Submitted by वैशाली अ वर्तक on 26 May, 2024 - 03:42
विसावा
जीवा ,जरुरी विसावा
वाटे तो हवा हवासा
काम चाले अविरत
मनी देतसे दिलासा.
सुख, शांति मिळविता
क्षणभर न उसंत
नाही मिळाला निवांत
मनी राही सदा खंत
कर्तव्याच्या, पठडीत
सदा राही रममाण
घर, गृहस्थी पाहण्या
दिले ,झोकूsssन बेभान.
शमवून तप्त रश्मी
रवि ही जातो अस्ताला
अवनीच्या हो कुशीत
जाई जणु विसाव्याला.
आयुष्याच्या. ... सायंकाळी
आता जगु स्वतः साठी
नका मानू रिक्त पण
आयु असता ते गाठी
इच्छा आकांक्षा व स्वप्ने
यांची करु फुलवात
मिळुनिया तेजाळुया
स्वर्णांकित सांजवात
वैशाली वर्तक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान आहे कविता.
छान आहे कविता.