वचन दिलंय ग
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं गं ||५||
विनोद नंदू इखणकर
नाशिक (शब्दप्रेम)
७३५०९७०२०१
छान.
छान.
Cute cute. I hope people find
Cute cute. I hope people find such love. Everyone .
उपाशी बोका आणि अश्विनीमामी
उपाशी बोका आणि अश्विनीमामी यांचे मनापासून धन्यवाद